प्राप्तिकर कायद्यानुसार वैयक्तिक, कंपनी, भागीदारी संस्था, धर्मादाय संस्था, अशा सर्व करदात्यांसाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र भरण्याची मुदत संपली. बहुतेक करदात्यांनी विवरणपत्र दाखल केलेच असेल. मात्र काही करदात्यांचे विवरणपत्र दाखल करावयाचे राहून गेले असेल किंवा ज्या करदात्यांनी विवरणपत्र पूर्वी दाखल केले असेल आणि त्यानंतर त्यांना दाखल केलेल्या विवरणपत्रात काही त्रुटी आढळल्या असतील तर त्याच्यासाठी मूळ विवरणपत्र किंवा सुधारित विवरणपत्र ३१ डिसेंबर, २०२४ पूर्वी दाखल करता येईल. करदात्यांसाठी ही शेवटची संधी आहे त्यानंतर करदात्याला मूळ किंवा सुधारित विवरणपत्र दाखल करता येणार नाही.

मूळ विवरणपत्र दाखल करताना :

ज्या करदात्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे आणि त्यांनी ते मुदतीत दाखल न केल्यास ते आता ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत दाखल करू शकतात. मुदतीनंतर विवरणपत्र दाखल करताना त्यांचे काय नुकसान होईल हे जाणून घेतले पाहिजे.

Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tabla Maestro Zakir Hussain Dies at 73
Zakir Hussain Passes Away : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन, ‘वाह उस्ताद वाह’ म्हणत तबल्यावर लिलया पडणारी थाप शांत!
Loksatta editorial PM Narendra Modi Addresses Lok Sabha in Constitution Debate issue
अग्रलेख: प्रहसनी पार्लमेंट
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
MLA Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!

१. विलंब शुल्क : विवरणपत्र मुदतीत दाखल न केल्यास ५,००० रुपये विलंब शुल्क भरावे लागते. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना फक्त १,००० रुपये विलंब शुल्क भरावे लागते.

हेही वाचा – माझा पोर्टफोलियो – जीवनरेखा याच हाती! : ज्युपिटर लाइफलाइन हॉस्पिटल्स लिमिटेड

२. व्याज : करदात्याचा कर देय असेल तर त्या करावर विवरणपत्र विलंबाने दाखल केल्यामुळे कलम २३४ एनुसार विलंबाच्या काळासाठी दरमहा १ टक्के दराने व्याज, अग्रिम कर कमी भरण्यात आल्यास २३४ बीनुसार १ एप्रिल पासून कर भरेपर्यंत दरमहा १ टक्के दराने व्याज आणि अग्रिम कराचे हफ्ते न भरल्यास किंवा कमी भरल्यास २३४ सी या कलमानुसार व्याज भरावे लागेल. करदात्याला कराचा दावा (रिफंड) करावयाचा असल्यास, करपरताव्यावर मिळणाऱ्या व्याजाला मुकावे लागेल. करपरताव्यावर (रिफंड) १ एप्रिल (२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १ एप्रिल, २०२४ पासून) पासून ते परतावा मिळण्याच्या तारखेपर्यंत, वार्षिक ६ टक्के या दराने मिळणारे व्याज मिळते. करदात्याने विवरणपत्र मुदतीत दाखल न केल्यामुळे, हे व्याज मिळणार नाही. ज्या दिवशी विवरणपत्र दाखल केले त्यादिवसापासून परतावा मिळण्याच्या तारखेपर्यंत व्याज मिळेल.

३. तोटा पुढील वर्षासाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येत नाही : भांडवली तोटा, धंदा-व्यवसायातील तोटा हा विवरणपत्र मुदतीत भरले तरच ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो आणि पुढील ८ वर्षांपर्यंत (सट्टा व्यवहारातील तोट्यासाठी ४ वर्षे) उत्पन्नातून वजा करता येतो. घरभाडे उत्पन्न या सदरातील तोटा हा मात्र विवरणपत्र वेळेत दाखल केले नसले तरी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो.

सुधारित विवरणपत्र :

ज्या करदात्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र यापूर्वीच दाखल केले आहे आणि त्यांना त्यात काही त्रुटी आढळल्यास करदाता ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत सुधारित विवरणपत्र दाखल करू शकतो. करदात्याला सुधारित विवरणपत्र दाखल करताना विलंब शुल्क भरावे लागत नाही. परंतु सुधारित विवरणपत्रानुसार करदात्याला कर देय असेल तर कलम २३४ बी आणि २३४ सी कलमानुसार व्याज भरावे लागू शकते. सुधारित कर गणनेनुसार करदात्याचा कर जास्त भरला गेला असेल तर करदाता सुधारित विवरणपत्रात कर परताव्याचा (रिफंड) दावा देखील करू शकतो. करदात्याला उद्योग-व्यवसायाच्या किंवा भांडवली नफा या उत्पन्नाच्या स्त्रोतात तोटा असेल तर विवरणपत्र मुदतीत दाखल केले तरच तो ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. करदात्याने मूळ विवरणपत्र दाखल करताना उत्पन्नाच्या स्त्रोतात (घरभाडे उत्पन्न सोडून) तोटा दाखविला नसेल आणि सुधारित विवरणपत्रात दाखविल्यास तो ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो की नाही याबद्दल प्राप्तिकर न्यायाधिकरण आणि न्यायालयाने वेगवेगळे निवाडे दिले आहेत. हे सुधारित विवरणपत्र किती वेळा दाखल करावयाचे याला बंधन नाही. म्हणजे सुधारित विवरणपत्रातील त्रुटी सुधारण्यासाठी सुद्धा त्याचे सुधारित विवरणपत्र दाखल करता येते. करदाता ३१ डिसेंबरनंतर सुधारित विवरणपत्र दाखल करू शकणार नाही.

