डॉ. आशीष थत्ते
जगात संपत्तीविषयक तीन महत्त्वाचे विचार आहेत. पहिला म्हणजे संपत्तीचे निर्माण, संपत्तीचे व्यवस्थापन आणि संपत्तीची वाटणी होय. उद्योगधंदा किंवा कुठे तरी काम करून आपण स्वतःसाठी संपत्ती निर्माण करतो. मिळालेल्या या संपत्तीचे व्यवस्थापन म्हणजेच गुंतवणूक आणि गुंतवणुकीचाच दुसरा अर्थ हा संपत्तीचे सुयोग्य व संतुलित वाटप देखील असते. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स किंवा भारतीय माहिती-तंत्रज्ञान कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांसारख्या धुरिणींना हे दाखवून दिले आहे की, संपत्तीचे वाटप किती महत्त्वाचे असते. संपत्तीचे व्यवस्थापन करतानाच, संपत्तीच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक गोष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संपत्ती मिळवली तर तिचे व्यवस्थापनही होईल हे त्यातील महत्त्वाचे अंग गृहीत धरले जात असते. ख्यातनाम उद्योगपती वॉरेन बफे यांची वचने बघितली तर ते सांगतात की, ‘किती पैसे वाचवायचे हे ठरवून मगच खर्च करा.’ पण आपण नेमके या उलटच करत असतो.

आणखी वाचा-Money Mantra : कर वाचवण्यासाठी पालकांना भाडे देता येते का? नियम काय सांगतो?

वाचलेला पैसा कितीतरी काळापासून गुंतवणूक करण्याची रीत चालत आली आहे. अगदी कावळादेखील आपले जमवलेले अधिकचे अन्न कुठे तरी लपवून ठेवतो, तसेच पूर्वीच्या काळी वाचलेला पैसा तांदळाच्या डब्यात, गादीखाली, नातलगांकडे ठेवण्याची प्रथा होती. हे त्यावेळचे संपत्तीचे व्यवस्थापन होते. पण तेथे संपत्ती निर्माण होत नव्हती, तर संपत्तीचा तो केवळ साठा होता. योग्य वेळी तो साठा वापरला जायचा. बँकिंग सेवा आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून गुंतवणुकीचे मार्ग मिळत गेले आणि त्यावर असलेल्या व्याज लाभातून संपत्ती निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. पुढे भांडवली बाजारापासून ते सध्याच्या आभासी चलन असलेल्या बिटकॉइनपर्यंत गुंतवणुकीचे एक ना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या बहुविध पर्यायांपैकी आपल्या फायद्याचे काय हे निवडता येणे अवघड बनल्याने गुंतवणूक सल्लागाराची आवश्यकता निर्माण झाली.

आणखी वाचा- Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे: कोणती करप्रणाली निवडायची हे कसे ठरवू?

मोठमोठ्या कंपन्या आपल्या कमावलेल्या पैशाचे व्यवस्थापन कसे करत असतील, याचा जरा विचार करा. जसे आपण साठवलेल्या पैशांमधून गाडी किंवा घर घेतो तसेच मोठ्या कंपन्या नवीन उपकरणे किंवा चक्क एखादी नवीन कंपनी विकत घेतात. म्हणजेच गुंतवणुकीचे अनेक फायदे असतात. मात्र ती गुंतवणूक तुमच्या गरजेनुसार आणि जोखीम क्षमता आणि लक्ष्यानुरूप असणे आवश्यक आहे.

गुंतवणुकीचे जे पारंपरिक मार्ग आहेत त्याची माहिती वेळोवेळी ‘अर्थ वृत्तान्त’च्या माध्यमातून मिळत असतेच. पुढील काही लेखांमध्ये आपण असे काही मार्ग बघू जे पारंपरिक नाहीत, पण तरीही तुम्ही त्यांचा विचार करू शकता आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायदेशीर आहेत. गुंतवणुकीची वाढ थोडी अवघड वाटली तरी अगदीच अशक्य नाही आणि होय या प्रवासात ‘वित्तरंजन’ नक्कीच होईल.

ashishpthatte@gmail.com