सर्वसाधारणपणे उच्च जोखीम सहिष्णुता असलेले गुंतवणूकदार सेक्टोरल फंडांची निवड करतात. सेक्टोरल फंड हे एकाच उद्योग क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणूक करणारे फंड असतात. ‘सेबी’च्या नियमानुसार सेक्टोरल फंडांना त्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी ८० टक्के गुंतवणूक त्याच उद्योग क्षेत्रात करणे आवश्यक असते. गुंतवणूकदार जेव्हा सेक्टोरल फंड निवडतात जेव्हा त्यांना विश्वास असतो की, त्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केल्यास त्यांना ते क्षेत्र विस्तृत बाजारापेक्षा (निफ्टीपेक्षा) अधिक नफा मिळवून देईल. किंवा पोर्टफोलिओमधील अन्य गुंतवणूक ‘हेज’ करण्यासाठी विशिष्ट उद्योग क्षेत्र मदत करेल. गुंतवणूकशास्त्रात याला नकारात्मक सहसंबंध (निगेटिव्ह कोरिलेशन) असे म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयटी किंवा टेक्नॉलॉजी सेक्टर फंडांकडून पुढील वर्षभरात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारतातल्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या एकूण विक्री महसुलाच्या ७०-८० टक्के महसूल अमेरिका आणि युरोपमधून येते. अमेरिका आणि युरोपमधील वाढत्या महागाई आणि उच्चांकी व्याजदरामुळे अमेरिका आणि युरोपच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. निफ्टी आयटी इंडेक्स जानेवारी-जुलै २०२२ दरम्यान ३३ टक्क्यांनी घसरला. तेव्हापासून त्याचे निर्देशांक एका ठरावीक टप्प्यात रेंगाळत होता. हा लेख लिहीत असताना हा निर्देशांक २०२२ नंतरच्या घसरणीतील तळापासून २२ टक्क्यांवर आला आहे. अमेरिका आणि युरोपमधील कंपन्यांनी आपल्या माहिती-तंत्रज्ञानावरील खर्चात सर्वाधिक कपात जागतिक वित्तीय संकटांनंतर २००९ मध्ये केली. त्यानंतर दुसरी मोठी कपात २०२१ मध्ये केली. आयटी कंपन्या या ‘हाय ग्रोथ’ कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. भारतीय आयटी कंपन्यांनी मागील दहा वर्षांत सरासरी १३.२ टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. वर्ष २०१८ हे आयटी कंपन्यांसाठी सर्वाधिक वाढ नोंदविणारे वर्ष ठरले. अमेरिका आणि युरोपमधील कंपन्यांना सतत तिसऱ्या वर्षी आयटी खर्चात कपात करणे या कंपन्यांना परवडणारे नाही. जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात आयटी कंपन्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळू लागतील. आयटी कंपन्यांची ‘ऑर्डर बुक’ची वार्षिक वाढ संथ झाली असली तरी, त्याचा परिमाण नफ्यातील वाढीवर झालेला नाही. आयटी किंवा टेक्नॉलॉजी फंड प्रकारात पाच फंड उपलब्ध आहेत. या चार फंडांपैकी फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंडाचा वाचकांनी तीन ते चार वर्षांसाठी विचार करायला हवा.

हेही वाचा – Money Mantra : आपली आर्थिक पत कोण ठरवतं?

वरुण शर्मा हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड सेक्टोरल फंड असल्याने फंडाच्या गुंतवणुकीत १० कंपन्या असून या कंपन्यांतून निधी व्यवस्थापकांनी वैविध्य जपले आहे. या फंडाच्या गुंतवणुकीचे तीन भाग आहेत. पहिला भाग भारतातील आयटी सर्व्हिसेस कंपन्या (टीसीएस, टेक महिंद्रा, झेन्सार इत्यादी) ‘बीटूसी’ कंपन्या ज्यांची ॲप असून ज्या कंपन्या थेट ग्राहकांना सेवा देतात (झोमॅटो, पीबी फिनटेक) आणि तिसऱ्या प्रकारात अमेरिकेतील कंपन्या (फ्रँकलिन टेक्नॉलॉजी फंड क्लास, कॉग्निझन्ट टेक्नॉलोजी सोल्युशन) यांचा समावेश होतो. फंडाच्या गुंतवणुकीत २५.४९ टक्के लार्ज कॅप, ३४.९७ टक्के मिड कॅप आणि २८.५ टक्क स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. उद्योगक्षेत्रनिहाय गुंतवणुकीचा आढावा घेतल्यास ५०.५२ टक्के आयटी, तर उर्वरित गुंतवणुकीत रिटेल, टेलिकॉम, रसायने, वित्तीय सेवा यांचा समावेश होतो. मागील वर्षभरात निधी व्यवस्थापक टीसीएस, एचसीएल, इन्फोसिस, भारती एअरटेल, यांच्यातील गुंतवणूक लक्षणीय कमी करून आणि त्याऐवजी बिर्ला सॉफ्ट, पीबी फिनटेक (पॉलिसी बजार), झोमॅटो, सीई इन्फो सिस्टीमसारख्या स्मॉल कॅप आयटी कंपन्यांतून गुंतवणूक वाढवली. परंतु आंतरराष्ट्रीय गुंतवणूक ९ टक्क्यांदरम्यान कायम राखली. फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंडाचा अन्य ४ फंडाशी पोर्टफोलिओ ‘ओव्हरलॅप’ केवळ २५ ते ३० टक्के आहे. येत्या वर्षभरात फंडाने नव्याने गुंतवणूक केलेल्या लहान ई-कॉमर्स, फिनटेक कंपन्या एनएव्ही वाढीत आपले काम चोख बजावतील. परंतु जानेवारीपासून आयटी कंपन्यांना प्रोजेक्ट्स मिळू लागतील हे गृहीतक चुकीचे ठरले तर आयटी कंपन्यांत घसरण होईल आणि त्याचा फटका गुंतवणुकीस बसू शकतो. ही शिफारस पोर्टफोलिओ आणि सेक्टर रोटेशन रणनीतीवर आधारित आहे.

हेही वाचा – वित्तरंजन: कर स्वर्ग (टॅक्स हेवन)

सेक्टोरल फंड हे उच्च जोखम सहिष्णुता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी असतात. वाचकांपैकी कोणी नवगुंतवणूकदार असतील तर ही शिफारस त्यांच्यासाठी नाही. दिवाळीनिमित्त वाचकांना चांगली शिफारस देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मागील पाचपैकी चार वर्षे दिवाळीनिमित्ताने शिफारस केलेल्या फंडांनी चांगला नफा गुंतवणूकदारांच्या पदरात टाकला आहे. असाच प्रयत्न या वर्षी केला असता फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंडाचे जोखीम परतावा गुणोत्तर गुंतवणूकदारांच्या बाजूला झुकलेले दिसून आले. पुढील एका वर्षात हा फंड किमान दोन आकड्यांत परतावा देईल अशी चिन्हे दिसत असल्याने या फंडाची शिफारस केली. या फंडात गुंतवणूक करीत असताना म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी माहितीपत्रक सखोल अभ्यासाने आवश्यक आहे हे विसरू नये.

(shreeyachebaba@gmail.com)