विविध इ-कॉमर्स वेबसाईटवर (उदा: अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, वेस्ट साईड, रिलायंस स्मार्ट ई.) खरेदी करताना पेमेंट करण्यासाठी प्रामुख्याने डेबिट/क्रेडिट कार्डाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे दिसून येते. असे पेमेंट करताना खरेदीदारास आपल्या कार्डचा तपशील (उदा: कार्ड नंबर, कार्डची एक्सपायरी, सीव्हीव्ही नंबर , कार्ड धारकाचे नाव ) संबंधित वेबसाईटवर द्यावा लागत होता, यामुळे हा सर्व डेटा अशा सर्व वेबसाईटना विनासायास मिळत होता, असा डेटा हॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वैयक्तिक डेटाचा बऱ्याचदा गैरवापर सुद्धा होत होता , यामुळे प्रसंगी परस्पर कार्ड वापरले जाऊन (डमी कार्ड तयार करून) फ्रॉड सुद्धा झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे. यावर उपाय म्हणून आरबीआय ने १ ऑक्टोबर २०२२ पासून कार्ड टोकनायझेशन ही प्रणाली सुरु केली याला कार्ड ऑनफाईल टोकनायझेशन (सीओएफटी ) असे म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरबीआय सूचनेनुसार टोकनायझेशन म्हणजे कार्डावरील तपशीलाचा एक युनिकोड तयार करून त्याचा वापर कार्ड वरील नंबर , सीव्हीव्ही,नाव व एक्सपायरी हा तपशील न देता ऑनलाईन पेमेंट करणे. या कोडला टोकन असे म्हणतात. ज्यावेळी आपण ई-कॉमर्स वेबसाईटवर (उदा: अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, वेस्ट साईड, रिलायंस स्मार्ट ई.) पेमेंट करण्यासाठी आपला कार्ड नंबर व अन्य तपशील देता तेव्हा चेकआऊट करताना सेक्युअर युअर कार्ड असा पर्याय दिला जातो हा पर्याय वापरून आपण आपले कार्ड टोकनाइज करू शकतो. यामुळे आपले कार्ड सुरक्षित केले जाते. या पद्धतीमध्ये कार्डधारकास प्रत्येक ई-कॉमर्स वेबसाईट साठी आपले कार्ड टोकनाइज करावे लागते.

हेही वाचा… Money Mantra: बिल्डरच्या सहयोगाने बँकेकडून मिळणाऱ्या गृहकर्जाचे फायदे आणि तोटे

आरबीआयने नुकत्याच जारी केलेल्या सूचनेनुसार आता कार्ड ऑनफाईल टोकनायझेशन (सीओएफटी ) नुसार असे टोकन कार्ड देऊ करणाऱ्या बँकेने पातळीवर केले जावे अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे आपले कार्ड आता आणखी सुरक्षित होणार आहे तसेच प्रत्येक ई-कॉमर्स वेबसाईट साठी वेगळे टोकन जनरेट करावे लागणार नाही. असे बँक पातळीवर जनरेट झालेले कार्डाचे टोकन कार्ड धारकाच्या खात्यास लिंक अर्थात जोडले जाईल. यामुळे वेळ तर वाचेलच शिवाय फ्रॉडची शक्यता पण कमी होईल. टोकनायझेशनमुळे कार्ड वरील १६ अंकी नंबर ऐवजी एक युनिक कोड दिला जातो.

हेही वाचा… Money Mantra: कोणत्या देणगी आणि दानाला करातून सवलत मिळते?

आपल्या कार्डचे टोकनायझेशन कार्डधारकास बँकेच्या वेबसाईटवर किंवा बँकेचे मोबाईल अ‍ॅपवर करता येईल व यामुळे सध्यासारखे प्रत्येक ई-कॉमर्स वेबसाईटवर टोकनायझेशन करण्याची गरज राहणार नाही यामुळे वेळेचीही बचत होईल.

सध्या तरी आपल्या डेबिट/क्रेडिट कार्डाचे टोकनायझेशन करणे बंधनकारक नाही. असे असले तरी आत्तापर्यंत सुमारे ५६ कोटी इतकी कार्ड टोकन जनरेट झाली आहेत व त्यामार्फत सुमारे रु. ५ लाख कोटी इतक्या रकमेचे पेमेंट झाले आहे. (टोकनायझेशन फक्त देशांतर्गत व्यवहारासाठीच वापरता येते)