• सुमित चंदा

तंत्रज्ञानाने आपल्याला नेहमीच आकर्षित केले आहे. असे का? याचे कारण दशकभरापूर्वी लोकांनी ज्याची कल्पनाही केली नव्हती ते तंत्रज्ञान आज प्रत्यक्षात साकारत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरू असलेल्या या प्रगतीसाठी आकाशही ठेंगणे ठरावे अशी सध्या स्थिती आहे. कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय) हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्याच्याशी मी अनेक वर्षांपासून जवळून जोडलेला आहे. जेव्हा आम्ही एआयवर काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला माहीत होते की येथे आपल्याला करण्यासारखे खूप काही आहे, परंतु असाही प्रसंग येईल जेव्हा आपल्याला माणूस आणि एआय यांचीच तुलना करावी लागेल याची मात्र कधीच कल्पना केली नव्हती.

एआय प्रणाली समजून घेताना

पहिली गोष्ट ही समजून घ्यायला पाहिजे की एआय प्रणालीची क्षमता बदलत असते. जेव्हा आपण एआयची तुलना मानवाशी करतो तेव्हा आपण फक्त चॅटजीपीटी (ChatGPT) आणि जार्विससारख्या प्रगत आणि सु-विकसित एआय प्रणालीचा संदर्भ देत असतो. मानवाला मेंदू असतो आणि त्यात एक न्यूरोनल नेटवर्क असते. हे नेटवर्क आपल्याला आपण जे करू शकतो ते करू देते. एआय सिस्टीम्स ज्या डेटावर कार्यरत असते तो डेटाच त्या प्रणालीचा मेंदू असतो. डेटा एखाद्या विशिष्ट घटनेशी कसा जोडला गेला आहे यावरून एआय प्रणालीचे नियंत्रण किंवा सामर्थ्य निश्चित होते. प्रत्येक माणूस दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो. त्याचप्रमाणे, एआय प्रणालीदेखील तिला कसे प्रशिक्षित आणि विकसित केले आहे त्यानुसार बदलते.

Gen Z and the Lost Art of Conversation
तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला थेट मानवी संवाद हरवतोय? नेमके काय घडते आहे?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
कृत्रिम प्रतिज्ञेच्या: डेटा अॅनॅलिटिक्स
maharashtra navnirman sena demand to use marathi language in bank of maharashtra
महाबँकेत मराठी भाषेचा वापर करा, का केली मनसेने ही मागणी ?
Artificial Intelligence Might Enable Communication with Animals
‘जंगल मंगल विद्यापीठा’त कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद भरते तेव्हा…
disability certificate, disabled, taluka level,
अपंगांसाठी सरकारचा मोठा निर्णय! आता तालुका स्तरावरही मिळणार अपंग प्रमाणपत्र
Loksatta chaturang History to Mental Health Textbook Study
ऊब आणि उमेद : इतिहासातून मन:स्वास्थ्याकडे
ten thousand teachers will be recruited in the second phase through pavitra portal
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात किती शिक्षकांची होणार भरती?

एआयच्या रुंदावलेल्या कक्षा

दर वर्षागणिक आपण एआयला नवनवीन उंची गाठताना बघत आहोत. उदाहरणार्थ, जार्विसमध्ये, एआय भांडवली बाजार सल्लागाराच्या बरोबरीने कसे काम करत आहे आणि चित्र बदलत आहे हे आपण पाहात आहोत. माझी खात्री आहे की एआय अध्यायातील पुढील पर्व म्हणजे चॅटजीपीटी (ChatGPT) आहे. ही एक अत्याधुनिक कृत्रिम प्रज्ञा प्रणाली असून ती हरतऱ्हेने हरक्षेत्रात मानवाची जागा घेईल अशी अपेक्षा आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की ती इतकी शक्तिशाली आहे की ती गुगलचीदेखील जागा घेईल.

मला खात्री आहे की तुमच्यापैकी बहुतेकांनी अजून तिच्या या अचाटतेचा प्रत्यय घेतलेला नसेल. तर मग आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे त्याच्या प्रज्ञेला तपासून पाहू या.

मी चॅटजीपीटीला विचारले: माणूस का एआय – काय चांगले आहे?

