खासगी क्षेत्रातील DCB बँकेने बचत खाते आणि मुदत ठेव (फिक्स्ड डिपॉझिट/एफडी) चे व्याजदर वाढवले आहेत. या वाढीनंतर बँक बचत खातेदारांना ८.०० टक्के दराने व्याज देत आहे. तसेच सामान्य गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त ८.०० टक्के व्याज मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना FD वर ८.५० टक्के व्याज मिळत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ८ मे २०२३ पासून नवे व्याजदर लागू झाले आहेत.
DCB बँकेतील बचत खात्यावरील व्याजदर काय?
बचत खात्यातील १ लाख रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेवर २.०० टक्के, १ लाख ते २ लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असल्यास ३.७५ टक्के, २ लाख ते ५ लाख रुपयांपेक्षा कमी रुपये असल्यास ५.२५ टक्के आणि ५ लाख रुपये बचत खात्यावर ६.२५ टक्के व्याज दिले जाते. बचत खात्यातील १० लाख ते ५० लाखांपेक्षा कमी रुपये असल्यास ७.०० टक्के, ५० लाख ते २ कोटींपेक्षा कमी शिल्लक असल्यास ७.२५ टक्के, २ कोटी ते ५ कोटीपेक्षा कमी शिल्लक असल्यास ५.५० टक्के, ५ कोटी ते १० कोटींपेक्षा कमी रुपये असल्यास ७.०० टक्के, १० कोटी ते २०० कोटींपेक्षा कमी रुपये असल्यास ८.०० टक्के, २०० कोटींवरील शिल्लक रकमेवर ५.०० टक्के व्याज दिले जाईल.
DCB बँकेत FD व्याजदर काय?
FD वर ७ दिवस ते ४५ दिवस – ३.७५ टक्के
FD वर ४६ दिवस ते ९० दिवस – ४.०० टक्के
९१ दिवसांपासून ते ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर – ४.७५ टक्के
६ महिन्यांपासून ते १२ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर – ६.२५ टक्के
१ वर्षापासून १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर – ७.२५ टक्के
१५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी FD वर – ७.५० टक्के
१८ महिन्यांपासून ७०० दिवसांपेक्षा कमी FD वर ७.७५ टक्के
७०० दिवस ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर – ८.०० टक्के
३ वर्ष ते ५ वर्षांच्या एफडीवर -७.७५ टक्के
FD वर बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याज दिले जात आहे.
हेही वाचा: RuPay द्वारे आता सर्वत्र करता येणार पेमेंट; NPCI ची Visa-Master ला टक्कर देण्याची तयारी