गौरव मुठे

‘सेन्सेक्स’ने नुकताच ६६ हजारांचा ऐतिहासिक विक्रमी टप्पा गाठला, तर निफ्टीनेदेखील १९,५०० अंशांची उच्चांकी पातळी गाठली आहे. या बाजार तेजीमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप प्रकारातील कोणत्या फंडात गुंतवणूक करावी? तसेच बाजार विक्रमी उच्चांकावर असताना गुंतवणूक करावी काय? याबाबत, युनियन ॲसेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे सह-मुख्य गुंतवणूक अधिकारी (इक्विटी) संजय बेंबळकर यांच्याशी साधलेला संवाद…

Ajit Pawar Sabha Mohol, Ajit Pawar news,
अजित पवारांकडून करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांचा प्रचार, महायुती धर्माला कोलदांडा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Sanjay Kelkar and Sanjay Bhoir of Mahayuti reunion in Thane city
संजय केळकर आणि संजय भोईर यांचे मनोमिलन; ठाणे शहरात महायुतीमधील नाराजी अखेरच्याक्षणी दूर
Sanjay Rauts statement protested by Thane Small Scale Industries Association
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा ‘टिसा’कडून निषेध
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा

भांडवली बाजार उच्चांकी पातळीवर आहे, अशा वेळी गुंतवणूक करावी काय?

गेल्या दशकभराचा आढावा घेतला तर लक्षात येईल की, देशाने विविध क्षेत्रांत प्रगती साधली आहे. वस्तू-सेवा कर (जीएसटी), निश्चलीकरण तसेच अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणाऱ्या गोष्टी या काळात घडल्या आहेत. करोनाकाळातदेखील भारतीय कंपन्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत चांगले काम केले आहे. नवनवीन क्षेत्रांत पाऊल टाकले आणि त्याचे सुपरिणाम आता दिसू लागले आहेत. बाजाराला उच्चांकी दिशेने उसळी घेण्यास भाग पाडणारे हे एक कारण आहे. आम्ही बाजाराला एका वेगळ्या नजरेतून बघतो. यासाठी ‘फेअर व्हॅल्यू’ नावाची एक संकल्पना मांडली आहे. फक्त एखादे गुणोत्तर बघून बाजाराचा किंवा समभागाचा अभ्यास करत नाही तर संपूर्ण ३६० अंशांतून हा अभ्यास सुरू असतो. कंपन्यांचा ताळेबंद, वाढ, जोखीम आणि बाजारातील व्याजदराची पातळी या चार गोष्टींचा अभ्यास ‘फेअर व्हॅल्यू’ काढताना आम्ही करतो. यातूनच बाजाराच्या एकूण मूल्यांकनाकडे आम्ही बघतो. सध्या भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यादेखील नजीकच्या काळात दोन अंकी वाढ दर्शवतील. बाजार सध्या उच्चांकी पातळीवर असला, तरीदेखील गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोन असल्यास या पातळीवर केलेली गुंतवणूकदेखील नक्कीच फायदेशीर ठरेल.

आणखी वाचा-Money Mantra: डिकॉय इफेक्ट खरेदी- विक्रीवर कसा परिणाम करतो?

सध्या अर्थव्यवस्थेसमोर कोणती आव्हाने आहेत?

अर्थव्यवस्थेत अनेक घटक कार्यरत असतात. जागतिक पातळीवर मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढविले आहेत. विशेषतः युरोप आणि अमेरिकी मध्यवर्ती बँकांनी व्याजदर सर्वाधिक वाढवले असून त्याचा परिणाम आपण पाहात आहोत. अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हने डिसेंबर २०२१ पासून व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली असून ५ टक्क्यांपर्यंत व्याजदर वाढवले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग म्हणून त्याचा भारतावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. जागतिक संस्था असणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँकेनेदेखील जागतिक अर्थव्यवस्थेसह विकसित राष्ट्रांचा विकासदर हळूहळू मंदावत असल्याचे सांगितले. यामुळे जी निर्यात-केंद्रित क्षेत्र आहेत जसे की, माहिती-तंत्रज्ञान, औषध निर्माण वगैरे क्षेत्रांना आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. पण सध्याची जोखीम ही बाह्य स्वरूपाची आहे. तर देशांतर्गत पातळीवर कंपन्या चांगली कामगिरी बजावत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय कृषी क्षेत्र हे मोसमी पावसावर अवलंबून आहे. जर पाऊस कमी झाला आणि महागाईने पुन्हा फणा बाहेर काढला तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. त्यांचा आकार आणि ताळेबंद लहान असल्याने रोख रकमेचा अभाव असतो. अशा वेळी व्याजदर जास्त असतील तर त्यांचा भांडवली खर्चदेखील मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यांचा परिणाम एकूणच कंपनीच्या वाढीवर होतो.

