कॅलेंडर वर्ष २०२३ च्या तुलनेत सरलेले वर्ष २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीतील परताव्याची दखल घ्यावी, असे काही फंड सखोल संशोधनाअंती हाती लागले आहेत. त्यापैकी ठळक बदल जाणवलेल्या फंडांपैकी ॲक्सिस फोकस्ड फंडाची दखल घ्यावी लागेल. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत फंडाच्या व्यवस्थापनात मुखत्वे दोन बदल झाले. पहिला बदल फेब्रुवारी २०२४ मध्ये झाला. सचिन रेळेकर यांची या फंडाचे नियुक्त निधी व्यवस्थापक म्हणून फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे हाती घेतली. सचिन रेळेकर यांची मागील दहा वर्षातील कामगिरीचे मूल्यमापन कोष्टक क्रमांक १ मध्ये दाखविली आहे. दुसरा बदल १६ मे २०१४ पासून पोटोलिओमध्ये असलेल्या कंपन्यांची संख्या २५ वरून ३० करण्यात आली. या दोन्ही बदलांचा सकारात्मक परिणाम फंडाच्या कामगिरीत दिसून आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ॲक्सिस इक्विटी फंडाची जानेवारी २०१० मध्ये स्थापना झाल्यापासून फंडाची कामगिरी २०२० ते २०२३ हा अपवाद वगळता चांगली झाली आहे. फंडाच्या सुरुवातीला पंकज मोरारका हे निधी व्यवस्थापक होते. त्यानंतर फंडाची धुरा सुधांशू अस्थाना, जिनेश गोपनी, हितेश दास, श्रेयस देवलकर यांच्याकडे होती. सध्या सचिन रेळेकर हे निधी व्यवस्थापक आहेत, तर १ मार्च २०२४ पासून सीए कृष्णा एन. या सहनिधी व्यवस्थापिका आहेत. फंडाच्या पोर्टफोलिओत मुख्यत: लार्जकॅप कंपन्यांच्या समावेशासह काही मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांना स्थान दिले आहे. बाजारातील अस्थिरतेला तोंड देऊन पाच ते सात वर्षे ‘एसआयपी’च्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती निर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ॲक्सिस फोकस्ड फंड हा साठी एक चांगला विकल्प आहे. मागील चौदा वर्षात तीन कॅलेंडर वर्ष वगळता फंडाने मानदंड सापेक्ष अधिक परतावा मिळविला आहे. या फंडाची एकरकमी गुंतवणुकीत फंड गटातील ३ वर्षाची कामगिरी सर्वात खराब (२४ फंडात २४ व्या स्थानी) असली तरी मागील १ वर्षात २१ व्या स्थानापर्यंत उंचावली आहे. मागील सात वर्षातील कामगिरी १४ व्या स्थानी तर दहा वर्षातील कामगिरीत हा फंड १३ व्या स्थानी आहे. या फंडाच्या पोर्टफोलिओत लार्ज, मिड आणि स्मॉलकॅप मिळून ३० कंपन्यांचा समावेश आहे. या पैकी ७० टक्के कंपन्या लार्जकॅप गटात मोडतात. सर्वाधिक गुंतवणूक बँका आणि वित्तीय सेवा, तंत्रज्ञान ग्राहकउपयोगी वस्तू या तीन क्षेत्रांचा वाट ६७ टक्के आहे, जोखीम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून बॉटम-अप रणनीती नुसार कंपन्यांची निवड केली जाते. नवीन निधी व्यवस्थापकांनी अलीकडच्या काळात माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा क्षेत्रात गुंतवणूक वाढविली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पीबी फिनटेक (पॉलीसी बझार) इंफोएज या आघाडीच्या गुंतवणुका आहेत. इन्फोसिस आणि विप्रोमध्ये अनुक्रमे ३ टक्के आणि २.४ टक्के वाटप आहे. फंडाच्या पोर्टफोलीओत दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उद्देशाने, बजाज फायनान्स, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, अव्हेन्यू सुपरमार्ट्स आणि एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँक यांसारख्या कंपन्यांना स्थान दिले आहे.

