आज स्वतःचं घर घेणं, गाडी खरेदी करणं, देशात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेणं, स्वतःचा लहान मोठा स्टार्ट अप सुरु करणं, उत्तम समारंभात थाटाने किंवा शक्य झालं तर एखाद्या जवळच्या रमणीय स्थळी ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करणं या मध्ये आता काही नावीन्य राहिलेलं नाही. आज बहुतेक सर्वचजण या पैकी बऱ्याच गोष्टी करत असतात. या सर्वांसाठी स्वतः साठवलेले पैसे खर्च करणं बहुतेकांना शक्य नसतं. त्यासाठी कर्ज घ्यावं लागत. बँकांनी यातील प्रत्येक गोष्टीसाठी स्वतंत्र कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण ते कर्ज मिळवण्यासाठी स्वतःजवळची काही रक्कम भरावी लागते. बऱ्याच लोकांकडे ही रक्कम नसते. ती रक्कम उभी करण्यासाठी त्यांच्याकडे एक सोपा आणि चांगला मार्ग उपलब्ध असतो तो म्हणजे – ‘पर्सनल लोन’ म्हणजे ‘वैयक्तिक कर्ज’ घेणे !

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येनुसार ‘एखाद्या व्यक्तीला त्याच्या वैयक्तिक खर्चासाठी व्याज आकारून कर्जाऊ दिलेली रक्कम म्हणजे ‘पर्सनल लोन’ किंवा ‘वैयक्तिक कर्ज’ ‘! पर्सनल लोनचा उपयोग ती व्यक्ती सामान्यतः शिक्षणासाठी, नवी मालमत्ता घेण्यासाठी किंवा जुन्या मालमत्तेची दुरुस्ती करण्यासाठी अथवा ‘समभाग’ किंवा अन्य प्रकारच्या गुंतवणुकीसाठी, किंवा त्याच्या अन्य गरजेसाठी वापरू शकते.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

पर्सनल लोनची, बँकांकडून मिळणाऱ्या गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा अन्य तत्सम कर्जांच्या तुलनेत, दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत:

१. इतर कर्जाच्या बाबतीत, ज्या कामासाठी ते कर्जाची रक्कम घेतली आहे तेच काम त्या रकमेतून पूर्ण करणं बंधनकारक असतं. म्हणजे गृहकर्जाच्या रकमेतून घर घेणं किंवा वाहन कर्जातून वाहन घेणं अनिवार्य असतं. अशा प्रकारचं कोणतंही बंधन पर्सनल लोन वर नसतं. पर्सनल लोन द्वारे घेतलेली रक्कम, कर्ज घेणारी व्यक्ती तिच्या इच्छे नुसार खर्च करू शकते.

२. इतर कुठलंही कर्ज घेताना कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला, त्या कर्जाच्या रकमेइतकी किंवा कधीकधी त्यापेक्षा थोडी जास्त रक्कम, बँकेकडे तारण ठेवावीच लागते. पर्सनल लोन घेण्यासाठी बँक किंवा आर्थिक संस्थेकडे कोणतंही ‘तारण’ ठेवणं अनिवार्य नसतं. पर्सनल लोन, बँकेकडे काहीही तारण ठेवलं नाही तरी सुद्धा मिळू शकतं. अशा प्रकारच्या तारण न ठेवता घेतलेल्या पर्सनल लोनला ‘अनसिक्युअर्ड पर्सनल लोन’ असं संबोधलं जातं तर तारण ठेऊन घेतलेल्या पर्सनल लोनला ‘सिक्युअर्ड पर्सनल लोन’ असं संबोधतात. बँका आणि वित्तीय संस्था सिक्युअर्ड पर्सनल लोनच्या तुलनेत अनसिक्युअर्ड पर्सनल लोन वर अधिक व्याजदर आकारतात.

इतर कर्ज घेताना आपण कर्जाऊ मिळालेली रक्कम कशी खर्च करणार आहोत त्याचे सारे तपशील बँकेला द्यावे लागतात .म्हणजे, गृहकर्ज घेत असताना आपण घेत असलेल्या घराचे किंवा वाहन कर्ज घेत असताना आपण खरेदी करत असलेल्या वाहनाची सर्व माहिती बँकेला द्यावी लागते. पर्सनल लोन मिळवण्याची असे काही तपशील देण्याची गरज नसते त्यामुळे साहजिकच पर्सनल लोन मिळवण्याची पद्धती त्यामानाने सोपी असते.