सध्याच्या तेजीत स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांचे मोठे योगदान राहिले. मात्र गुंतवणूकदारांनी निवड नेमकी कशी करावी?

करोनानंतर लार्ज कॅप कंपन्या चांगली वाढ दर्शवतील आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅप क्षेत्रात थोडी जोखीम अधिक राहणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे लार्ज कॅपने कामगिरी केली. पण आमच्या ‘फेअर व्हॅल्यू’च्या निकषानुसार, स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांनीदेखील चांगली वाढ दर्शवली आणि त्यांचे मूल्यांकनदेखील चांगले वाटल्याने जानेवारी – फेब्रुवारीपासून आमच्या गुंतवणुकीत बदल करत लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये समसमान गुंतवणूक विभागली आहे. मिड कॅपने गेल्या तीन महिन्यांत ५ टक्के आणि स्मॉल कॅपने ७ ते ८ टक्के वाढ साधली. या क्षेत्रातील कंपन्या या ‘हाय ग्रोथ’ म्हणजेच त्यांच्याकडून जोमदार वाढ अपेक्षित असल्याने त्यांना अधिमूल्यदेखील चांगले मिळते. त्यामुळे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या सध्या गुंतवणुकीसाठी सारख्याच आकर्षक भासत आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांना भांडवल उपलब्धता किंवा व्याजदर वाढीची चिंता होती, याबाबत जोखीम आधीच्या काळात सतावत होती. जागतिक पातळीसह देशांतर्गत पातळीवर व्याजदर वाढीला विराम देण्यात आला आहे, हे या कंपन्यांसाठी फायदेशीर आहे.

आणखी वाचा- Money Mantra: शेअर बाजारात उतरताय तर ‘हे’ लक्षात ठेवाच!

सगळ्यात आधी गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी. शिवाय प्रत्येकाची जोखीम घेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. यामुळे आपल्या जोखीम क्षमतेनुसार ‘फंड अलोकेशन’ करायला हवे. निधी व्यवस्थापकाच्या दृष्टीतून बघितल्यास स्मॉल-मिड कॅप सध्या अधिक आकर्षक वाटत आहेत. आर्थिक शिस्त यात सर्वात महत्त्वाची आहे, कारण या प्रकारच्या फंडात दर सहा महिन्यांनी ‘एन्ट्री-एक्झिट’ची रणनीती अवलंबवावी लागते. यासाठी गुंतवणूकदाराने जागृत राहणे आवश्यक आहे. म्हणजेच आपल्या पोर्टफोलिओचे ठरावीक अवधीने त्यांनी अवलोकन करणे आवश्यक आहे.

पुढील वर्षात लोकसभेची निवडणूक असल्याने बाजारात अधिक अस्थिरता दिसेल काय?

