देशाच्या प्रगतीसाठी सक्षम पायाभूत सुविधा हा नेहमीच आधारस्तंभ राहिला आहे. अमेरिकेमध्ये आलेल्या महामंदीनंतर उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते सुधार प्रकल्प हाती घेण्यात आले. दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये मागील २० वर्षांत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. परिणामी त्या देशातील एका पिढीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिवर्तन घडले. या देशांच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा ‘मल्टीमॉडल’ वाहतूक यंत्रणेचा होता. कार्यक्षम वाहतूक यंत्रणेमुळे वाहतूक खर्चात लक्षणीय घट होऊन निर्यात स्पर्धात्मकता वाढली. याच धोरणांवर आधारित भारत सरकारने एका मोठ्या आर्थिक परिवर्तनाची सुरुवात केली आहे. ‘पीएम गतीशक्ती’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत केवळ कामगार, बांधकाम साहित्य याची मागणी वाढण्यासोबत दळणवळणाचा खर्च कमी होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिझर्व्ह बँक आणि ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी’च्या अभ्यासानुसार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सरकारने केलेल्या प्रत्येक रुपयाच्या मागे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात ‘जीडीपी’त २.५ ते ३.५ पट वाढ होते. सरकारने या योजनेसारख्या ‘जीडीपी’ वाढीसाठी कारण ठरणाऱ्या ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ यासारख्या उत्पादन आधारित प्रोत्साहन अर्थात ‘पीएलआय’ योजना सरकारने आखल्या. या योजनांचा उद्देश भारतात उत्पादन क्षेत्राला चालना देण्याचा आहे. या सरकारी योजनांच्या लाभार्थी असलेल्या उत्पादन क्षेत्राशी निगडित असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करणारा ‘ॲक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड’ १ डिसेंबरपासून गुंतवणुकीस खुला झाला असून फंडाचा ‘एनएफओ’ १५ डिसेंबरपर्यंत खुला असेल. हा फंड गुंतवणुकीस कायम खुला असलेला फंड असून ‘निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग टीआरआय’ हा फंडाचा मानदंड असून श्रेयस देवलकर हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत.

हेही वाचा – Money Mantra : जीडीपीची सुखद आकडेवारी, दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ ७.६ % दराने

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या ढाच्यात ‘मेक इन इंडिया’ आणि वर उल्लेख केलेल्या धोरणात्मक योजनांमुळे मोठा बदल संभवत आहेत. या बदलांचा लाभ घेण्यासाठी हा थिमॅटिक फंड उपलब्ध करून दिल्याचे करणारा ॲक्सिस म्युच्युअल फंडाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. भारताच्या औद्योगिक रूपरेषा पुन्हा परिभाषित करणारी क्षेत्रे नव्याने उदयास येत असून या क्षेत्रांवर निधी व्यवस्थापक लक्ष केंद्रित करतील. नवीन युगातील तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शाश्वत विकासावर भर देणारी सरकारी धोरणे उत्पादन क्षेत्राला वेगळा आयाम देऊ घातली आहेत. सरकारी उपक्रम आणि कामगार आणि कर सुधारणा ‘पीएम गतीशक्ती योजने’सारखी सरकारी धोरणे भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादन केंद्र बनवत आहेत. इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत, भारतीय अर्थव्यवस्था निर्यातीपेक्षा मोठ्या प्रमाणावर उपभोगावर (कंझम्शन) अवलंबून आहे. अर्थव्यवस्थेवर त्यामुळे जागतिक आर्थिक अस्थिरतेचा परिणाम फारसा झालेला नाही. अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीमुळे उत्पादनांची देशाअंतर्गत मागणी वाढत आहे. परिणामी अर्थव्यवस्थेच्या ढाच्यात होणारे बदल आत्मसात करण्यास आपण सक्षम होत असल्याचे दिसत आहे. उत्पादन क्षेत्रासाठी अनुकूल धोरण सरकारी प्रोत्साहन आणि जागतिक स्पर्धक अर्थव्यवस्थांच्या तुलनेत वाढीव स्पर्धात्मकतेमुळे भारतीय उत्पादन क्षेत्र वेगाने बदलत आहे.

‘ॲक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड’ या बदलांचा मागोवा घेणारा फंड गुंतवणूकदारांना संपत्ती निर्मितीची संधी देत आहे. हा फंड भारताच्या उत्पादन कौशल्याची व्यापकता प्रतिबिंबित करणारा फंड असेल. भांडवली वस्तू आणि ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते वस्त्रोद्योग आरोग्य निगेपर्यंतच्या उद्योगांतील गुंतवणुकीच्या संधी हेरून गुंतवणूकदारांना भारताच्या उत्पादन यशोगाथेमध्ये सहभागी होण्यासाठी एक व्यापक मार्ग अधिक रुंदावणारा फंड असेल. या फंडाच्या गुंतवणुकीत माहिती तंत्रज्ञान आणि बँकिंग या महत्त्वाच्या उद्योगांना स्थान नसेल.

हेही वाचा – तुम्ही ‘अर्थसाक्षर’ आहात?

या फंडाचा उद्देश,

  • क्षमता वाढ (कॅपेक्स सायकल) : उत्पादक उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कारखाना उपकरणे, संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक करणे.
  • उपभोग (उत्पन्न वाढल्याने प्रीमियमायझेशन होते) : देशाअंतर्गत उपभोग आणि उत्पादन वैविध्यामुळे वाढत्या मागणीच्या मार्गावर असलेले उद्योग,
    निर्यात प्रधान (पर्यायी आयात उत्पादनांवर) : जागतिक पुरवठा साखळीचा भाग असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करणे हा आहे.

या फंडाचा पोर्टफोलिओ ‘मल्टी-कॅप’ धाटणीचा आणि ‘बॉटम-अप’ रणनीतीचा अवलंब करणारा असेल. सक्रिय सेक्टरल गुंतवणुकीची ‘गुणवत्ता’ शैली अंगीकारण्याबरोबरच, निर्देशांकात कमी प्रतिनिधित्व असलेल्या उद्योग क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. हा फंड थिमॅटिक फंड आणि कंपन्यांचे ध्रुवीकरण असलेला फंड असल्याने सर्वाधिक जोखीम असणारा हा फंड आहे (संदर्भ : रिस्कोमीटर). बाजारात जोखीम आणि परतावा एकाच नाण्याच्या बाजू असल्याने जोखीम स्वीकारून अधिक परताव्याची आस असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श साधन आहे. आपआपल्या जोखीम सहिष्णुततेनुसार गुंतवणूकदारांनी या फंडाची निवड करावी.

निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंगनिफ्टी ५००निफ्टी ५०
वाहन आणि वाहन पूरक उत्पादने२७.०२ ६.२१६.०५
भांडवली वस्तू२१.१३४.७५
आरोग्य निगा१५.२४५.४८४.०९
धातू आणि खनिज उत्पादने११.४८३.३१ ३.७०
रसायने१०.४१२.५९०.३५
तेल आणि वायू७.२६८.५७११.३५
ग्राहकोपयोगी वस्तू५.१८३.६७३.२४
वस्त्रोद्योग१.४८ ०.४१  ०
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Axis india manufacturing fund has been opened for investment from december 1 print eco news ssb