करदात्याला मिळणाऱ्या उत्पन्नावर आणि भांडवली नफ्यावर कर भरावा लागतो. आर्थिक व्यवहारात जसा नफा होऊ शकतो, तसाच तोटादेखील होऊ शकतो. व्यवहारात करदात्याला तोटा झाल्यास करदात्याला त्याचा फायदा घेता येतो का? करदात्याचे करदायित्व कमी होऊ शकते का? त्यासाठी काय अटीं आहेत? याची माहिती या लेखात दिली आहे.

करदात्याला त्याचे उत्पन्न पाच स्त्रोतामध्ये विभागावे लागते. करदात्याला ज्या व्यवहारात तोटा होतो, तो त्याच स्त्रोतामध्ये दाखवावा लागतो. हा तोटा घरभाडे उत्पन्न, उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न, भांडवली नफा या स्त्रोताच्या उत्पन्नात होऊ शकतो. असा तोटा झाल्यास करदात्याला तो दुसऱ्या उत्पन्नातून वजा करता येतो का? असल्यास त्यासाठी काय नियम आहेत? हा तोटा इतर उत्पन्नातून वजा करण्यासाठी एक ठरावीक क्रम आहे आणि त्या क्रमानुसार तो उत्पन्नातून वजा करता येतो किंवा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो. यासाठी खालील नियम आहेत.

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Aditya Thackeray cricket
ठाकरे बंधू खेळामध्ये रमले; प्रचारादरम्यान तरुणाईमध्ये मिसळले, क्रिकेट आणि फुटबॉल खेळत क्षणभर विरंगुळा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
donald trump victory celebration india
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर आंध्र प्रदेशमधील या गावाला विकासाची अपेक्षा, गावात ट्रम्प यांच्या विजयाचा जल्लोष; कारण काय?
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?

आणखी वाचा-भागीदारी फर्म व मर्यादित देयता भागीदारीसाठी आता सावधानता बाळगणे हिताचे

त्याच उत्पन्नाच्या स्रोतातून प्रथम वजावट :

करदात्याला ज्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये तोटा झाला असेल, तर तो प्रथम त्याच उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेल्या नफ्यामधून वजा करता येतो. उदा. करदात्याला एका उद्योग व्यवसायाच्या उत्पन्नात तोटा झाल्यास तो तोटा दुसऱ्या उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून प्रथम वजा करावा लागतो. याला अपवाद आहे सट्टा व्यवहारातील (ज्या व्यवहारात मालाचा ताबा घेतला जात नाही) तोटा. इतर उद्योग-व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही, तो फक्त सट्टा व्यवहारातील नफ्यामधूनच वजा करता येतो. याशिवाय घोड्यांच्या शर्यतीतील व्यवसायातील तोटा हा फक्त त्याच व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो, लॉटरी, शब्दकोडे, पत्तेखेळ किंवा जुगार, बेटिंगमधील तोटा इतर कोणत्याही उत्पन्नातून वजा करता येत नाही.

दीर्घमुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो, अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही. अल्पमुदतीचा भांडवली तोटा मात्र दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो.

इतर स्रोतातील उत्पन्नातून वजावट :

एका उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेला तोटा त्याच स्रोतामधून वजा होत नसेल तर तो इतर स्रोतामधील उत्पन्नामधून वजा करता येतो. याला अपवाद खालीलप्रमाणे :

१. भांडवली तोटा हा इतर स्रोताच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही.

२. उद्योग-व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही.

३. ‘घराच्या उत्पन्नातील’ तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो. फक्त २ लाख रुपयांपर्यंतचाच तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो. करदात्याने नवीन करप्रणाली स्वीकारल्यास हा २ लाख रुपयांचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

४. कोणत्याही उत्पन्नाच्या स्रोतामधील तोटा हा लॉटरी, शब्दकोडे, पत्तेखेळ, किंवा जुगार, बेटिंगमधील उत्पन्नातून वजा करता येत नाही.

५. कोणत्याही उत्पन्नाच्या स्रोतामधील तोटा हा घोडे शर्यतीच्या व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही.

६. करदात्याने नवीन करप्रणालीचा विकल्प (कोणतीही वजावट न घेता सवलतीच्या दरात कर भरण्याचा) निवडल्यास ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरातील तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

७. आभासी चलनाच्या व्यवहारात झालेला तोटा हा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

आणखी वाचा-माझा पोर्टफोलिओ : सुयोग्य बेअरिंगच्या शोधाला उत्तर

पुढील वर्षासाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ :

एका उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेला तोटा त्या स्रोतामधून वजा होत नसेल आणि तो इतर स्रोतामधील उत्पन्नामधून सुद्धा वजा होत नसेल तर तो पुढील वर्षासाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो. हा पुढील वर्षासाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ केलेला तोटा पुढील वर्षातील उत्पन्नातून वजा करता येतो. यासाठीसुद्धा काही नियम आहेत. ज्या वर्षीचा तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करावयाचा आहे, त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे. सट्टा व्यवसायातील तोटा हा त्याच वर्षीच्या सट्टा व्यवसायाच्या नफ्यातून वजा न झाल्यास पुढील ४ वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो. इतर प्रकारचा तोटा त्यावर्षीच्या उत्पन्नातून वजा न झाल्यास पुढील ८ वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो.