अर्थव्यवस्थेचा एक फंडामेंटल बेस तयार झाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत तेजीचे वातावरण आहे. केंद्र सरकार भारताला जगाचे निर्मिती केंद्र म्हणून उदयास आणू पाहात आहे. यासाठी सरकारने ध्येय-धोरणांमध्ये आवश्यक बदल केले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या कंपन्यांसाठी लाल गालिचा अंथरण्यात आला आहे. शिवाय एका अभ्यासानुसार, पूर्वी केवळ ४ ते ५ टक्के कंपन्यांना भारतात गुंतवणुकीचे आकर्षण होते. आता मात्र हे आकर्षण १४ टक्के जागतिक कंपन्यांमध्ये आहे. सरकारने १४ विविध क्षेत्रांत उत्पादनसंलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआय) आणली आहे. जेणेकरून जागतिक निर्मिती केंद्र बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. शिवाय निर्मिती परिसंस्था निर्माण करून जागतिक पातळीवर चीन प्लस वन किंवा युरोप प्लस वन म्हणजेच या देशांना पर्याय म्हणून भारताकडे बघितले जात आहे. ही प्रगती तीन ते सहा महिन्यांत झालेली नाही किंवा होणारी नाही. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने याकडे बघायला हवे. निश्चितच पुढील वर्ष निवडणुकांचे असल्याने वर्षभर बाजारात चढ-उतार अधिक संभवतात. पण पायाभूत सुविधा, रेल्वेचा विस्तार आणि आधुनिकीकरण तसेच वित्त आणि बँकिंग क्षेत्रातील समावेशन यातील प्रगती बघता एक इक्विटी गुंतवणूकदारांसाठी दीर्घकाळात कल सकारात्मक राहण्याची आशा आहे.
अमेरिकेसह भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीला विराम दिला आहे. मात्र ‘फेड’ने पुन्हा व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. व्याजदर वाढ पुन्हा झाल्यास बाजारावर त्याचा काय परिणाम होईल?

आणखी वाचा-Money Mantra: सोळावं वरीस सोन्याचं! ‘हा’ फंड आपल्या पोर्टफोलिओत हवाच!

आपण एक विकसनशील देश आहोत. त्यामुळे भांडवल उभारणीसाठी आपल्याला विकसित देशांवर काही अंशी अवलंबून राहावे लागते. त्यामुळे व्याजदर हा एक प्रमुख परिणामकारक घटक आहे. अमेरिकेतील ‘फेड’कडून होणाऱ्या व्याजदर बदलाचा कायमच जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आला आहे. ते जर आणखी वाढले किंवा उच्च पातळीवर कायम राहिले तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम दिसेल. मात्र भारत जगातील सध्या सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याने परदेशी गुंतवणूकदारांना भांडवली बाजार आकर्षित करत आहे.

‘फेअर व्हॅल्यू’ संकल्पना काय आहे?

‘फेअर व्हॅल्यू’ हा युनियन म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक प्रक्रियेचा मुख्य भाग आहे. कोणत्याही कंपनीला गुंतवणूक करण्याआधी अभ्यासताना केवळ पीई गुणोत्तर किंवा करोत्तर नफा या निकषांबरोबरच, कंपनीवर कर्जभार किती आहे, तिची भांडवली ताकद कशी आहे, ताळेबंद मजबूत आहे काय? हेही पाहिले जाते. शिवाय कंपनी करत असलेल्या व्यवसायातील जोखीम किती आणि व्याजदर पातळी या सर्व गोष्टींचा अभ्यास करून ‘फेअर व्हॅल्यू’ काढली जाते.

बाजारात सांगितले जाते की, कमी किमतीला खरेदी करा आणि जास्त किमतीला विका. पण नेमकी केव्हा जास्त किंमत किंवा कमी किंमत असते? हेच तर आम्ही ‘फेअर व्हॅल्यू’तून निश्चित करतो.

गुंतवणुकीसाठी कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे?

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राने गेल्या १० ते २० वर्षांत मोठी संपत्ती निर्मिती केली आहे. त्या कंपन्यांचा रिटर्न ऑन कॅपिटल म्हणजेच भांडवली परतावा खूप चांगला आहे. करोनाकाळानंतर आणि जागतिक मंदीमुळे विशेषतः अमेरिका आणि युरोपातील अर्थव्यवस्था मंदावल्याने त्यांच्या कमाईवर परिणाम झाला आहे. पण अल्पकालावधीत याचा परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे. आम्ही सध्या निर्मिती क्षेत्र, वित्त क्षेत्र, दूरसंचार क्षेत्र आणि ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. भारताचे दरडोई उत्पन्न हे एका विशिष्ट बिंदूपर्यंत येऊन पोहोचले आहे. अशा वेळी नागरिक ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन, हॉटेल किंवा इतर किरकोळ वस्तूंवर अधिक निधी खर्च करतो. त्यामुळे या क्षेत्राशी निगडित कंपन्यांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.

gaurav.muthe@expressindia.com