Disruption – मन्वंतर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवीन वर्ष हे पंचविशीचे. ‘कवळी किरळी नव्हती तुमची पाहिली पंचविशी’ या उक्तीप्रमाणे पंचविशीच्या जुन्या आठवणी प्रत्येकासाठी रम्यच असतात. पंचवीस वर्षांची उमर हा खरे तर उंबरठा असतो अस्सल जीवनाचा. कंबर कसून जबाबदाऱ्या पेलण्याचा, स्वतःव्यतिरिक्त इतरांचेही सुख, समाधान पाहण्याचा, दुःख, वेदना समजून घेण्याचा प्रवास येथूनच सुरू होतो. हा बदल न कुणाला चुकला आहे, चुकवता आला आहे. नव्या वर्षात, या नवीन स्तंभाची सुरुवात म्हणूनच, नवीनता आणि या शब्दाच्या अंग-उपांगापासून.
‘डिसरप्शन’ हा सध्याच्या नवउद्यमी / स्टार्टअप संस्कृतीतून पुढे येऊन, रुळलेला शब्द. वेगवेगळे शब्दकोश याचे बरेच वेगवेगळे अर्थ सूचित करतात. तथापि रुळलेला मार्ग खंडित करून, अगदी उलथापालथ घडवून आणणाऱ्या क्रिया-प्रक्रियेचे अनुसरण असाच याचा व्यावहारिक अर्थ असल्याने ‘मन्वंतर’ हा शब्दच त्यासाठी चपखल ठरतो. सरासरी साडेतीन कोटी वर्षांचे एक मन्वंतर मानले जाते. इतका काळ नाही, पण ज्या बदलासाठी काही दशके लोटावी लागली असती, ती अकस्मात घडून येऊन आपल्यावर जी आदळत आहेत, तीदेखील डिसरप्शन अर्थात मन्वंतरेच म्हणावीत.
हेही वाचा – New Rule In 2025 : यूपीआय पेमेंट ते EPFO… एक जानेवारीपासून ‘या’ नियमांत होणार बदल
उद्योग, व्यवसायात अशी मन्वंतरे निरंतर सुरूच आहेत. अगदी पहिल्या औद्योगिक क्रांतीचा काळ हा डिसरप्शनच होता. नवीन उत्पादनच नव्हे, तर बाजारपेठही नवी आणि उत्पादन ते बाजारपेठ या दरम्यानची मूल्यशृंखलाही नवी या अर्थाने मोठे बदल तेव्हापासून सुरू आहेत. आता तर चौथ्या औद्योगिक क्रांतीचे पर्व सुरू आहे. प्रत्येक नवीन बदल जरी कितीही परिवर्तनकारी असला तरी तो मन्वंतर या वर्गात मोडणाराच नसतो. हे जरी खरे असले तरी एव्हाना आपण क्षणोक्षणी जे जे नवीन काही अनुभवत आहोत, ते अभूतपूर्वच आहे. उबर, ओला, स्विगी, झोमॅटो आणि एक ना अनेक वित्तीय व देयक व्यवहारांची मोबाइल उपयोजने अर्थात अप्स आपल्या नित्य जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. कधीकाळी अंगळवणी पडलेल्या पण आता निर्जीव व कालबाह्य ठरवून मोडीत काढल्या गेलेल्या सवयी, चीजवस्तू, जुनी मळलेली वाट सोडणारे हे बदल आहेत. या बदलांचा आवेश, सपाटा आणि स्वीकारार्हता/ लोकप्रियता पाहता ती मन्वंतरंच ठरावीत.
