भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान-३ कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. नुकतेच चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून येत्या काही दिवसांत चांद्रयान पुढील कक्षेत प्रवेश करणार आहे. भारताने गेल्या महिन्यात १४ जुलै रोजी चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो दुसऱ्यांदा चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा प्रयत्न करत आहे.

चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यास त्याचा भारतासह जगभरातील देशांना फायदा होणार आहे. शिवाय भारतीय अर्थव्यवस्थेला मदत करण्याची क्षमता त्यात आहे. मोहीम यशस्वी झाल्यास या क्षेत्रामध्ये भरपूर गुंतवणूक येण्याची आशा आहे. हे भारताची अंतराळ मोहीम, अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्षमता आणि कुवत दर्शविणारे आहे. या प्रयत्नामुळे भारतीय खासगी अंतराळ उद्योगांसाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.२०२२ मध्ये जागतिक अंतराळ संशोधन बाजार ४८६ अब्ज डॉलर एवढा होता, तो २०३२ पर्यंत १,८७९ अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या मोठ्या गुंतवणूक संधीमुळे भारतीय कंपन्या आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
JSW Share News
JSW Cement IPO ला सेबीचा हिरवा कंदील; ११ गोष्टी या ‘आयपीओ’बद्दल…
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Is ESOP or RSU better for employee welfare
कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा

आणखी वाचा: Money Mantra: ‘मिशो’च्या नफ्याचं गमक काय?

चांद्रयान- ३ यशस्वी झाल्यास, भारत अमेरिकेसह अव्वल देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल. चांद्रयान-३ च्या माध्यमातून चंद्रावर यशस्वीरित्या पाऊल ठेणारा भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतर चौथा देश ठरेल, असे मत देशांतर्गत आघाडीची एरोस्पेस कंपनी स्कायरूट एरोस्पेसचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन चंदना यांनी व्यक्त केले.

चांद्रयान ३ या महत्त्वाकांक्षी मोहिमेत भांडवली बाजारात सूचीबद्ध असलेल्या काही आघाडीच्या कंपन्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

आणखी वाचा: वित्तरंजन : खणखणीत नाणे; पण जुने!

१) लार्सन आणि टुब्रो (एलअँडटी)
एल अँड टीने चांद्रयान ३ मोहिमेसाठी अनेक महत्त्वपूर्ण घटकांचा पुरवठा केला – ग्राउंड आणि फ्लाइट अँबिलीकल प्लेट्सच्या (flight umbilical plates) पुरवठ्यापासून ते क्रिटिकल बूस्टर सेगमेंट्सच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रूफ प्रेशर टेस्टिंगपर्यंत अनेक टप्प्यात योगदान दिले. त्यांच्या एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीने भारताच्या तिसर्‍या चंद्र मोहिमेसाठी स्पेस हार्डवेअरच्या उत्पादनासाठी उत्तम गुणवत्ता राखत आणि योग्यवेळेत काम पूर्ण केले आहे. कंपनीने लॉन्च व्हेइकलच्या सिस्टीम इंटिग्रेशनमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सध्याचा शेअरचा बाजार भाव: २,६३१.०२ रुपये
कंपनीचे बाजारभांडवल: ३,६९,८८३ कोटी रुपये

२) हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स

चांद्रयान-३ मोहिमेच्या यशात हिंदुस्थान एरोनॉटिक्सचीही भूमिका आहे. त्यांनी नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज अर्थात एनएएलला अनेक घटकांचा पुरवठा केला. चांद्रयान-३ मोहिमेसाठी महत्त्वाचे कार्य केले आहे.

सध्याचा शेअरचा बाजार भाव: ३,७७३.१० रुपये
कंपनीचे बाजारभांडवल: १,२६,१६७ कोटी रुपये

३) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने इस्रोला त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेसाठी बॅटरीचा पुरवठा केला आहे.

सध्याचा शेअरचा बाजार भाव: १२९.२५ रुपये
कंपनीचे बाजारभांडवल: ९४,४०५ कोटी रुपये

४) वालचंदनगर इंडस्ट्रीज
वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडने १९९३ मध्ये पीएसएलव्ही-डी१ च्या पहिल्या प्रक्षेपणापासून आतापर्यंत सर्व ४८ प्रक्षेपणांसाठी आवश्यक असणाऱ्या विशिष्ट घटकांचा पुरवठा केला आहे.

सध्याचा शेअरचा बाजार भाव: ११५.६० रुपये
कंपनीचे बाजारभांडवल: ५३१ कोटी रुपये

५) सेंटम इलेक्ट्रॉनिक्स
कंपनीने भारतीय अंतराळ मोहिमांसाठी सुमारे ३०० ते ५०० घटक तयार केले आहेत.

सध्याचा शेअरचा बाजार भाव: १,५९९.३० रुपये
कंपनीचे बाजारभांडवल: २,०६२ कोटी रुपये

६) एमटीएआर टेक्नॉलॉजीज
इंजिन आणि स्टेज तयार करण्यासाठी, इस्रोने गोदरेज, हैदराबाद-आधारित एमटीएआर टेक्नॉलॉजीज आणि बेंगळुरू-स्थित हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने त्यात सहभाग नोंदवला.

सध्याचा शेअरचा बाजार भाव: २,२६१.५० रुपये
कंपनीचे बाजारभांडवल: ६,९५६

चांद्रयान-२चं सॉफ्ट-लँडिंग अयशस्वी झाल्यानंतर, इस्रोने चांद्रयान-३ तयार करण्यासाठी सुमारे चार वर्षे मेहनत घेतली. असंख्य भारतीय कंपन्यांच्या संयोगाने, अंतराळ संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन अंतराळयान तयार केले आहे. हे यशस्वी प्रक्षेपण अनेक विकसित आणि विकसनशील देशांना त्यांचे अंतराळ यान आणि उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोकडे येण्यास भाग पाडेल. कारण कमी किंमत आणि उच्च कार्यक्षमता आहे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

डिस्केलमर : या लेखात ज्या कंपन्यांची नावे आली आहेत, ते म्हणजे गुंतवणूकदारांसाठी कोणतीही प्रकराची खरेदीची शिफारस करण्यात आलेली नाही. गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने आणि स्वतः अभ्यास करून मगच शेअर बाजारात गुंतवणूक करावी.

Story img Loader