कौस्तुभ जोशी, अर्थ विश्लेषक

गेल्या काही वर्षात बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट स्वरूपामध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा अन्य पर्यायांचा विचार गुंतवणूकदार करताना दिसतात. यामध्ये कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट हा आवडता पर्याय होताना दिसत आहे. गेल्या तीन-चार वर्षात समाजमाध्यमातून आणि वेगवेगळ्या पोर्टल मधून कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिटच्या जाहिराती वरचेवर दिसतात व यामधील आकर्षक व्याजदर गुंतवणूकदारांना भुरळ पाडतो.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

खरोखरच कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट म्हणजे काही वेगळी गुंतवणुकीची पद्धत आहे का ?

या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. एखाद्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट म्हणून पैसे गुंतवणे याऐवजी एखाद्या वित्तसंस्थेमध्ये फिक्स डिपॉझिट स्वरूपात पैसे गुंतवणे एवढाच काय तो फरक आहे.

कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट कोण उभारू शकतात ?

पब्लिक आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्याचबरोबर गेल्या दशकभरात वेगाने व्यवसाय वाढलेल्या बिगर बँकिंग वित्त कंपन्या (नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज) या फिक्स डिपॉझिट माध्यमातून पैसे गोळा करतात.

हेही वाचा : Money Mantra : आयुर्विमा पॉलिसी आणि क्लेम सेटलमेंटचं गणित

कॉर्पोरेट एफडीचे कंपन्या काय करतात ?

ज्याप्रमाणे ठेवीदारांकडून बँका पैसे गोळा करतात व ते पैसे पुन्हा कर्जरूपाने अर्थव्यवस्थेत फिरवले जातात त्याचप्रमाणे कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्याकडे आलेल्या ‘एफडी’च्या पैशातून विविध प्रकारची कर्ज देतात व यासाठीच एफडीचा उपयोग केला जातो.

कॉर्पोरेट एफडी आणि क्रेडिट रेटिंग

ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना फंड योजनेच्या ‘रिस्कोमिटर’कडे लक्ष देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करताना ज्या कंपनीत आपण पैसे गुंतवणार आहोत त्या कंपनीचे क्रेडिट रेटिंग कसे आहे याचा विचार करायला हवा. जर क्रेडिट रेटिंग कमी असेल तर अशी गुंतवणूक अधिक जोखीम असलेली असते. अशावेळी कमी क्रेडिट असलेल्या कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवू नयेत.

तुमच्या गरजा आणि कॉर्पोरेट ‘एफडी’चा कालावधी

बऱ्याचदा कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिटमध्ये मिळणारे आकर्षक व्याजाचे दर अल्प कालावधीसाठी नसतात. बँकांमध्ये मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा अर्धा किंवा पाऊण टक्के जास्त व्याजदर मिळत असला तरीही अशा योजना पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांसाठी असतात. जर तुम्हाला तुम्ही गुंतवलेले पैसे नक्की परत कधी लागणार आहेत याची हमखास खात्री देता येत नसेल तर पाच किंवा सहा वर्षासाठी पैसे गुंतवण्यात अर्थ नाही.

हेही वाचा : Money Mantra : आरबीआयने नियम बदलले! आता वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड मिळण्यात अडचणी येणार

मुदतीपूर्वी ‘एफडी’ मोडता येते का ?

बँकेतील फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवलेले पैसे मुदतीआधी सुद्धा परत मिळतात; अर्थातच त्यावेळी कमी व्याजदर दिला जातो. काही निवडक बँकेच्या योजना वगळता सर्वच योजनांमध्ये मुदतीपूर्वी आकस्मिक गरज असल्यास पैसे परत मिळण्याची सोय असते. पण सर्वच कॉर्पोरेट ‘एफडी’ मध्ये ही सोय असेलच नाही.

त्यामुळे गुंतवणूक करायच्या आधी ही सोय आहे का ? हे अटी आणि शर्तींच्या यादीमध्ये व्यवस्थित बघून घ्यावे. महागाईचा दर आणि ‘एफडी’चा व्याजदर

कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचा बँकांपेक्षा जास्त दर असणे हा गुंतवणूक करण्यामागील प्रमुख उद्देश असतो. पण पाच किंवा सात वर्षासाठी तुम्ही एकदा गुंतवणूक केलीत की मिळालेला व्याजदर बदलत नाही. दरम्यानच्या काळात अचानक महागाई वाढली तर तुम्हाला मिळणारे व्याज बदलत नाही पण महागाई मात्र ते व्याज खाऊन टाकते. एखादवेळी असाही अनुभव येतो की महागाई वाढल्यावर कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिटचे व्याजदरही वाढतात. मात्र आपण आधीच 60 ते 70 महिन्यांसाठी एफडी केलेली असते आणि ती मध्येच मोडून नवीन व्याजदराने करण्यात काही अर्थ नाही असे लक्षात येते.

हेही वाचा : Money Mantra : गुंतवणुकीसाठी फंड निवडताय ? दहा वर्षाचा सीएजीआर बघा !

कंपनीचा लेखाजोखा तपासून घ्या !

कॉर्पोरेट कंपन्या गुंतवणूकदारांकडून आकर्षक व्याजदर हे प्रलोभन दाखवून पैसे घेतात; पण त्या कंपनीचे व्यवहार कसे आहेत? हे गुंतवणूकदारांनी बघितले पाहिजे. किमान तीन ते पाच वर्षाचे नफ्याचे आकडे बघितले पाहिजेत. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षात कंपनीचा व्यवसाय सतत वाढतो आहे ना ? याची खात्री करून घेतली पाहिजे. कारण जर तुम्ही गुंतवलेली कंपनीच सुदृढ व्यवसाय असणारी नसेल तर तुमचे पैसे सुद्धा बुडू शकतात.

एकूण पोर्टफोलिओचा थोडा भागच कॉर्पोरेट एफडीत असावा

एकूण गुंतवणुकीच्या रकमेपैकी सर्वच पैसे कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणे हे सुद्धा धोक्याचे आहे. कारण त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओचे नुकसानच होत असते. कॉर्पोरेट फिक्स डिपॉझिट डेट (Debt) प्रकारात मोडतात.

बदलत्या वयोमानाबरोबर, बदलत्या आर्थिक गरजांनुसार इक्विटी आणि डेट यांचे एकत्रित अस्तित्व पोर्टफोलिओ मध्ये असणे काळाची गरज आहे. म्हणून सगळेच पैसे कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणे हा चुकीचा निर्णय आहे.