– अर्थबोधी/ arthbodhi2025@gmail.com
आठवड्याचे प्रतिशब्द
Startups (नवोपक्रम, नवउद्यम)
प्रारंभ, प्रथमावस्था ही कोणत्याही कार्याला आणि धंद्याला हात घालण्याआधीची एक अटळ अवस्था. काहीही फलप्रद होण्यासाठी हे आरंभ चरण महत्त्वाचेच. तथापि नव्या पिढीच्या स्टार्टअप्स अर्थात नवोपक्रमांशी संलग्न अर्थ हा इतकाच मर्यादित नाही. अन्यथा सुरुवात होऊन दशकभर लोटले तरी त्यांची ही नव चरण अवस्था कायम राहिली नसती. धोरणकर्ते आणि गुंतवणूकदारांच्या जगतातही नवउद्यम / स्टार्टअप्सचा अर्थ याहून वेगळा आहे. भारताच्या सरकारकडून ‘स्टार्टअप इंडिया’ योजना चालविली जाते. अनेक राज्यांमध्ये नवउद्यम संस्कृतीला प्रोत्साहन म्हणून वेगवेगळ्या योजना अस्तित्वात आहेत. या सरकारी योजनांलेखी नवउद्यम / स्टार्टअप्सची व्याख्या केली गेली आहे. तशी अशी की, ‘उत्पादन किंवा प्रक्रिया किंवा सेवांची नवकल्पना साकारणारा असा उपक्रम जो विकास किंवा सुधारणेसाठी निरंतर काम करत राहिल, रोजगार निर्मिती किंवा संपत्ती निर्मितीची उच्च क्षमता असलेले वाढप्रवण असे त्याचे व्यवसाय प्रारूप असेल.’ सारांशात, लोकांच्या वेदना, समस्या हेरून, त्यावर तोडगा सुचविणाऱ्या नफाक्षम व्यवसाय प्रारूपाची नवकल्पना घेऊन सुरू झालेला उपक्रम ‘नवउद्यम’ म्हटला जातो. नवउद्यम / स्टार्टअप ही एक कंपनीच आहे, जिच्याकडे तंत्रज्ञानाधारीत समस्या-निवारणाचे गुण असल्यामुळे तिची वेगळी वर्गवारी केली गेली आहे. अन्य कोणत्याही धंद्यातील कंपनीप्रमाणे व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात संस्थापकच सामान्यतः स्वतःच त्यांच्या नवउद्यमासाठी पैसा उभा करतात. काही प्रसंगी मित्र, नातेवाईकांकडून वित्तपुरवठा मिळविला जातो. आणि नवप्रयोग जमिनीवर पाऊल जमवू लागल्याचे दिसल्यास, बाहेरील गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागतात. या निधी स्रोतांमध्ये देवदूत गुंतवणूकदार, सरकारी योजनेतून अनुदान, साहसी भांडवलदार आणि बँका व वित्तसंस्थांचे कर्ज यांचा समावेश होतो.
Incubation (उष्मायन)
नवउद्यमाने जोवर रांगायलाही सुरुवात केलेली नसते, तेव्हा त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास बळ देण्याचे काम म्हणजे Incubation / उष्मायन होय. नवउद्यमाच्या भरणपोषणाच्या टप्प्यांत त्यांना पुरेशी आर्थिक, मानवी आणि भौतिक संसाधने उपलब्ध होईपर्यंत प्रोत्साहन देण्याच्या कार्यात गुंतलेल्या उष्मायन संस्था आज देशांत ठिकठिकाणी स्वयंप्रेरणे आणि तर काही ठिकाणी विशेष उपक्रम म्हणून सरकारच्या प्रोत्साहनाने उभ्या राहिल्या आहेत. अशा उष्मायन संस्था या नवकंपन्यांना सुरुवातीच्या टप्प्यांत आश्रय देण्यासह, त्यांना प्रसंगी खाऊपिऊ घालून मायेने सांभाळही करतात म्हटल्यास वावगे ठरू नये. सध्याच्या नवउद्यम (स्टार्टअप्स) संस्कृतीत उष्मायन संस्था हा एक मूलभूत महत्त्वाचा घटक आहे. नवउद्यम / स्टार्टअप्सच्या जडणघडणीच्या प्रक्रियेत उष्मायनाबरोबरीनेच, प्रवेगक (अॅक्सीलेटर) हा आणखी महत्त्वपूर्ण प्रोत्साहनपर घटक आहे. जरी या दोघांची भूमिका आणि कामाची वैशिष्ट्ये एकसारखी असली उष्मायन संस्था या प्रवेगकांपेक्षा (अॅक्सीलेटरपेक्षा) वेगळ्या आहेत. परंतु प्रत्येक कार्य वेगळ्या प्रकारे थोडेसे भिन्न लक्ष्यांसह यांच्याकडून केले जाते. उष्मायन केंद्रे अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतात ज्या नुकतीच त्यांची कल्पना व्यवसायात विकसित करण्यास सुरुवात करत आहेत, तर प्रवेगक हे प्रस्थापित व्यवसाय प्रारूपासह स्टार्टअपचे पालकत्व घेतात आणि बाजारपेठेला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या सक्षमतेसाठी कार्य करतात.