हेही वाचा… Money Mantra: ऑनलाईन गेममधून जिंकलेल्या रक्कमेवर किती कर आकारला जातो?

पर्सनल लोन मिळवण्यासाठी बँकेला एक औपचारिक अर्ज द्यावा लागतो. बँक अर्जदाराच्या उत्पनाचा स्रोत आणि त्याची आर्थिक पत तपासून पाहते. तो अर्ज मंजूर झाला तर बँक कर्जाच्या अटी- शर्ती, व्याजदर आणि इतर बाबींची माहिती अर्जदाराला देते. इतर कर्जांप्रमाणे पर्सनल लोनच्या अटीशर्ती ‘सर्वांसाठी’ समान आणि सुनिश्चित असतातच असं नाही. बऱ्याचवेळा अर्जदाराची आर्थिक पत पाहून त्याच्यासाठी योग्य अति-शर्ती आणि व्याजदर ठरवले जातात. त्या सर्वांची माहिती बँक अर्जदाराला देते. अर्जदाराने त्या अटी-शर्ती स्वीकारल्या तर त्यानुसार करार आणि आवश्यक ती कागदपत्रं तयार केली जातात. कागदपत्रांवर दोन्ही बाजूंच्या सह्या झाल्यावर बँक कर्जाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा करते किंवा त्याला त्या रकमेचा चेक देते. त्यानंतर ठरलेल्या अटी-शर्ती नुसार कर्जाची परतफेड करण्याची प्रक्रिया सुरु होते. वेळेत कर्ज न फेडल्यास बँक कर देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करते. जर लोन सिक्युअर्ड असेल तर बँक तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करते. जर लोन सिक्युअर्ड नसेल तर कोर्ट केस किंवा अन्य मार्गानी बँक आपले पैसे वसूल करते. पुढील मनस्ताप आणि मोठं आर्थिक नुकसान टाळायचं असेल तर पर्सनल लोन काटेकोरपणे ठरलेल्या मुदतीत परत करणं अतिशय आवश्यक ठरतं.

कर्ज ठरलेल्या अटी-शर्ती नुसार आणि ठरलेल्या मुदतीत फेडण्यासाठी सर्वात महत्वाची बाब लक्षात घ्यावी, ती म्हणजे – पर्सनल लोनच्या अटी -शर्ती सर्वांना समान नसतात. बँक त्या तिच्या सोयीनुसार ठरवत असते. त्यामुळे बँकेने आपल्याला दिलेल्या अटी-शर्ती मान्य करण्या पूर्वीच त्या अटीशर्तींचा सखोल आणि सर्वांगीण विचार करावा. त्यानंतर आपण पूर्ण करू शकू अशाच अटी -शर्ती स्वीकारव्यात. म्हणजे, समजा आपल्याला १०,०००/- रुपयांचं पर्सनल लोन घ्यायचं आहे. त्यासाठी बँकेने आपल्या समोर दोन पर्याय ठेवले आहेत. ७% व्याजदराने कर्ज घेऊन दोन वर्षात ते फेडायचं किंवा २. कर्ज तीन वर्षात फेडायचं. त्यासाठी व्याजदर सुद्धा कमी म्हणजे ६%असेल.
प्रथमदर्शनी आपल्याला दुसरा पर्याय अधिक चांगला वाटतो आणि आपण तो स्वीकारतो. पण थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की, पहिल्या पर्यायात दिल्याप्रमाणे ७% दराने १०,००० रुपयांवर वर्षाला ७०० /- रुपये व्याज द्यावं लागतं. दोन वर्षात व्याजाची एकूण रक्कम १४००/ रुपये होते.

कर्ज ठरलेल्या अटीशर्तीनुसार फेडण्यासाठी सर्वात महत्वाची बाब लक्षात घ्यावी. ती म्हणजे , पर्सनल लोनच्या अटी -शर्ती सर्वांना समान नसतात. बँक त्या तिच्या सोयीनुसार ठरवत असते. दुसऱ्या पर्यायाचा विचार केला तर ६% व्याजदराने १०,००० /- रुपयांवर प्रत्येक वर्षी ६००/- रुपये भरावे लागतात. तीन वर्षांत मिळून एकूण १८००/- रुपये भरावे लागतात. म्हणजे प्रथमदर्शनी आकर्षक वाटणाऱ्या पर्यायात व्याजापोटी एकूण ४००/ रुपये जास्त भरावे लागतात. म्हणजे व्याजाच्या रकमेच्या दृष्टीने विचारलेला तर दुसरा पर्याय अधिक फायदेशीर आहे.