करदात्याच्या मोठ्या व्यवहारांसंबंधी माहिती प्राप्तिकर खात्याकडे विविध माध्यमातून जमा होत असते. ही माहिती करदाता वार्षिक माहिती अहवाल (एआयएस) द्वारे तपासू शकतो. ज्या करदात्यांचे भारताबाहेर बँक खाते आहेत किंवा परदेशात संपत्ती आहे अशांनी याची माहिती मूळ विवरणपत्रात दाखविली नसल्यास किंवा ज्या करदात्यांनी मोठ्या रकमेचे व्यवहार केले आहेत आणि विवरणपत्रच दाखल केले नाही किंवा असे व्यवहार विवरणपत्रात दाखविले गेलेले नसतील तर त्यांना ३१ डिसेंबर, २०२४ पूर्वी मूळ किंवा सुधारित विवरणपत्र दाखल करता येईल.

हेही वाचा – मिष्टान्न! (उत्तरार्ध)

आता प्रश्नोत्ताराकडे वळूया :

प्रश्न : मला मागील तीन वर्षापासून दीर्घमुदतीचा भांडवली तोटा होत आहे. मागील दोन वर्षाचे विवरणपत्र मी मुदतीत दाखल केले आहे परंतु, २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचे विवरणपत्र काही कारणाने मुदतीत दाखल करू शकलो नाही. मला मागील तीन वर्षात झालेला भांडवली तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येईल का?

  • अजय कुलकर्णी

उत्तर : ज्या आर्थिक वर्षात करदात्याला भांडवली तोटा झाला आहे, त्यावर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल केले असल्यास करदाता तो तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करू शकतो. आपण फक्त २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र मुदतीत दाखल करू शकला नसल्यामुळे या वर्षाचा तोटा आपल्याला ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येणार नाही. मागील ज्या दोन वर्षात तोटा झाला आहे त्यावर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल केले असल्यामुळे आपल्याला त्या दोन वर्षांचा तोटा पुढील वर्षात ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येईल.

प्रश्न : मी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र नवीन करप्रणालीनुसार मुदतीत दाखल केले. मला नंतर असे समजले की, प्राप्तिकर कायद्यानुसार वजावटी घेऊन जुनी करप्रणालीनुसार मला कर कमी भरावा लागतो. मी आता जुनी करप्रणाली स्वीकारून, सुधारित विवरणपत्र दाखल करून ‘रिफंड’चा दावा करू शकतो का?

  • किरण शिंदे

उत्तर : २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून नवीन करप्रणाली ही मुलभूत करप्रणाली आहे. करदात्याला जुनी करप्रणाली स्वीकारायची असल्यास ती मूळ विवरणपत्र दाखल करण्याच्या मुदतीपूर्वी स्वीकारावी लागते. त्यामुळे आपण मूळ विवरणपत्र नवीन करप्रणालीनुसार दाखल केले असेल तर आपल्याला आता (मूळ विवरणपत्र दाखल करण्याच्या मुदतीनंतर) जुनी करप्रणाली स्वीकारता येत नाही. ज्या करदात्यांनी पूर्वी जुन्या करप्रणालीनुसार मूळ विवरणपत्र दाखल केले आहे, ते नवीन किंवा जुन्या करप्रणालीनुसार सुधारित विवरणपत्र दाखल करू शकतात. मात्र ज्या करदात्यांनी नवीन करप्रणालीनुसार, मूळ विवरणपत्र दाखल केले आहे, ते फक्त नवीन करप्रणालीनुसारच सुधारित विवरणपत्र दाखल करू शकतील.

प्रश्न : मी ऑक्टोबर, २०२४ मध्ये माझा एक निवासी प्लॉट विकला आहे. त्यात मला ३० लाख रुपयांचा दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला आहे. मी करबचतीची गुंतवणूक न करता कर भरण्याचे ठरविले आहे. मला यावरील कर कधी भरावा लागेल?

  • एक वाचक

उत्तर : आपण ज्येष्ठ नागरिक असाल (वय ६० वर्षांपेक्षा जास्त) आणि आपल्या उत्पन्नात उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नसेल तर आपल्याला हा कर विवरणपत्र दाखल करण्याच्या मुदतीपूर्वी भरता येईल. अन्यथा आपल्याला अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतील. अग्रिम कराच्या तरतुदीनुसार या भांडवली नफ्यावरील कराच्या ७५ टक्के कर आपल्याला १५ डिसेंबर, २०२४ पूर्वी भरणे अपेक्षित होते आणि बाकी कर १५ मार्च, २०२५ पूर्वी भरावा लागेल.

प्रवीण देशपांडे

pravindeshpande1966@gmail.com

Story img Loader