आजकाल ई मेल अथवा एसेमेस द्वारा फसवणूक होत असल्याचे वारंवार दिसून येते. विशेष म्हणजे याला बळी पडणारे सुशिक्षित असतात. याचे एकमेव कारण म्हणजे विनासायास झटपट पैसे मिळविण्याची अभिलाषा हेच होय. कशी होते ही फसवणूक हे आपण आज पाहू.

आपल्यापैकी बहुतेकांना आजकाल मेल अथवा एसएमएसद्वारा कोका कोला, मायक्रोसॅाफ्ट एखादी परदेशी बँक, किंवा एखादी परदेशी मोठी कंपनी यांनी आपल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीची लकी ड्रॉमध्ये निवड केली आहे व काही प्राथमिक माहिती व किरकोळ अटींची पूर्तता केल्यास काही कोटी/लाख रुपये आपल्या नावावर परस्पर जमा केले जातील. अशी मेल अथवा एसेमेस खरा आहे असे वाटण्यासाठी अशा कंपन्याच्या वेबसाईटसारख्या तंतोतंत दिसणाऱ्या पण प्रत्यक्षात नकली वेबसाईट वरून अशा मेल /एसएमएस केले जातात. यावर असणारी नावे, फोटो, शिक्के हे ही खरे असल्याचे भासविले जाते. तसेच संपर्क करण्यासाठीचा फोन नंबर व मेल आयडी सुद्धा दिलेला असतो.

Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…

आपण जर त्यांना फोन अथवा मेल केला की तेथून पुढे या फसवणुकीची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. प्रथम अशा व्यक्तीस अगदी किरकोळ रक्कम उदा: (रु.५०० किंवा रु.१००० ) काही प्रारंभिक खर्चासाठी एका खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते. तसेच आपली मूलभूत माहिती नाव, जन्म तारीख, पत्ता, पॅन कार्ड नंबर, बँकेचे नाव, खाते नंबर, आयएफएससी याची माहिती पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक असल्याचे भासवून देण्यास सांगतात. त्यानंतर एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी परदेशी बँकेचे कमिशन, व अन्य किरकोळ खर्चासाठी म्हणून रु.१ ते २ लाख इतकी रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते. मोठी रक्कम मिळणार या आशेने अशी रक्कम त्वरित ट्रान्सफर केली जाते. एकदा का अशी रक्कम ट्रान्सफर झाली की मग मेल किंवा फोन येण्याचे बंद होते. आपण जर दिलेल्या नंबरवर फोन केला तर नंबर उपलब्ध नसल्याचे दिसून येते किंवा मेल केली तर उत्तर येत नाही असे वारंवार केल्यानंतर फसवणूक झाल्याचे कळून येते मात्र तोवर वेळ निघून गेलेली असते.


अशाप्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी पुढील प्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे.
१)असा कुठल्याही प्रकारचा एसएमएस अथवा मेल आल्यास त्याला प्रतिसादच देऊ नये. शक्य असेल तर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सायबर क्राईम विभागाकडे याची माहिती द्यावी.
२) आपल्या माहितीच्या वेबसाईटवरून जरी मेल आली असली तरी सर्व प्रथम त्या कंपनीस याची कल्पना द्यावी कारण बहुतांशवेळा या वेबसाईट हॅक केलेल्या असतात. आपल्या मित्राच्या /ओळखीच्या मेल आयडीवरून मेल आली असेल तर त्याला फोन करून याची जाणीव करून द्यावी जेणेकरून दुरुपयोग टाळता येईल.
३) आपले बँकेतील व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करताना आपला युजर आयडी, पासवर्ड, कार्ड पिन नंबर गुप्त राहील याची खबरदारी घ्या.
४) एवढी मोठी रक्कम अशी अचानक काहीही न करता बक्षीस म्हणून मिळत नसते याचे भान ठेवावे.
५) आपण एखादी आपल्याला निरुपयोगी वाटणारी वस्तू ओएलक्स किंवा तत्सम साईटवर विक्रीस टाकली तर कुणीतरी आपल्याला ही वस्तू मला घ्यायची आहे असा फोन करून आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत देऊ करतो. त्यासाठी सुरवातीस एक क्यू आर कोड पाठवून रु.१०० सारखी किरकोळ रक्कम पाठवण्यास सांगतात. वस्तुत: जो पैसे पाठविणार तो ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा क्यू आर कोड स्कॅन करून पैसे पाठवीत असतो मात्र हे लक्षात न आल्याने विक्रेता तोतया ग्राहकाचा क्यू आर कोड स्कॅन करून टेस्ट केस म्हणून सुरवातीस किरकोळ रक्कम पैसे पाठवितो. वस्तूस अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळत आहे या प्रलोभनाला बळी पडून विक्रेता असे करत असतो मात्र त्यानंतर त्याच्या खात्यातूनच मोठी रक्कम परस्पर भलत्याच खात्यावर ट्रान्स्फर होते व फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशा फसवणुकी पासूनसुद्धा सावध राहिले पाहिजे.