आकाश आणि त्याची पत्नी सुमेधा नामांकित कंपन्यांमध्ये कामाला होते. काम आणि पगार दोन्ही चांगला होता. दोन वर्षांपूर्वी आकाश आणि सुमेधा आईबाबा झाले होते. छोटी मुक्ता, आपल्या आईबाबा आणि आजीआजोबांसोबत मोठी होत होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शहरात मध्यवर्ती भागात घर होतं. वरून पाहता सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत असला तरी आकाश मात्र काहीसा बेचैन होता. कोणी उघडपणे बोलत नसलं तरी आता सगळ्यांनाच ‘ स्पेस क्रंच ‘ जाणवत होता. राहत असलेलं घर आता कमी पडत होत.
नवीन घर घ्यावं की भाड्याने एखाद्या मोठ्या घरात शिफ्ट व्हावं?
मालकीचं घर असणे चांगले पण त्याची किंमत मोठी असणार. ते परवडेल का?
गृह कर्ज कितीचे घ्यावे? त्याच्या अटी आणि नियम काय असतील?
आकाशला असे एक ना अनेक प्रश्न भेडसावत होते.
घर घेताना आपली आर्थिक तयारी पडताळणे हे सुद्धा गरजेचे असते. आकाश आणि त्याच्यासारख्या अशा सगळ्यांना जर असे प्रश्न पडत असतील तर पुढील पाच गोष्टींचा नक्की विचार करा जेणेकरून तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल.
१. घर घेण्याची वैयक्तिक कारणे स्पष्ट करा
अनेकदा चांगले उत्पन्न असले, फारशा आर्थिक जबाबदाऱ्या नसल्या की अनेक जण आपल्याला एक ‘ प्रॉपर्टी ‘ घेण्याचा सल्ला देतात! प्रॉपर्टी किंवा रिअल इस्टेट ही ‘ दृश्य मालमत्ता ‘ असते. समाजात, नातेवाईकांमध्ये एक प्रॉपर्टी घेणे अभिमानाचे ठरते.
काहीजण करसवलत मिळेल म्हणून रिअल इस्टेट घेतात. बाकी कारणे काहीही असली तर तुम्ही तुमचे स्वतः चे वैयक्तिक कारण ठरवा.
उदा.
-तुम्ही नोकरी व्यवसाय निमित्त दुसऱ्या शहरात स्थलांतर केले आहे आणि आता आर्थिक दृष्टया स्थिरावल्यानंतर तिथेच स्थायिक होण्याचा विचार करताय.
-तुमचे कुटुंब कायम भाड्याच्या घरात राहत आहे आणि म्हणून तुम्हाला आता स्व मालकीचे घर घ्यायचे आहे.
घर घेणे अभिमानास्पद आणि ‘ status ‘ मिळवून देणारे असले तरी त्याची रक्कम खूप मोठी असते. म्हणून तुम्ही तुमची स्वतः ची कारणे ठरवा.
२. लांब कालावधी पर्यंत गृहकर्ज हफ्ते फेडण्याची तयारी
सध्या मोठ्या शहरांमध्ये 1bhk घर रू 75 लाख ते रू 80 लाख इतक्या किंमतीला उपलब्ध आहे. इतकी मोठी रक्कम उभी करणे सोपे नाही. त्यामुळे ‘ गृहकर्ज’ हा सर्वात सोयीस्कर पर्याय आहे.
आज अनेक बँक, NBFC, गृहकर्ज उपलब्ध करून देतात. आपल्याला घराच्या रकमेच्या ८०% पर्यंत साधारणपणे कर्ज उपलब्ध होऊ शकते.
गृहकर्ज घेताना पुढील गोष्टीचा विचार करावा –
- तुम्ही कर्ज घेत असलेल्या बँकेच्या नियम आणि अटी
- कर्जाचा कालावधी
- व्याज दर, प्रकार ( fixed/veriable)
- कर्ज परतफेड लवकर करायची असल्यास त्याचे नियम
- लागणारी सर्व कागदपत्रे
- बिल्डर कडून घ्यावयाची सर्व आवश्यक कागदपत्रे आणि मान्यता
- इन्कम टॅक्स रिटर्न नियमित भरणे
- तुमचा credit score चांगला असणे गरजेचे. किमान ७ किंवा त्यापेक्षा जास्त.
- Down payment तुम्ही कसे करणार आहात तेही महत्त्वाचे
साधारणपणे घर घेताना गृहकर्ज संबंधी वरील गोष्टी विचारात घ्या.
