Taxation of Gold purchased in wife’s name: भारतात सोन्यात गुंतवणूक करणे अत्यंत शुभ मानले जाते. यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. पत्नीच्या नावावर सोने खरेदी करणे हा खूप लोकप्रिय पर्याय आहे, पण यातूनही तुम्ही कर वाचवू शकाल का, असा अनेकांना प्रश्नही सतावत असतो.
पत्नीच्या नावावर सोने खरेदी केल्यास टॅक्स वाचणार का?
पत्नीच्या नावावर सोने खरेदी केल्यास टॅक्स वाचणार की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कर नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही सोने खरेदीवर कोणत्याही प्रकारचा कर वाचवू शकत नाही. सोने ही भांडवली मालमत्ता आहे. या कारणास्तव सोन्याच्या विक्रीवर भांडवली नफा कर आकारला जातो.
हेही वाचाः Money Mantra : प्राप्तिकर विभागाकडून अलर्ट जारी, ITR रिफंड अद्याप मिळालेला नाही? मग करा ‘हे’ काम
पत्नीच्या नावावरील सोने विकल्यास कर कसा आकारला जातो?
रेडी अकाउंटंट संस्थापक आणि सीए अभिनत सिंग म्हणतात की, प्राप्तिकर कायद्यानुसार सोने ही भांडवली मालमत्ता मानली जाते आणि त्यामुळे सोन्याच्या विक्रीवर भांडवली नफा कर आकारला जातो. प्राप्तिकर कायद्यानुसार जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या कोणत्याही अवलंबितांच्या नावावर सोने खरेदी करते, तेव्हा त्या व्यक्तीच्या उत्पन्नात विक्रीची रक्कम जोडली जाते.अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने आपल्या उत्पन्नातून पत्नीच्या नावे खरेदी केलेले सोन्याचे दागिने विकले तर त्यातून मिळणारे उत्पन्न त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडले जाणार आहे आणि भांडवली नफा कर आकारला जाणार आहे.
हेही वाचाः Money Mantra : EPF मधील शिल्लक गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी काढावी का? तज्ज्ञ म्हणतात…
कर वाचवण्यासाठी कुठे गुंतवणूक करावी?
तुम्हाला तुमच्या कराचा बोजा कमी करण्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड, टॅक्स सेव्हिंग एफडी इत्यादी पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.