वसंत कुलकर्णी
कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप फंड हा फंड ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडा’चा समावेश २०१४ पासून पहिल्या आवृत्तीपासून आहे. हा फंड १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत कॅनरा रोबेको इक्विटी डायव्हर्सिफाइड या नावाने ओळखला जात असे. या फंडाचा ‘कर्त्या’मध्ये समावेश झाल्यापासून या फंडाचे निधी व्यावस्थापनाची धुरा रवि गोपालकृष्णन, कृष्णा संघवी, मियुश गांधी (२०१६ मध्ये विद्यमान निधी व्यवस्थापक श्रीदत्त भांडवलदार यांची सहनिधी व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली.) या निधी व्यवस्थापकांनी सांभाळली. सध्या निधी व्यवस्थापनाची धुरा श्रीदत्त भांडवलदार आणि प्रणव गोखले हे सांभाळत आहेत. कॅनरा रोबेको फ्लेक्सिकॅप फंडाची कामगिरी मागील तीन तिमाहीपासून खालावली होती, परंतु सद्य तिमाहीत फंडाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली असून हा फंड नव्याने गुंतवणूक करण्यास सज्ज झाल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये या फंडाची मालमत्ता १२,९१३ कोटी होती. फंडाच्या पोर्टफोलिओत अन्य स्पर्धक फंडांच्या पोर्टफोलिओच्या तुलनेत ‘पीएसयू’ आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे प्रमाण कमी असल्याने कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅपची कामगिरी खालावल्याचे दिसत होते. (सोबतचे कोष्टक पाहा). जूननंतर (निवडणूक निकालानंतर) स्मॉलकॅप आणि सार्वजनिक मालकीच्या कंपन्यांत झालेली घसरण या फंडांच्या पथ्यावर पडली असून. तौलनिकदृष्ट्या फंडाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे पाहायला मिळते.

जेव्हा बाजारातील अनिश्चितता शिगेला पोहचते तेव्हा अनेक गुंतवणूकदार समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणूक करणे टाळतात. मात्र दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी बाजारातील अनिश्चितता नव्याने गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देते. अशा गुंतवणूकदारांसाठी, कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप फंड हा लार्ज कॅप केंद्रित मल्टी-कॅप घाटणीचा फंड असून फंडाच्या पोर्टफोलिओत निवडक मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांचा समावेश आहे.

portfolio 2024
पोर्टफोलिओचे वार्षिक प्रगती पुस्तक : ‘माझा पोर्टफोलियो’ आढावा २०२४
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
castrol india appoints kedar lele
मराठी माणसाचा डंका; कॅस्ट्रॉल इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केदार लेले यांची नियुक्ती
Sameer Wankhede statement on Aryan Khan case
Sameer Wankhede : समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणाबाबत म्हणाले, “मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा…”
four online scams
डिजिटल अटक ते रोमान्स स्कॅम : ऑनलाइन घोटाळ्यांना लोक कसे बळी पडत आहेत? काय आहेत फसवणुकीचे नवीन प्रकार?
Hamid is an autobiography
धगधगत्या प्रेमाचं क्रूर वास्तव
Ancient Egypt’s Worship of Buddha and Hindu Deities
Ancient India Egypt connection: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?
Nirmala Sitharaman said Rs 14 131 crore recovered from Vijay Mallyas property sale
राव की रंक?

हेही वाचा : कळा ज्या लागल्या जीवा

कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप फंड त्रैमासिक कामगिरी

फंडाची रणनीती बाजाराच्या वेगवेगळ्या आवर्तनांमध्ये परतावा मिळविण्यास साहाय्य करते. फंडाच्या धोरणामध्ये पोर्टफोलिओचा आधार म्हणून दर्जेदार, स्थिर, दीर्घकालीन वृद्धीदर राखणाऱ्या कंपन्यांची निवड केली जाते. अशा बहुतांश कंपन्या मूल्यमापनापेक्षा प्रामुख्याने नफ्यातील वृद्धीदराच्या आधारे निवडल्या जातात. फंडाच्या पोर्टफोलिओमधील सर्वाधिक गुंतवणूक बँका आणि वित्तीय सेवा, तंत्रज्ञान, विवेकी वस्तू, औद्योगिक वापराच्या वस्तू आणि आरोग्य निगा या क्षेत्रात आहेत. फंडाच्या पोर्टफोलिओत आयसीआयसीआय बँक एचडीएफसी बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स, लार्सन अँण्ड टुब्रो, झोमेटो, स्टेट बँक, एचसीएल टेक या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. गेल्या दोन वर्षांत फंडाच्या सरासरीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याला रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स, लार्सन अँण्ड टुब्रो आणि इन्फोसिस कारणीभूत ठरले. फंडाच्या पोर्टफोलिओमधील ६८ ते ७० कंपन्या असतात. आघाडीच्या ५ गुंतवणुका या एकूण गुंतवणुकीच्या २४ टक्के तर आघाडीच्या १० गुंतवणुका एकूण गुंतवणुकीच्या ३८ टक्के आहेत. या फंडाच्या ३०-४० टक्के गुंतवणुका अशा कंपन्यात आहे, ज्यांच्या नफ्यात पुढील काही वर्षांत मोठी वाढ होऊ शकते. ही वाढ मुख्यत्वे कार्यक्षमतेतील बदल, उत्पादन आणि उद्योग क्षेत्रात व्यापक सुधारणा, ग्राहकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ, या कारणांमुळे असेल.

हेही वाचा : बाजारातली माणसं -भारतीय भांडवली बाजाराचा चेहरा:आनंद महिंद्र 

उदाहरणार्थ, फंडाच्या गुंतवणुकीतील लार्सन अँड टुब्रो, एबीबी, व्होल्टास, अल्ट्राटेक सिमेंट यांसारख्या कंपन्या भांडवली वस्तूंच्या बदलत्या आवर्तनाशी, तर एचडीएफसी एएमसी, कॅम्स, चोला मंडलम, इंटरग्लोब एव्हिएशनसारख्या कंपन्या ग्राहकांच्या वाढलेल्या दरडोई उत्पन्नाशी निगडित आहेत. ताळेबंदात कमी कर्ज, स्थिर कमाई आणि भांडवलावर चांगला परतावा (आरओआय) असलेल्या दर्जेदार कंपन्यांना प्राधान्य देताना दिसत आहे. गुणवत्ता आणि वाजवी मूल्यांकन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याने हा फंड ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ यादीचा प्रदीर्घ काळ भाग राहिला आहे. कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप हा फंड मध्यम जोखीम असलेल्या आणि किमान पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श पर्याय आहे.

निधी व्यवस्थापक : श्रीदत्त भांडवलदार

Story img Loader