दिवाळीपासून सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये सुरू असलेली घोडदौड सर्वच गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवणारी आहे. ६०००० ते ७०००० हा सेन्सेक्सचा प्रवास गुंतवणूकदार म्हणून आपण समजून घेतल्यास त्यात एक वेगळेपणा जाणवतो, तो म्हणजे या प्रवासात सेन्सेक्सला पाठबळ दिले आहे ते म्हणजे सरकारी कंपन्यांनी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

६५००० वरून ७०००० पर्यंत जाण्यासाठी सेन्सेक्सने सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी घेतला आहे. २००६ या वर्षात सेन्सेक्सने पहिल्यांदा दहा हजार ही पातळी गाठली होती. जागतिक मार्केटमध्ये दहा हजार ही पातळी गाठलेला सेन्सेक्स त्याकाळी जगभरात एक चर्चेचा विषय ठरला होता. तिथपासून सेन्सेक्स आज सातपटीने वाढलेला दिसत आहे. हा प्रवास गुंतवणूकदारांचे मनोधैर्य आणि विश्वास उंचावणारा ठरणार आहे.

गेल्या काही महिन्यात देशांतर्गत गुंतवणूकदारांप्रमाणेच परदेशी गुंतवणूकदारांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर खरेदी करायला सुरुवात केली आहे व या खरेदीमध्ये सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी होताना दिसते.

बीएसई पी.एस.यु. इंडेक्स, बीएसई बँक इंडेक्स या दोघांचा गेल्या वर्षभरातील परफॉर्मन्स लक्षात घेण्यासारखा आहे.

सेन्सेक्सने वर्षभरात २०% पेक्षा कमी रिटर्न्स दिले आहेत तर बीएसई पीएसयु इंडेक्सने वर्षभरात ५० % पेक्षा जास्त रिटर्न्स गुंतवणूकदारांच्या पदरात पाडले आहेत.

हेही वाचा : Money Mantra : वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद, पाहा संपूर्ण यादी

सरकारी कंपन्यांची कामगिरी चमकदार का ?

सरकारच्या मालकीच्या असलेल्या सर्वच क्षेत्रातील कंपन्या गेल्या दोन वर्षांपासून चमकदार कामगिरी करत आहेत. बँका, इंजिनिअरिंग आणि ऊर्जा, निर्मिती, संरक्षण आणि यंत्रसामग्री निर्मिती, लोह पोलाद, मॅंगनीज, तांबे, दगडी कोळसा यांसारख्या खनिज संपत्तीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांना सुगीचे दिवस येत आहेत असे कंपन्यांच्या निकालावरून दिसते.

लोह पोलाद आणि खाणकाम क्षेत्रातील सरकारी कंपन्या कायमच नफ्यात असतात. मात्र गेल्या काही वर्षात एकूणच निर्मिती क्षेत्राला बळ मिळत असल्याने व कारखानदारी उत्पादनात वाढ होत असल्याने एकूणच धातू आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय संधी सतत वाढताना दिसत आहेत.

व्यापार चक्रामध्ये (Business Cycle ) भरभराटीचे दिवस आपण एकूणच अनुभवतो आहोत परिणामी काही कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर झाले आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी मालकीच्या बँकिंग कंपन्या बुडीत कर्जाच्या समस्यांनी ग्रस्त आहेत, तरीही गेल्या दोन वर्षांपासून नफ्याचे प्रमाण आणि बुडीत कर्जासाठी करावी लागणारी प्रोव्हिजन कमी झाल्यामुळे बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स परदेशी गुंतवणूकदारांना सुद्धा महत्त्वाचे वाटू लागले आहेत. एकेकाळी फक्त स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँक या कायमच आघाडीवर असलेल्या शेअर्स प्रमाणेच बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यासारख्या कंपन्यांचे शेअर्स सुद्धा तेजीत आहेत.

हेही वाचा : Money Mantra : फंड विश्लेषण- कॅनरा रॉबेको ब्लूचिप इक्विटी फंड

सरकारी क्षेत्रातील कंपन्यांबद्दल वाढती विश्वासार्हता

गेल्या दहा वर्षाच्या काळात सरकारी क्षेत्रात अनेक कंपन्यांनी आपला व्यवसाय अधिकाधिक स्वतंत्रपणे करायला सुरुवात केली आहे. निर्णय घेण्याची क्षमता वाढलेली दिसत आहे. प्रकल्प सुरु होणे या बाबतीतही सरकारी पातळीवरील निर्णय अधिक जलद गतीवर जलद गतीने घेतले जात असल्यामुळे आणि महत्त्वाचे म्हणजे सरकारी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कोणताही घोटाळा झालेला नसल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा या शेअर्सवर असलेला विश्वास कायम राहील असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

गुंतवणुकीचा सरकारी डोस

गेल्या दोन वर्षांपासून सरकारने पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीवर (इन्फ्रास्ट्रक्चर) जोरदार पैसे खर्च करायला सुरुवात केली आहे. रस्ते, रेल्वे, लॉजिस्टिक अँड फ्रेट कॉरिडोर, सागरमाला सारखे भविष्याला आकार देऊ शकतील असे प्रकल्प सरकारकडून राबवले जात आहेत याचा थेट लाभ बऱ्याच सरकारी कंपन्यांना होताना दिसतो आहे.

हेही वाचा : मार्ग सुबत्तेचा : वर्ष जुने गेले अन् नवे आले…!

चमकदार कामगिरी करून गुंतवणूकदारांना फायदा करून देणारे काही निवडक शेअर्स

· रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन

· पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन

· इरेडा

· माझगाव डॉक

· हिंदुस्थान एरोनॉटिक्स कॉर्पोरेशन (एचएएल)

· रेल विकास निगम

· एस जे व्ही एन

· इंडिअन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन

या लेखात उल्लेख केलेल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यावेत असा सल्ला देण्याचा उद्देश नाही, गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी.