दिलीप सातभाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरमहा मिळणाऱ्या वेतनाचा एक प्रमुख हिस्सा म्हणजे घरभाडे भत्ता. घरभाड्यासंदर्भातील सर्व प्रश्न, शंका यांची उत्तरं जाणून घेऊया.

घर भाडे भत्ता म्हणजे काय?

घरभाडे भत्ता हा कंपनीने जे वेतनाचे पॅकेज नोकरीचा करार सही करताना कर्मचाऱ्याला दिले जाते त्यात मूळ पगार, महागाई भत्त्याव्यतिरिक्त इतर खर्च भरून काढण्यासाठी इतरही भत्ते दिले जातात त्या पैकी हा एक भत्ता आहे ज्यामुळे कर्मचाऱ्याला भाड्याने घेतलेल्या निवासस्थानात राहण्याचा खर्च भरून काढण्यास मदत होते.

घरभाडे भत्ता करपात्र आहे का?

घरभाडे भत्ता हा कर्मचाऱ्याच्या पगाराच्या उत्पन्नाचा एक भाग आहे आणि म्हणूनच, ते करपात्र उत्पन्न मानले जाते. तथापि, जर कर्मचारी भाड्याच्या निवासस्थानात राहत असेल, तर सेवक प्राप्तिकर कायद्याच्या कलम १०(१३ए) अंतर्गत – अटींच्या अधीन राहून अंशत: किंवा संपूर्णपणे कर सवलती अंतर्गत माफ करून घेऊ शकतो. कर्मचारी जर भाड्याच्या निवासस्थानात राहत नसल्यास, हा भत्ता पूर्णपणे करपात्र आहे. कर्मचाऱ्याने नवीन कर प्रणाली निवडली असल्यास घरभाडे भत्त्याची कर सवलत उपलब्ध असणार नाही.

आणखी वाचा-Money Mantra: ज्योती सीएनसी कंपनीचा आयपीओ येतोय; जाणून घ्या सर्वकाही

घरभाडे भत्ता कधी आंशिक किंवा पूर्णतः कर मुक्त होतो ?

काही अटींच्या अधीन राहून घरभाडे भत्ता करमुक्त होऊ शकतो त्यासाठी भाड्याच्या घरात राहणे, घरभाडे भत्ता मिळणे, कोणत्या शहरात राहतो, घर भाड्याची रक्कम पगाराच्या १०% पेक्षा अधिक असल्यास व कायद्यात विषद केलेले टक्केवारीच्या आधारे करमाफी मिळू शकते. त्यातील अटी खालीप्रमाणे आहेत व यात न्यूनतम असणारी रक्कम करमुक्त होते.
१. मिळालेला घर भाडे भत्ता
२.प्रत्यक्षात दिलेले घरभाडे जर मूळ वेतन अधिक महागाई भत्त्याच्या एकत्रित रक्कमेच्या १०% पेक्षा जास्त असलेली रक्कम
३. मूळ पगार + महागाई भत्ताच्या ५०% इतकी रक्कम जर सेवक दिल्ली, कोलकाता, मुंबई किंवा चेन्नई या मेट्रो शहरांमध्ये राहत असल्यास
४. मूळ पगार + महागाई भत्ताच्या ४०% इतकी रक्कम जर सेवक दिल्ली, कोलकाता, मुंबई किंवा चेन्नई या मेट्रो शहरांमध्ये राहत नसल्यास

घरमालकाच्या पॅनची कधी गरज आहे?

जर कर्मचाऱ्याने भाड्याने घर घेतले असेल आणि वार्षिक रु. एक लाखाहून अधिक रक्कम अदा करीत असेल तर – घरमालकाचा पॅन देणे आवश्यक आहे अन्यथा,घरभाडे भत्त्याची करमुक्ती गमावू शकता. १० ऑक्टोबर २०१३ च्या परिपत्रक क्रमांक ८/२०१३ नुसार, पॅन नसलेल्या घरमालकांनी त्यांच्याकडे पॅन नाही अशी स्वयं घोषणा करणे आवश्यक आहे. एनआरआय घरमालकांना भाडे देणाऱ्या भाडेकरूंनी भाड्याचे पैसे देण्यापूर्वी ३०% करकपात करुन घेणे आवश्यक आहे.

