प्रमोद पुराणिक

जो मान्सुएटो (यांचा यापुढे उल्लेख जो असा करणार आहोत ) या व्यक्तीने १६ मे १९८४ मध्ये आपल्या शिकागो येथे मॉर्निंगस्टार या विश्लेषण, संशोधन, समभागांची माहिती आणि विविध अहवालांचे विश्लेषण करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. मॉर्निंगस्टार ही आता अमेरिकेतील एक मोठी कंपनी असून त्या कंपनीमध्ये सुमारे दहा हजार कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील वर्षी या कंपनीच्या कामकाजाला ४० वर्षे पूर्ण होतील.

‘बाजारातील माणसं’ या लेखमालेत जो यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे. अमेरिकी निसर्गवादी, निबंधकार, कवी आणि तत्त्वज्ञ असलेले हेन्री डेव्हिड यांचे ‘सूर्य हा सकाळचा तारा आहे’ या वाक्यावरून मॅार्निंगस्टार हे नाव कसे सुचले आहे. २००५ मध्ये मॉर्निंगस्टारने लिलावपद्धतीने समभागांची विक्री केली. तसेच २०१२ मध्ये दुबईला कार्यालय थाटले. ही दौड अशीच राखत २०१६ मध्ये पिंच बँक डाटा इनकॅार्पोरेटेड ही कंपनी ताब्यात घेतली. तर २०१८ मध्ये कंपनीचे उत्पन्न १ अब्ज डॅालरवर पोहचले. ही कंपनी संशोधन, सेवा, कार्यशाळा अशा तीन क्षेत्रांत काम करते. कंपनीची उत्पादने आणि सेवा ही वैयक्तिक गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीच्या व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांना उपयोगी आहेत.

आणखी वाचा-Money Mantra : सुरक्षित क्रेडिट आणि डेबिट कार्ड पिन कसा तयार करायचा?

जो यांनी वयाच्या २७ व्या वर्षी कंपनी सुरू केली, त्याअगोदर ते भांडवली बाजार विश्लेषक म्हणून काम करत होते. १९८४ ते २०१६ पर्यंत त्यांनी मुख्य कार्यकारी आणि सध्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. या कंपनीचे बाजार मूल्यांकन सुमारे ८ अब्ज डॉलरच्या घरात आहे. कंपनीची भरपूर माहिती वेगवेगळ्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. ती माहिती जशीच्या तशी उतरवून कंपनीची जाहिरात करणे हा या लेखाचा उद्देश नसून भांडवली बाजारात फक्त समभागांची खरेदी-विक्री करून नफा कमावता येतो असा विचार करणे चुकीचे आहे. याउलट बाजाराला कोणत्या गोष्टींची गरज असते हे जर समजले, तर भांडवली बाजार हे एक व्यासपीठ आहे. नवीन शोधांचे उद्यमशीलतेचे समाजाच्या प्रगतीचे हे एक प्रतिबिंब असते.

भांडवली बाजार हा शेवटी एक व्यवसाय आहे. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने हा बाजार पूर्ण करतो. प्रगतीचे भविष्यातील कथानक लिहिणारे फक्त भांडवली बाजारामुळेच ते स्वप्न सत्यात आणू शकतात. उत्पादनापेक्षा ही आगामी काळात सेवा क्षेत्राला अधिक महत्त्व येईल आणि सेवा क्षेत्रातील निर्मिती हे उत्पादन म्हणून विकले जाईल याची कल्पना करणे अवघड होते. पण बाजाराला सेवा पुरवणे हादेखील एक मोठा व्यवसाय होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.

आणखी वाचा- Money Mantra: शेअर बाजारात उतरताय तर ‘हे’ लक्षात ठेवाच!

सुरुवातीला समभाग आणि त्यानंतर म्युच्युअल फंड हा उद्योग प्रचंड वेगाने वाढला. या उद्योगांचे संशोधन, सेवा, कार्यशाळा अशा प्रकारच्या गरजा निर्माण झाल्या. अमेरिकेत १९२३ मध्ये म्युच्युअल फंड उद्योगाची सुरुवात झाली. पुढील वर्षी उद्योग अमेरिकेत जन्मशताब्दी वर्ष साजरे करेल. मॉर्निंगस्टारच्या डॉन फिलीप या व्यवस्थापकीय संचालकाने छोट्या गुंतवणूकदारांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मॉर्निंगस्टार प्रसिद्ध करीत असलेल्या अहवलाचे १९८६ ला झालेमी ते पहिले विश्लेषक संपादक आहेत. ऑगस्ट १९९९ मध्ये त्यांना कंपनीच्या संचालक मंडळात प्रवेश देण्यात आला. २००३ आणि २००४ या वर्षात अमेरिकेतील इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर या मासिकाने डॅानचा विशेष सत्कार केला. वित्तीय नियोजन या क्षेत्रातील सर्वात मोठा प्रभाव टाकणारा माणूस म्हणून त्याची निवड केली. २००६ मध्ये फायनान्स प्लॅनिंग या मॅग्झिननेदेखील त्यांचा गौरव केला. त्यांनी टेक्सास विद्यापीठातून इंग्रजी या विषयातील पदवी संपादन केली. तर अमेरिकी वाङ्मय या विषयात शिकागो विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड हा विषय आत्मसात करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड सध्या असून विविध क्षेत्रांत गुंतवणूक करणारे सेक्टोरल फंड, इंडेक्स फंड, एक्स्चेंज ट्रेडेड फंड, ग्लोबल डिव्हिडंड यील्ड फंड, रिटायरमेंट फंड असे असंख्य प्रकार आहेत. ही नुसती नावे वाचताना दमछाक होते. अशा वेळी गुंतवणूकदारांसाठी मॉर्निंगस्टार मदतीला धावते. म्युच्युअल फंडाचा व्यवसाय करणाऱ्या म्युच्युअल फंड वितरकालादेखील मॉर्निंगस्टारची फार मदत होते. यामुळे भारतातदेखील मॉर्निंगस्टारने भारतीय म्युच्युअल फंडाच्या विविध योजना, त्या योजनांची कामगिरी यावर नियमित स्वरूपात लेखन प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या व्यक्तींना प्रमुख वक्ते म्हणून कार्यशाळेत बोलावणे. तसेच देशात आणि परदेशात काय काय बदल होत आहेत? बाजार नियंत्रक, त्यांची धोरणे अशा विविध विषयांवर मॉर्निंगस्टारच्या भारतातील शाखा काम करीत असते. या संस्थेचे हे काम बाजाराच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.

Story img Loader