Inactive PAN: प्राप्तिकर विभागानं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख ३१ जुलै निश्चित केली होती. परंतु ज्या करदात्यांचं पॅन कार्ड निष्क्रिय झाले आहे, ते आता पॅन कार्ड वापरू शकत नाहीत. त्यांना आधी दंड भरून ते पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करावे लागेल. परंतु प्रवासी भारतीयांसाठी प्राप्तिकर विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे.
NRIsला मिळणार पत्त्याची खातरजमा करण्याचा पर्याय
प्राप्तिकर विभागानं मंगळवारी सांगितले की, अनिवासी भारतीय (NRI) आणि परदेशी नागरिक ज्यांचे पॅन आधारशी लिंक न केल्यामुळे निष्क्रिय केले गेले आहे, त्यांनी निवासी पत्त्याचा पुरावा संबंधित मूल्यांकन अधिकाऱ्याकडे ते पुन्हा सुरू करण्यासाठी सादर करावा. काही परदेशी नागरिकांनी जे प्रवासी भारतीय आहेत, त्यांनी पॅन कार्ड निष्क्रिय होण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
३ वर्षांपासून प्राप्तिकर परतावा भरलेला नसल्यास…
प्राप्तिकर विभागाने ट्विटरवर लिहिले आहे की, निवासी व्याख्या हे अनिवासी भारतीयांच्या संदर्भात निर्धारित करण्यात आलेली आहे. ज्यांनी गेल्या तीन मूल्यांकन वर्षांपैकी कोणत्याही वर्षात आयटीआर दाखल केला आहे किंवा त्यांच्या निवासी स्थितीबद्दल संबंधित मूल्यांकन अधिकाऱ्याला (JAO) माहिती दिली आहे, असे लोक निवासी भारतीय म्हणून गणले जातात.
हेही वाचाः यूट्यूबवरच्या कमाईवरही आता इन्कम टॅक्स विभागाचा डोळा; पै न् पैचा हिशेब ठेवा अन्यथा…
विभागाच्या म्हणण्यानुसार, एनआरआयने गेल्या तीन मूल्यांकन वर्षांत त्याची निवासी स्थिती अपडेट केली नाही किंवा रिटर्न भरले नाहीत ,अशा प्रकरणांमध् त्यांचे पॅन निष्क्रिय होते. “ज्या अनिवासी भारतीयांचे पॅन निष्क्रिय आहेत, त्यांना त्यांच्या संबंधित मूल्यांकन अधिकार्यांकडे संबंधित कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली जाते आणि पॅन संबंधित माहितीमध्ये त्यांची निवासी स्थिती अद्ययावत करण्याची विनंती केली जाते,” असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.