आणखी वाचा-Money Mantra : स्टार्टअप्सची ‘हॉकी स्टिक’ ग्रोथ

उदाहरण

नवी दिल्ली येथे कार्यरत असलेल्या रमेश यांनी भाड्याने निवासस्थान घेतले आहे ज्यासाठी ते आर्थिक वर्ष २०२३-२४ दरम्यान दरमहा रु. १५००० देतात. त्याला मासिक रु.२५०००मूळ पगार आणि रु.२००० डीए मिळतो, जो पगाराचा एक भाग बनतो. त्याला त्याच्या मालकाकडून वर्षभरात रु. १ लाखाचा घरभाडे भत्ता देखील मिळतो. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आयकरातून मुक्त होणारा घरभाडे भत्ता घटक समजून घेऊ. दिलेल्या डेटानुसार, खालील आकडेमोड करा:
अ.मिळालेला घरभाडे भत्ता– रु.१ लाख
ब. मूळ पगाराच्या ५०% महागाई भत्त्यासह – रु.१,६२,००० (५०%(रु. २५,०००+ रु. २,०००)१२ महिने)
क. वर्षभरात दिलेले भाडे वजा पगार व महागाई भत्त्याच्या १०% =१८००००-३२४००
=रु १४७६०० (वर्षभरातील भाडे १५०००*१२=१८००००) (पगाराच्या १०% म्हणजे ३२४००)

अ,ब,क, यात न्यूनतम असणारी रक्कम करमुक्त असते त्यामुळे, कंपनीकडून मिळालेला संपूर्ण घरभाडे भत्ता वरील उदाहरणात प्राप्तिकरातून मुक्त आहे.

पालकांसोबत राहत असताना घरभाडे भत्ता कसा करमाफ करून घ्यावा ?

अनन्या मुंबईमध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करते. तिची कंपनी तिला घरभाडे भत्ता देत असली तरी ती तिच्या पालकांसोबत त्यांच्या घरात राहते या भत्त्याचा उपयोग ती कशी करू शकते? अनन्या तिच्या पालकांना ज्यांच्या नावावर घर आहे त्यांना घरभाडे देऊ शकते आणि प्रदान केलेल्या भत्त्यावर कर सवलत मागू शकते. तिला तिच्या पालकांशी भाडे करार करावा लागेल आणि त्यांना दरमहा पैसे बँकेच्या खात्यामार्फत हस्तांतरित करावे लागतील. तसेच, अनन्याच्या पालकांनी त्यांचे उत्पन्न म्हणून भरलेले भाडे त्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये नोंदवणे आवश्यक आहे. जर त्यांचे इतर उत्पन्न मूळ किमान करपात्रता मर्यादेपेक्षा कमी असेल किंवा कमी कर स्लॅबवर करपात्र असेल तर ते अनन्याच्या उच्च उत्पन्नावरील कर वाचवू शकतात व हा कायदेशीर व्यवहार असेल.

आणखी वाचा-Money Mantra : व्यावसायिक कर्ज घेण्याचे फायदे तोटे काय असतात? (भाग२)

कधी कधी अशा केसेसमध्ये वडिलोपार्जित असणाऱ्या घरात राहत असणाऱ्या व्यक्तीला सदर भाडे हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीला दिले तरी प्राप्तिकर कायद्या अंतर्गत मान्य होऊ शकते. तथापि, सदर घर पित्याच्या नावाने कर्ता म्हणून असायला हवे. वैध भाडे करार असला पाहिजे व घरभाडे दर महा बँकेमार्फत हस्तांतरित व्हायला हवे जेणेकरून व्यवहार फक्त कर चुकवेगिरीसाठी केला गेलेला नाही असे सकृत दर्शनी दिसले पाहिजे.