त्यावर अशाप्रकारे एआय प्रतिसाद मिळाला : “एक दुसऱ्यापेक्षा चांगला आहे असे म्हणणे बरोबर नाही, कारण ते वेगवेगळ्या उद्देशांसाठी डिझाइन केलेले आहेत आणि त्यांची स्वतःचे असे सामर्थ्य आणि मर्यादाही आहेत. मानवांमध्ये सर्जनशीलता, सहानुभूती आणि आंतरभावना यासारख्या अद्वितीय क्षमता आहेत ज्या सध्या तरी एआयकडे नाहीत. दुसरीकडे, एआय मोठ्या प्रमाणावर डेटावर त्वरित प्रक्रिया करू शकते आणि कधीकधी ज्यामुळे मानवी निर्णय क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. शिवाय कोणतेही पूर्वग्रह आणि मर्यादा यांच्याशिवाय ते डेटावर आधारित निर्णय घेऊ शकतो. सारांशात, अधिक अचूक उत्तर हेच की एआय आणि माणूस एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्हीचा एकत्रित वापर करून सर्वोत्तम परिणाम मिळू शकतात.”

मानव आणि एआयचॅटजीपीटीने वर जे काही नमूद केले आहे त्यातली प्रत्येक ओळ आपल्यापैकी बहुतांशांना मान्य आहे. खरे तर दोहोंमध्ये ‘द्वंद्व’ असू नये तर उलट एआय आणि मानव – दोघे मिळून काय करू शकतात, या दिशेने विचार केला गेला पाहिजे. जेव्हा आपण दोघांकडे एकसंध पाहण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपण एआयला पुढील स्तरावर नेण्यासाठी नवीन संधी आणि मार्ग खुला करतो.

मानवी मेंदूला मर्यादा आहेत. आपण कमी वेळेत अधिक काम करण्यास मदत करण्यासाठी संगणक तयार केले. जेव्हा संगणक तयार झाले तेव्हा प्रत्येकाला वाटले की ते मानवांची जागा घेतील. तीच भीती आज एआय व्यासपीठांबाबत दिसते, परंतु आपल्याला हे माहीत आहे की संगणकांनी मानवांना ते जे काही करतात त्यामध्ये अधिक चांगले बनण्यास मदत केली आहे. एआय साधनांसह काम करताना चूक होण्याची शक्यता कमी आहे. शारीरिक श्रम आणि क्रियांसह कोणत्याही प्रकल्पावर काम करताना माणूस म्हणून काहीतरी चूक होण्याची शक्यता असते. एखादा मित्र जसा तुम्हाला चुका टाळायला मदत करू शकतो त्याप्रमाणे एआयमुळेदेखील मानवी चुकांची शक्यता दूर केली जाऊ शकते. अगदी कोणत्याही क्षेत्रात नवशिक्यांना अग्रस्थानी पोहोचण्यासाठी प्रारंभिक पावले उचलण्यास साहाय्यभूत एआय हा पहिला मदतीचा हात ठरू शकतो.

अनुभवी माणसासाठी, जो त्याच्या क्षेत्राच्या अग्रणी किंवा त्याच्या जवळ आहे अशा माणसाला एआय त्याच्या सीमा ओलांडण्यास आणि पुढील पातळीवर जाण्यास मदत करू शकते. मानव एआयची शक्ती वापरू शकतात आणि त्यांचे यश पुढील स्तरावर नेण्यासाठी त्यांची सर्जनशीलता आणि आंतरिक भावना यांचा उपयोग करू शकतात.

भविष्य संकेत काय?

एक दशकापूर्वी, कोणीही अंदाज करू शकले नसते की एआय तंत्रज्ञान इतके पुढे जाईल. आजही एआय तंत्रज्ञानाने जे शक्य झालेले दिसते ते तर फक्त हिमनगाचे टोक आहे. एआय प्रणाली निरंतर विकसित होत विस्तारत आहे कारण मानव स्वतःच्या फायद्यासाठी तिला अधिक चांगले करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा हा की एआय आणि मानव हे दोन वेगळे नाहीत – येत्या काही वर्षांत, एकजुटीने काम करत ते जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक सुखदायी, सर्वांगसुंदर बनवतील, हे निःसंशय.

(लेखक, जार्विस इन्व्हेस्टचे सीईओ आणि संस्थापक)

Story img Loader