हे समजून घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपल्या उत्पन्नातून संपूर्ण कर्ज आपण दोन वर्षात फेडू शकतो का? की, आपल्याला तितके पैसे उभे करण्यासाठी तीन वर्ष लागतील याचा वस्तुनिष्ठ विचार करावा आणि त्यानंतर निर्णय घ्यावा!

घर घेताना स्वतः भरायची रक्कम उभी करण्यासाठी किंवा घरात उदभवलेल्या एखाद्या व्यक्तीच्या आजारपणासाठी पर्सनल लोन घेणं गरजेचं ठरतं. पण बरेचवेळा लग्न समारंभ अधिक दिमाखदार करण्यासाठी किंवा कौटुंबिक सहलींसाठी पर्सनल लोन घेतलं जातं. यामध्ये गरजेपेक्षा मोहाचा भाग अधिक असतो. असं अनावश्यक कारणांसाठी घेतलेलं पर्सनल लोन फेडताना कुटुंबातील कमावत्या माणसांची दमछाक होते. त्यामुळे या कारणांसाठी पर्सनल लोन घेणं टाळावं.

पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या एका मित्राच्या तरुण मुलाने काही कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले. त्यात त्याला फायदा मिळाला. त्या फायद्यातून त्याने पुनः शेअर्स खरेदी केले. यावेळी त्याला तोटा झाला. त्याच मुद्दल सुद्धा बुडालं. पण ‘यावेळी आपण केवळ नशीब वाईट असल्याने बुडालो अन्यथा आपल्याला शेअर बाजाराची उत्तम जाण आहे’ अशी त्याची खात्री पटली होती. पुनः शेअर मध्ये पैसे गुंतवण्यासाठी त्याने बँकेकडून पर्सनल लोन घेतलं. बँकेने त्याच्या वडिलांची जमीन तारण ठेऊन घेऊन त्याला कर्ज दिलं. त्याने त्या पर्सनल लोनच्या पैशातून शेअर्स खरेदी केले. पुनः तोटा झाला. सारे पैसे बुडाले. बँकेने तारण ठेऊन घेतलेली जमीन जप्त केली. त्या धक्क्यातून माझा मित्र कित्येक वर्ष सावरला नाही.

पर्सनल लोन मधून घेतलेल्या रकमेच्या वापरावर निर्बंध नाहीत. हे लोन आपण आर्थिक गुंतवणूक करून त्यावर अधिक फायदा मिळवण्यासाठी वापरू शकतो. मात्र पर्सनल लोन घेऊन आलेली रक्कम गुंतवताना, त्या गुंतवणुकी मधून मिळणार परतावा हा व्याजापोटी भराव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा बराच जास्त असेल याची खात्री करून घ्यावी. त्या गुंतवणुकीची सुरक्षितता सर्व बाजूने पाहावी.

भारतीय बँका देत असलेल्या आर्थिक सोयी आणि सुविधांचा सर्वंकष विचार करता ‘पर्सनल लोन’ हे आज भारतामध्ये गुंतवणुकीचं उत्तम साधन आहे. मात्र त्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी पर्सनल लोन घेताना, त्या लोन करता आपण स्वीकारत असलेल्या अटी – शर्ती , त्याची परतफेड करण्याची आपली क्षमता आणि आपण कर्ज काढून गुंतवत असलेल्या पैशाच्या परताव्याची रक्कम आणि मुदत या सर्वांचा सखोल आणि सर्वांगीण विचार करणं अनिवार्य आहे!!

पर्सनल लोन घेताना एक सर्वात महत्वाचा नियम पाळावा. तो म्हणजे – ‘जर ते घेणं अटळ असेल तरच ते घ्यावं! अनावश्यक खर्चासाठी किंवा आपल्या चैनीसाठी पर्सनल लोन घेणं कटाक्षाने टाळावं! गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने पर्सनल लोन घेतलं तर त्या गुंतवणुकीतून मिळणारी रक्कम त्या पर्सनल लोनच्या व्याजापोटी भराव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक असेल तसेच आपलं मुद्दल सुरक्षित राहील याची खात्री करून घेऊन मगच पर्सनल लोन घ्यावं!!’ एवढी काळजी घेतल्यास पर्सनल लोन घेऊन फायदेशीर गुंतवणूक निश्चितपणे करता येते!!!

Story img Loader