पगारदार व्यक्ती पत्नीला तिच्या नावावर व तिच्या पैशाने खरेदी केलेल्या घराची घरमालक मानू शकते, व संबंधित पत्नीला घरभाडे देऊ शकते परिणामी प्राप्तिकर वाचवू शकते. तथापि, प्राप्तिकर न्यायाधिकरणाने घरभाडे कर सवलती नाकारणारे विविध न्याय निर्णय जारी केले आहेत, ज्यामुळे व्यक्तीला उच्च कर दायित्वाचा सामना करावा लागतो आहे. पत्नीला भाडे दिले गेल्यास, भाड्याने घेतलेली मालमत्ता मिळवण्यासाठी तिची आर्थिक स्वायत्तता सिद्ध करण्याची अतिरिक्त जबाबदारी आहे, असे न झाल्यास मूल्यांकन अधिकारी घरभाडे सवलत नाकारू शकतात. तथापि, पत्नीला दिलेले भाडे सध्यातरी खटल्याच्या अधीन आहे कारण अशी काही प्रकरणे आहेत जिथे ही घरभाडे सवलत प्रतिबंधित केली गेली आहे. याउलट, दिल्ली प्राप्तिकर अपील न्यायाधिकरणाने अलीकडेच पत्नीला दिलेल्या भाड्यासाठी घरभाडे कर सवलत मंजूर केली आहे. तथापि, हे प्रत्येक केसमध्ये तथ्ये आणि व्यवहाराच्या सत्यतेवर अवलंबून असणार आहे.

जर एखादे घर कुटुंबातील सदस्याच्या नावावर असेल आणि कर्मचारी स्वत:च्या निवासस्थानासाठी घर वापरत असेल, तर कुटुंबातील सदस्याला दिलेले कोणतेही भाडे घरभाडे कर सवलतीच्या लाभासाठी पात्र असेल. कुटुंबातील सदस्याला भाडे खरोखर दिले असल्यास घरभाडे कपातीवर वजावट घेतली जाऊ शकते. प्राप्तिकर विभाग कुटुंबातील सदस्यांना प्रत्यक्ष पेमेंट केल्याचा पुरावा मागू शकतो, म्हणजे बँक स्टेटमेंट, वीज बिल इ. कुटुंबातील सदस्यांनी दाखवले आहे की नाही हे तपासण्यासाठी मूल्यांकन अधिकारी त्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्राची प्रत देखील मागू शकतात. असे भाडे त्यांच्या संबंधित आयकर विवरणपत्रात फॉर्ममध्ये दर्शविणे आवश्यक आहे.

आणखी वाचा-Money Mantra : ग्रासिमची चार हजार कोटींच्या राईट इश्यूची घोषणा

सारांश:

कायदेशीरपणे, करदात्याने नातेवाईकांना भाड्याने दिलेल्या देयकेसाठी घरभाडे सवलतीचा दावा करण्यास कोणताही प्रत्यक्ष प्रतिबंध नाही. तथापि, पक्षांमधील संबंध घरभाडे सवलतीच्या वास्तविकतेबद्दल मूल्यांकन अधिकाऱ्याला संशय निर्माण करू शकतात. अशा प्रकारे, करदात्यांनी मागणी केलेल्या घरभाडे सवलतीची वास्तविकता सिद्ध करण्यासाठी मजबूत कागदपत्रे ठेवली पाहिजेत. करदात्यांना विशेषतः हे सिद्ध करावे लागेल की मालमत्ता प्रत्यक्षात त्यांच्या ताब्यात होती, भाड्याची रक्कम वाजवी आहे आणि प्रचलित बाजार दरांशी सुसंगत आहे, भाड्याची देयके प्रत्यक्षात नातेवाईकांना दिली गेली होती (शक्यतो बँकिंग चॅनेलद्वारे) आणि भाड्याचे उत्पन्न नातेवाईकाने त्याच्या प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये (जेथे लागू असेल)घोषित केले पाहिजे.

घरभाडे भत्ता न मिळाल्यास काय?

घरभाडे भत्ता मिळत नसतानाही कर्मचाऱ्याने निवासस्थानात राहण्यासाठी घरभाडे भरल्यास, कर्मचारी कलम ८०जीजी अंतर्गत अटींच्या अधीन राहून कमाल रु पाच हजार प्रतिमहाची उत्पन्नातून वजावट मिळवू शकतात.