३. उत्पन्नाची स्थिरता आणि आर्थिक जबाबदाऱ्या
आपल्या नोकरी अथवा व्यवसाय नुसार आपले उत्पन्न असते. त्यातील स्थिरता तपासणे गरजेचे आहे. नोकरी असल्यास त्यातील स्थिरता, संभाविक बदल, Employer ची स्थिरता आणि त्याचे कर्मचारी संबंधी नियम ई गोष्टी तपासणे.
व्यवसाय असेल तर त्यात आर्थिक दृष्टया तुमचा किती जम बसला आहे हे तपासणे गरजेचे. याबरोबरच तुमच्यावर असलेल्या इतर आर्थिक जबाबदाऱ्या तपासा. तुमची भविष्यातील ध्येय, जबाबदाऱ्या आणि गरजा लक्षात घ्या. यालाही तुम्हाला आर्थिक जोड द्यावी लागते.
हेही वाचा… Money Mantra: कोणत्या देणगी आणि दानाला करातून सवलत मिळते?
गृहकर्ज म्हणजे मोठ्या कालावधीची ‘ commitmemt ‘ असते. कर्जहफ्ते फेडताना तुमच्या उत्पन्नाचा ठोस हिस्सा दर महिन्याला मोठ्या काळापर्यंत खर्च होतो. तुमचे cashflows यासाठी कितपत तयार आहेत हे पहा.
४. आपात्कालीन निधी
वरील सगळ्या गोष्टी जरी नीट विचारात घेतल्या तरी आयुष्यात अनेक ‘ आगंतुक समस्या ‘ उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत आपले ‘ आर्थिक गणित ‘ डळमळू शकते. म्हणून आपल्याकडे ‘ आपातकालीन निधी ‘ तयार असणे गरजेचे आहे.
साधारणत: १ ते २ वर्ष पर्यंत आपण आपला मासिक खर्च सहज करू शकू इतका आपत्कालीन निधी आपल्याकडे तयार हवा.
उदा. मासिक खर्च जसा की कर्ज हफ्ते, शैक्षणिक आणि वैद्यकीय खर्च, किराणा आणि इतर घरगुती खर्च, विविध bills इ चा खर्च जर दरमहा रु ५०,००० इतका असेल तर साधारण पाने एक वर्ष पुरेल इतका आपत्कालीन निधी रू ६ लाख तयार हवा.
तुम्ही तुमच्या कमी कालावधीचे बँक एफडी, लिक्वीड mutual fund मधील गुंतवणूक यासाठी वापरू शकता. जर अशा कोणत्याही गुंतवणुकी नसतील तर दरमहा बँक रिकरिंग deposit इत्यादी द्वारा तुम्ही हा निधी तयार करणे गरजेचे.
५. जीवन विमा आणि आरोग्यविमा
घर घेताना तुमचा जीवन विमा आणि आरोग्य विमा आहे का हे तपासा.
घर घेताना मोठी आर्थिक जबाबदारी येते. अशा वेळी तुमच्या उत्पन्नावर कर्ज हफ्ते फेडले जात असतील तर तुम्ही तुमच्यावर आर्थिकदृष्टया अवलंबून असणाऱ्या कुटुंबीय साठी ‘ जीवन विमा ‘ घेणे आवश्यक. यामुळे, दुर्दैवाने तुम्हाला काही झाले तरी तुमच्या नंतर या आणि अशा आर्थिक जबाबदाऱ्या ते लीलया पर पडू शकतील. जीवन विमा घेताना ‘ टर्म लाईफ इ्शुरन्स ‘ घेणे आवश्यक. तो किती रकमेचा घ्यावा यासाठी काही ठोकताळे आणि गणिती पद्धती आहेत पण ढोबळमानाने तुम्ही तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० ते २० पट रक्कमेचा टर्म इन्शुरन्स घ्यावा.
हेही वाचा… Money Mantra: ई-फायलिंग पोर्टलवर चूक दुरुस्त करण्यासाठी नवी सुविधा
आरोग्य विमा सुद्धा तितकाच महत्त्वाचा! गृहकर्ज आणि इतर खर्च करताना ‘ वैद्यकीय खर्च ‘ जर उद्भवले तर त्याला हातभार म्हणून ‘ आरोग्य विमा ‘ महत्त्वाचा ठरतो. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जरी तुम्हाला आणि कुटुंबीय ना ‘ ग्रुप मेडिकल इन्शुरन्स ‘ लागू असेल तरी तुम्ही तुमची ‘ वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी ‘ घेणे गरजेचे आहे.
घर ही एक नुसती जागा नसून ‘ एक भावना ‘ असते! तुम्हाला निश्चिंत होऊन याचा आनंद घ्यायचा असेल तर वरील सोप्या गोष्टींचा नक्की विचार करा!