डॉ. आशीष थत्ते

पूर्वीच्या काळात बँकांमध्ये मुदत ठेव अर्थात एफडी करण्यात लोकांचा अधिक भर होता. आता मात्र गेल्या काही वर्षांत भांडवली बाजार किंवा त्याहून अधिक जोखीमयुक्त अशा क्रिप्टोकरन्सीसारख्या आभासी चलनांकडे गुंतवणूकदारांची पावले वळू लागली आहेत. गुंतवणुकीचे हे आधुनिक अन तंत्रज्ञानामुळे सोपे आणि जोखीम घेतल्यास चांगला परतावा मिळवून देणारे मार्ग आहेत. तरीही काही वेगळ्या मार्गांविषयी थोडासा विचार जरूर करावा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी तर नक्कीच करावा. वेगळा मार्ग म्हणजे जुनी नाणी गोळा करणे. अर्थात जेवढी मोठी जोखीम तेवढा मोठा परतावा मिळण्याची संधीदेखील असते. एक गोष्ट नक्की की फक्त जुन्या नाण्यांमध्ये गुंतवणूक करणे हा काही गुंतवणुकीचा एकच मार्ग नव्हे तर इतर सरधोपट किंवा पारंपरिक मार्ग अवलंबून झाल्यावर जर फेरबदल करावासा वाटला तरच हा मार्ग निवडावा. कारण जुनी नाणी गोळा करणे किंवा ती विकत घेणे अतिशय कठीण काम असते. ज्याला यात गुंतवणूक करायची असेल त्याला पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
PMC Bank Scam Hearing on petitions of aggrieved account holders on December 12 mumbai news
पीएमसी बँक घोटाळा; पीडित खातेधारकांच्या याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी
Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ

अपारंपरिक प्रकारच्या अशा गुंतवणुकीमध्ये अल्पकालीन फायद्याची अपेक्षा ठेवणे योग्य नसते. तर दीर्घकालीन फायदा हे उद्दिष्ट असल्यास ते साध्य करता येऊ शकते. जुन्या नाण्यांचा बाजारामध्ये शेअर बाजाराप्रमाणेच चढउतार होतात. त्यावरती लक्ष ठेवायला सध्या बरेच संकेतस्थळे किंवा नियतकालिकेदेखील असतात. जुन्या नाण्यांचा बाजार आता पूर्वीप्रमाणे राहिला नसून नाण्यांची प्रत, त्याची सत्यता, परिभाषित मानकेदेखील आता बघितली जातात. काही अनुभवी आणि सल्लागार मंडळीदेखील क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकते. नाण्यांची खरेदी आणि विक्री करणारी संकेतस्थळे कार्यरत असून नुसती माहितीदेखील त्यावर आहे. जुन्या ऐतिहासिक नाण्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींशी बोलणे, पुस्तके वाचणे, नाण्यांचे प्रदर्शन बघायला जाणे किंवा त्यांचा क्लबमध्ये जाऊन तुम्ही तुमचे या क्षेत्रातील ज्ञान वाढवू शकता. एक गोष्टसुद्धा ध्यानात ठेवली पाहिजे, ती म्हणजे ‘जुने नाणे म्हणजे खूप किंमत’ असे असेलच असे नाही. नाण्याची किंमत त्याच्या उपलबद्धतेवर आणि त्याची किंमत करणाऱ्या गिऱ्हाईकावर अवलंबून असते.

नाणी व पदके याच्या अभ्यासाचेदेखील एक शास्त्र आहे त्याचे नाव न्यूमिस्मेटिक्स किंवा अंकशास्त्र असे आहे. या शास्त्रात नाणे कसे हाताळावे, नोटा कशा जपून ठेवाव्यात इत्यादींचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो. जसे सुमारे १०-१२ वर्षांपूर्वी राजस्थानात २ चोरांना पकडण्यात आले. त्यांचा गुन्हा म्हणजे एक रुपयाच्या नोटांचे बंडल त्यांनी चोरले ज्याची किंमत लाखांच्या घरात होती. या नोटा १९६४ मध्ये तत्कालीन वित्त सचिव भूतलिंगम यांच्या सहीच्या होत्या. थोडक्यात सांगायाचे म्हणजे, आपल्या देशात जुन्या नाण्यांची बाजारपेठ आहे व कायदेशीर व्यवहार केला तर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून निवडता येऊ शकतो. भारतात पुरातन वस्तूंचा कायदा अस्तित्वात आहे. त्यामुळे त्या कायद्याअंतर्गत नाण्यांची खरेदी व विक्री करावी जी पूर्णपणे कायदेशीर आहे. नवशिक्यांना सुरुवात करताना स्मारक नाण्यांनी (कॉमेमोर्टिव्ह) करता येऊ शकते. रिझर्व्ह बँक अशी नाणी मुंबई व कोलकाता येथे विकतात. जरा आठवून बघा जुने १ पैशाचे नाणे कुठे अडगळीत मिळते काय? त्याची किंमत आज १५० रुपयांच्या घरात आहे. असेल तर जपून ठेवा, ५० वर्षांनी कदाचित माझी नक्कीच आठवण येईल.

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाऊंटंट म्हणून कार्यरत /ashishpthatte@gmail.com
@AshishThatte