बजाज उद्योग समूहातील एक मोठा व्यवसाय असलेल्या बजाज फिनसर्व्ह या कंपनीने या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत १९४३ कोटी रुपये एवढा नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास या नफ्यामध्ये ४८% इतकी दमदार वाढ झालेली आहे. या कंपनीचा प्रमुख व्यवसाय असलेला ‘जनरल इन्शुरन्स’ म्हणजेच सर्वसाधारण विमा व्यवसाय आता दमदार व्यवसाय करत आहे. त्यामुळे कंपनीच्या नफ्यात घसघशीत वाढ झालेली दिसून येते. जीवन विमा व्यवसायामध्ये पाहिजे तशी वाढ झालेली नसली तरीही एकंदरीत विमा क्षेत्रात बजाज समूहाने आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. नवीन आर्थिक वर्षाचा पहिला तीन महिन्याचा कालावधी विमा विकत घेण्यासाठी आदर्श मानला जात नाही. कारण बऱ्याचदा टॅक्स वाचवण्यासाठी अशा पॉलिसींमध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणून ‘युलीप प्रॉडक्ट’ बाजारात आणण्यावर आणि त्याची जोरदार प्रसिद्धी करण्यावर कंपनीने भर दिला.

बजाज फिनसर्व्ह या कंपनीचा व्यवसाय विस्तार लक्षात घेतला तर बजाज फायनान्स लिमिटेड, बजाज फिनसर्व्ह हेल्थ लिमिटेड, बजाज फिनसर्व्ह वेंचर लिमिटेड, बजाज फिनसर्व्ह असेट मॅनेजमेंट लिमिटेड, बजाज फिनसर्व्ह म्युच्युअल फंड, बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्स कंपनी या कंपन्या बजाज फिनसर्व्ह या कंपनीच्या उप कंपन्या म्हणून कार्यरत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ‘कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी’ असे तिचे कार्यक्षेत्र आहे. भारतातील एकूण दहा कोटी ग्राहक वर्गांपर्यंत कंपनी पोहोचली आहे.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
Silver prices fall and gold prices also change
चांदीच्या दरात घसरण… सोन्याच्या दराने…

आणखी वाचा: Money Mantra: आयटीसी आणि आयटीसी हॉटेल यांचे डीमर्जर; शेअरहोल्डर्सना काय मिळणार?

बजाज फायनान्स या कंपनीच्या उपकंपनीने एक विक्रम नोंदवला. ९.९४ दशलक्ष कर्ज खाती कंपनीच्या नावावर नोंदली गेली. याच बजाज फायनान्सने तिमाहीत व्याजावरील उत्पन्नामध्ये २६ टक्के वाढ नोंदवत ८३९८ कोटी एवढे व्याजावरील उत्पन्न कमावले.

या कंपनीसाठी महत्त्वाचा ठरतो तो व्ही. बी. एन. अर्थात व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस याद्वारे मिळणारा उत्पन्नाचा आकडा. विमा व्यवसाय आणि कर्ज देणे या व्यवसायांमध्ये दर महिन्याला सतत नवीन ग्राहक जोडणे, त्यांना पॉलिसी विकणे, नवीन कर्ज देणे सुरू असायला हवे. या तीन महिन्यात व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस मधून मिळणारे उत्पन्न ३० टक्क्यांनी कमी झालेले दिसले.

आणखी वाचा: Money Mantra: फ्यूचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे नेमकं काय?

बजाज फिनसर्व्हने आपला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू केला आहे. भारतीय बाजारांमध्ये पारंपरिक गुंतवणूक पर्यायांपेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक लाभदायक आहे असे मानणारा ग्राहक वर्ग तयार झाला आहे. त्यासाठी या ग्राहक वर्गासाठी बजाज फिनसर्व्हने आपल्या नव्या रणनीतीचा अवलंब करत म्युच्युअल फंड व्यवसायात दमदारपणे उतरायचे ठरवले आहे. एप्रिल २०२३ मध्ये कंपनीने काही निवडक सेवा सुरू केल्या आहेत. आगामी काळात या म्युच्युअल फंड व्यवसायापासून कंपनीला कसे उत्पन्न मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतातील एन.बी.एफ.सी. (नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनी) क्षेत्र सतत वाढणार आहे. छोट्या गृहपयोगी वस्तूंपासून चैनीच्या वस्तूंपर्यंत कर्ज घेणे आणि कर्ज देणे हा व्यवसाय सतत सुरूच राहणार आहे. याचा फायदा कंपनीला होऊ शकतो करोना महामारीच्या काळात विमा व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित झाले. वैयक्तिक, कौटुंबिक आणि अपघाती विमा अशा सर्व व्यवसायांना आगामी काळात चांगले दिवस येणार आहेत. मात्र नवनवीन ग्राहक जोडणे आणि सतत प्रीमियम उत्पन्नामध्ये भर पाडत राहणे हे विमा व्यवसायापुढील आव्हान ठरणार आहे.

१४ ऑगस्ट रोजी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत १४८२ रुपये एवढी होती. गेल्या वर्षभरातील शेअरचा प्रवास बघता उच्चांकी भाव १८४४ तर ५२ आठवड्यातील कमीत कमी किंमत १२१५ रुपये एवढी होती. दलाली पेढ्यांनी मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी या शेअरची शिफारस केलेली आहे. अर्थातच गुंतवणूकदारांनी स्वतः अभ्यास करून व स्वतःच्या वैयक्तिक जोखीवर या शेअरची खरेदी करावी.

Story img Loader