गेल्या तीन दशकांहून अधिक वर्षे कार्यरत असलेली डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेड औषध निर्मितीसाठी आवश्यक घटक (एपीआय) आणि पोषण मूल्याशी संबंधित घटकांच्या (न्यूट्रास्युटिकल) उत्पादांनातील एक आघाडीची मोठी कंपनी आहे. जगभरातील शंभरहून अधिक देशांमध्ये कंपनीची बाजारपेठ असून आज डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेड जगातील आघाडीच्या पहिल्या तीन औषध निर्माण कंपन्यांपैकी एक आहे. विविध उपचारात्मक क्षेत्रांमध्ये कंपनीचा १२५ उत्पादनांचा पोर्टफोलिओ आहे. यातील बहुतांशी उत्पादने निर्यात होत असून कंपनी एकूण महसुलाच्या सुमारे ८५ टक्के उत्पन्न निर्यातीतून मिळवते. यातील जवळपास ४७ टक्के महसूल युरोपीय बाजारातील व्यवसायातून प्राप्त होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- करावे करसमाधान : भांडवली नफ्यावरील सवलती – भाग १

कंपनीचे आंध्र प्रदेशात भुवनगिरी, तेलंगणा आणि विशाखापट्टणम येथे तीन अद्ययावत उत्पादन प्रकल्प असून तीन संशोधन आणि विकास (आर अँड डी) सुविधा आहेत. सुमारे १६,५०० कर्मचारी असलेल्या डिव्हिज लॅबोरेटरीजमध्ये चारशेहून अधिक संशोधक आहेत. कंपनीने आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील आपल्या प्रकल्पात सानुकूल संश्लेषण (कस्टम सिन्थेसिस) या उत्पादन सुविधेचे बांधकाम सुरू केले आहे. सानुकूल संश्लेषण म्हणजे औषध निर्माण क्षेत्राशी संबंधित इतर कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट रेणू संयुगांचे संश्लेषण, विशिष्ट शुद्धतेसह उपलब्ध करून दिला जातो. कंपनी यावर सुमारे २,००० कोटी रुपयांचा निधी खर्च करणार आहे. पहिल्या टप्प्यातील उत्पादन पुढील आर्थिक वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि यूरोपमध्ये न्यूट्रास्युटिकल उत्पादनांचे विपणन/वितरण करण्यासाठी कंपनीच्या डिव्हिज लॅबोरेटरीज (यूएसए) इंक आणि डिव्हिज लॅबोरेटरीज यूरोप एजी या दोन उपकंपन्या आहेत.

सप्टेंबर २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीने १,८५४.५४ कोटींच्या उलाढालीसह ४९३.६० कोटींचा नक्त नफा मिळवला आहे. गेल्या वर्षातील याच काळातील तिमाहीच्या तुलनेत तो १९ टक्क्यांनी कमी झाला आहे. मात्र यंदाच्या आर्थिक वर्षात कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे ८७ टक्के उत्पन्न निर्यातीतून प्राप्त झाले आहे. कंपनीचा नवीन प्रकल्प पुढील आर्थिक वर्षात कार्यान्वित होईल. सानुकूल संश्लेषणाच्या उत्पादनासाठी कंपनीने १२ मोठ्या औषधी कंपन्यांबरोबर करार केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कामकाजावर होईल.

हेही वाचा- पीपीएफ खात्याची मुदत किती वेळा वाढवता येते? जाणून घ्या याचे नियम

पाच वर्षांपूर्वी याच स्तंभातून डिव्हिज लॅबोरेटरीजचा समभाग ७६९ रुपयांना सुचवण्यात आला होता. ज्या वाचकांनी तो खरेदी करून ठेवला असेल, त्यांना आजपर्यंत ३७० टक्के परतावा मिळाला आहे. मात्र अजूनही त्यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये राखून ठेवायला हरकत नाही. ज्यांनी डिव्हिज लॅबोरेटरीज समभाग अजूनही घेतला नसेल, त्यांनी तो अजूनही खरेदी करावा असा हा उत्तम समभाग आहे.

सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्या टप्प्यात शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

stocksandwealth@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Division laboratories limited company one of the leading giants in nutraceutical products efficient for the health of portfolio dpj