Insight (मर्म, खूबी)
कोणतेही नाविन्य / Innovation हे नवीन कल्पनेने जन्म घेऊनच आकार घेते. मात्र या आकार घेण्याच्या पद्धती आणि क्रम वेगवेगळे असू शकतात. या अर्थाने नाविन्यतेचे अनेक अंग पुढेही आली आहेत. काही तरी नवीन घडते यापेक्षा जनसामान्यांसाठी त्यातून कोणते मूल्य गवसले यालाच नवोपक्रमांत, खरेखुरे नाविन्य / Innovation म्हणून अर्थ प्राप्त झाला आहे. लोकांचे जुनाट समस्याविधान कसे निवळेल असा तोडगा म्हणजेच नाविन्य. ही सतत घडणारी प्रक्रिया आहे. सतत सुधारणा, त्यातून वाढीव नवोपक्रम, त्यायोगे मूलगामी परिवर्तन आणि अंतिमतः उद्दिष्ट हे पहिल्या भागात म्हटले त्याप्रमाणे मन्वंतर / डिसरप्शन असा हा क्रम आहे. मात्र हे घडायचे तर आजवर साधलेल्या नवीनतेचा पाठपुरावा, सिद्ध झालेल्या कार्याचे विहंगावलोकन, त्याची साधनसूची, प्राधान्यक्रम आणि परिणामांची संगती लावणाऱ्या संरचना व प्रक्रियांची सुसंगत आखणी करणारी प्रणाली आवश्यक ठरते. नाविन्याशी संबंधित क्षेत्राबद्दल असे सतत शिकणे, त्यातून निघणाऱ्या निष्कर्षांचा अर्थ लावणे याला व्यापार परिभाषेत Insight / मर्म, खूबी असे म्हटले जाते. इनसायटिंग ही अशी प्रक्रिया आहे जिच्यायोगे नवीन ज्ञानाची, कल्पनेची कवाडे खुली होत असतात. एकूणात व्यवसायाचे नवीन दालन या मार्गाने उघडले जाते. अर्थात अनेक गोष्टींची अचूकपणे वारंवार पुनरावृत्ती करतच, नवीन प्रक्रिया आणि पद्धतींना जन्माला घालणारी ही रीत आहे. असे असले तरी ही प्रक्रिया रेषीय नाही, तर ती खूपच कष्टदायी आहे याबद्दल मनांत पक्की खूणगाठ असू द्यावी.