आता प्रश्नोत्तराकडे वळूया :

प्रश्न : मी २०२३-२४ या वर्षीचे विवरणपत्र नवीन करप्रणालीनुसार विलंबाने दाखल करत आहे. माझ्याकडे एक राहते घर आहे आणि मी माझे दुसरे घर भाड्याने दिले आहे, त्याचे मला वार्षिक १,२५,००० रुपये घर भाडे मिळते. या घरासाठी मी गृहकर्ज घेतले आहे. या गृहकर्जावर मी या २०२३-२४ या आर्थिक वर्षात २ लाख रुपये व्याज भरले. मला या व्याजाची वजावट घेता येईल का? -समीर दोंदे

उत्तर : नवीन करप्रणालीनुसार राहत्या घरासाठी (ज्याचे घरभाडे शून्य आहे) घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची वजावट मिळत नाही. परंतु, करदात्याने आपले घर भाड्याने दिले असेल, तर त्या घरासाठी घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची वजावट करदाता नवीन करप्रणाली स्वीकारूनसुद्धा घेऊ शकतो. करदाता मिळालेल्या घरभाडे रकमेएवढी गृहकर्जावरील व्याजाची वजावट घेऊ शकतो. व्याजाची रक्कम घरभाड्यापेक्षा जास्त असल्यास करदात्याला होणारा तोटा हा नवीन करप्रणालीनुसार इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही आणि पुढील वर्षासाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’सुद्धा करता येणार नाही.

प्रश्न : मी २०२४-२५ या आर्थिक वर्षात माझा गावाकडील निवासी भूखंड विकला. त्यावर मला ‘इंडेक्सेशन’चा फायदा घेऊन ५ लाख रुपयांचा दीर्घमुदतीचा भांडवली तोटा झाला. शेअरबाजारातील समभागाच्या गुंतवणुकीवर मला १ लाख रुपयांचा अल्पमुदतीचा भांडवली नफा आणि ३ लाख रुपयांचा दीर्घमुदतीचा भांडवली नफा झाला. निवासी भूखंडाच्या विक्रीवर झालेला तोटा मी समभागाच्या विक्रीतून झालेल्या नफ्यातून वजा करू शकतो का? -प्रकाश कदम

उत्तर : समभागाच्या विक्रीतून झालेल्या ३ लाख रुपयांच्या नफ्यातून, भूखंडाच्या विक्रीवर झालेला ३ लाख रुपयांचा दीर्घमुदतीचा तोटा आपल्याला वजा करता येईल. अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यातून दीर्घमुदतीचा तोटा वजा करता येत नसल्यामुळे, भूखंडाच्या विक्रीवर झालेला बाकी २ लाख रुपयांचा दीर्घमुदतीचा भांडवली तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी-फॉरवर्ड’ करावा लागेल. आपल्याला १ लाख रुपयाच्या अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर (ज्यावर रोखे उलाढाल कर (एसटीटी) भरला गेला आहे असा) कर भरावा लागेल. हा नफा २३ जुलै, २०२४ पूर्वी झाला असल्यास १५ टक्के आणि त्यानंतर झाला असल्यास २० टक्के इतका कर भरावा लागेल.

आणखी वाचा-बाजार रंग : सरत्या वर्षाचा बाजार अभ्यास

प्रश्न : मी एक डॉक्टर आहे. माझा वैद्यकीय व्यवसाय आहे. मी २०२४-२५ या आर्थिक वर्षात माझ्या व्यवसायासाठी लागणारी मोठ्या रकमेची उपकरणे आणि साधने खरेदी केली. आणि त्यासाठी मी बँकेकडून कर्जसुद्धा घेतले आहे. या उपकरणांचा घसारा आणि व्याज विचारात घेता मला तोटादेखील होऊ शकतो. मागील वर्षापर्यंत मी अनुमानित कराच्या तरतुदीनुसार विवरणपत्र दाखल करत होतो. यावर्षी घसारा आणि व्याज याचा फायदा घेऊन विवरणपत्र दाखल करू शकतो का? -एक वाचक

उत्तर : आपण मागील वर्षी अनुमानित कराच्या तरतुदींनुसार विवरणपत्र दाखल केले आहे. आपण या वर्षी घसारा, व्याज आणि इतर व्यावसायिक खर्च विचारात घेऊन उत्पन्न दाखवून विवरणपत्र दाखल करू शकता. आपली व्यवसायातून एकूण जमा ५० लाख रुपयांपेक्षा (एकूण जमा रकमेच्या ५ टक्क्यांपेक्षा जास्त जमा रोखीने नसल्यास ७५ लाख रुपये) कमी असल्यास आणि आपण उत्पन्न या एकूण जमेच्या ५० टक्के कमी दाखवल्यास आपल्याला आपले लेखे ठेवणे आणि त्याचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. आपले एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असल्यास आपल्याला लेखे ठेवणे आणि त्याचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक नाही.

pravindeshpande1966@gmail.com

Story img Loader