निधी व्यवस्थापक सचिन रेळेकर यांची मागील दहा वर्षातील कामगिरी

वर्षफंडाचा परतावानिर्देशांक
२०१५(४,८९)(०.४५)
२०१६५.१४.४७
२०१७३९.५९३७.३२
२०१८(४.४५)(८.२८)
२०१९१२.६२६.९२
२०२०१४.५४१२.८९
२०२१३४.२७३२.६७
२०२२३.५४(०.३५)
२०२३२७.००२५.१९
२०२४२४.७७१९.०९

सक्रिय व्यवस्थापित लार्ज-कॅप इक्विटी फंडांना ‘निफ्टी १००’ किंवा ‘बीएसई १००’ सापेक्ष अधिक परतावा मिळविणे कठीण जात आहे. ‘सेबी’च्या नियमांनुसार, लार्ज-कॅप फंडांना एकूण मालमत्तेच्या किमान ८० टक्के लार्जकॅपमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सर्व साधारणपणे लार्जकॅप फंडात ८५ टक्के गुंतवणूक तर उर्वरित १५ टक्के गुंतवणूक मिडकॅप, स्मॉलकॅप आणि रोख रक्कमेत करीत आहेत. बहुतेक लार्ज-कॅप फंडाच्या गुंतवणुकीत ३०-५० कंपन्यांचा समावेश असतो . महत्त्वाचे म्हणजे, लार्जकॅप फंडाच्या पोर्टफोलिओचा मोठा हिस्सा लार्जकॅप केंद्रित असतो. फ्लेक्सिकॅप फंड गटात सरासरी ६८ टक्के गुंतवणूक लार्जकॅप कंपन्यांत आहे. मल्टीकॅप फंडात सरासरी ४१ टक्के गुंतवणूक लार्जकॅपमध्ये तर लार्ज अँड मिडकॅप फंडात सरासरी ५१ टक्के गुंतवणूक लार्जकॅप कंपन्यांत असल्याचे दिसते. एबीएसएल फोकस्ड इक्विटी, ॲक्सिस फोकस्ड ३० एचडीएफसी फोकस्ड इक्विटी , एचएसबीसी फोकस्ड इक्विटी , आयसीआयसीआय प्रू फोकस्ड इक्विटी, एलआयसी फोकस्ड ३०, महिंद्रा मॅन्युलाइफ फोकस्ड इक्विटी, मोतीलाल ओसवाल फोकस्ड आणि टाटा फोकस्ड इक्विटी या फंडांनी ७५ टक्के किंवा त्याहून अधिक गुंतवणूक लार्जकॅप मध्ये केली आहे. सचिन रेळेकर यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये या फंडाचे नियुक्त निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाल्यानंतर जोखीम कमी करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसते. त्याचवेळी त्यांनी काही धाडसी निर्णयसुद्धा घेतल्याचे दिसते. सचिन रेळेकर यांच्या कारकिर्दीचे मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीचे मूल्यमापन करणारे प्रगती पुस्तक सोबत दिले आहे. हा फंड, निधी व्यवस्थापक बदलाचा आणि फंडाच्या गुंतवणूक ढाच्यात केलेले बदल अशा दोन बदलांचा लाभार्थी दोन ते तीन वर्षात ठरण्याची शक्यता आहे. फोकस्ड इक्विटी फंड लार्ज-कॅप केंद्रित असल्याने गुंतवणूकदारांना एका सूटसुटीत पोर्टफोलीओचा लाभ घेता येतो. सहा ते सात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक असलेला आणि धाडसी पोर्टफोलिओद्वारे परतावा वाढविण्यासाठी फायद्याचा ठरू शकेल. उच्च जोखीम क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांनी या फंडाचा एसआयपी साठी जरूर विचार करावा.