Benchmarking (किमान मानदंड पडताळा)
एकसारखी स्वारस्ये किंवा उद्दिष्टांमुळे एकत्र काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींचा समूह किंवा संघ एका छत्राखाली येऊन काम करणे ही नवउद्यम संस्कृतीची खास खूबी आहे. यातून सहकार – सहअस्तित्व वाढीस लागतेच, पण एकापेक्षा अनेकांच्या श्रम व बुद्धीचे एकत्रित सामर्थ्य हे कैकपटींनी जास्त आणि म्हणूनच बऱ्याचदा यशसिद्धही ठरताना दिसते. नवउद्यमांना मूळातच शोधकता, नाविन्य बरोबरीने व्यवसायवाढीसाठी नित्य श्रम अशा दुहेरी अंगाने वाटचाल करणे अपरिहार्य असते. अर्थात शोधक आणि कामसू अशा दोन्ही हातांचा चांगला वापर करू शकणाऱ्या व्यक्तींची भक्कम संघटना असे आधुनिक नवउद्यम / स्टार्टअप्सचे स्वरूप आहे. त्यामुळे त्यांची स्वतःशी स्पर्धा करतच, बाह्य जगाशी स्पर्धा करणे भाग ठरते. या अंगाने Best Practice (सर्वोत्तम व्यवहार पद्धती), Quality (सर्वोत्तम व्यवहार पद्धती), Customer/ Client centric approach (ग्राहककेंद्री दृष्टिकोन) या घटकांना या व्यवसायात मोठे महत्त्व आहे. हे घटक योग्य पातळीवर आहेत की नाहीत हे देखील नियमितपणे पाहावे लागते. ते पाहण्याची पद्धत म्हणजेच Benchmarking / किमान मानदंड पडताळा होय. एखाद्या स्वीकृत मानक/ मानदंडाशी तुलना करून गुणवत्तेचे मूल्यांकन किंवा मापन करण्याची ही पद्धत उत्तरोत्तर सुधारणा व प्रगतीला उपकारक ठरते.
Crowdsourcing (जनकौल)
कोणताही धंदा, व्यवसाय हा यशस्वी ठरायचा तर त्याला लोकाश्रय म्हणजे ग्राहकांचे पाठबळ महत्त्वाचेच. नवउद्यम तर थेट लोकांच्या समस्या-निवारणाशी जुळलेला व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांच्याद्वारे निर्मित वस्तू अथवा सेवांवर लोकांच्या मत, प्रतिक्रिया नवउद्यमाच्या प्रवर्तकांसाठी कळीच्याच ठरतात. त्यामुळे या व्यवसाय प्रक्रियेतील Crowdsourcing / जनकौल हे एक महत्त्वाचे अंग आहे. क्राउडसोर्सिंग हे लोकांच्या वयोमान, लिंग, आर्थिक वर्ग, प्रदेश, जीवनमान वगैरे निकषांवर केल्या गेलेल्या विशिष्ट गटाकडून माहिती, मते किंवा कामाचे संकलन आहे. हा जनकौल सामान्यत: इंटरनेटद्वारे प्राप्त केला जातो. या कामामुळे नवकंपन्यांना जगभरातील विविध कौशल्ये किंवा विचार असलेल्या लोकांशी संपर्क साधताना वेळ आणि पैसा वाचवता येतो आणि त्यांच्याकडून प्राप्त अभिप्रायानुरूप प्रक्रिया, पद्धती, उत्पादनांत अनुरूप बदलही घडवून आणता येतात. क्राउडसोर्सिंगशी साधर्म्य असलेला आणखी एक घटक हा Crowdfunding क्राउडफंडिंग म्हणजे जनसामुदायिक निधी उभारणीचा आहे. विशेषत: इंटरनेटद्वारे, तुलनेने छोट्या छोट्या रकमेतून योगदानासह मोठ्या जनसमुदायाकडून निधी उभारण्याची आणि त्यायोगे इच्छित प्रकल्प किंवा उपक्रम साकारण्याची ही प्रथा आधुनिक नवउद्यमी संस्कृतीत बऱ्यापैकी रूळली आहे. तथापि या पद्तीने वित्त मिळविण्याचे फायदे जसे आहेत, तसे तोटेही आहेत. हे पाहता वित्तपुरवठ्याचे अन्य उपलब्ध सुलभ पर्यांय आजमावण्यालाच प्राधान्य दिले जाते.