प्रवीण देशपांडे

मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्यात हस्तांतरित केलेली संपत्ती याची करपात्रता आपण मागील लेखात पाहिली. तसेच नातेवाईकांना दिलेल्या भेटी, मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्यात हस्तांतरित केलेली संपत्ती करमुक्त आहे हे आपण पाहिले. असे असले तरी त्याला प्राप्तिकर कायद्यातील इतर तरतुदी लागू होतात. या तरतुदी कोणत्या ते या लेखात पाहू.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

कर चुकविण्यासाठी किंवा करदायित्व कमी करण्यासाठी आपली संपत्ती किंवा पैसे दुसऱ्याच्या नावाने हस्तांतरित केले जातात. अशा रीतीने संपत्ती हस्तांतरित करणे अवैध आहे. एका कुटुंबात पती, पत्नी आणि मुले असतील तर जो कमावता सदस्य असेल आणि तो जास्त कर भरत असेल तर तो आपला करभार कमी करण्यासाठी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर काही व्यवहार करतो आणि स्वतःचे करदायित्व कमी करतो.

हेही वाचा… Money Mantra : आयटीआर १ फॉर्म कोण वापरू शकतो? प्राप्तिकर रिटर्न भरण्यापूर्वी योग्य फॉर्म जाणून घ्या

पूर्वी घरात असे चित्र असायचे की, पती नोकरी किंवा धंदा करणारा एकटाच कमावता सदस्य असायचा आणि पत्नी गृहिणी. पती आपले करदायित्व कमी करण्यासाठी पैसै पत्नीच्या किंवा मुलांच्या खात्यात जमा करून त्यांच्या नावाने गुंतवणूक करावयाचा जेणेकरून त्याला भरावा लागणारा कर कमी होईल. पण यामुळे पत्नीला किंवा मुलांना मिळालेल्या उत्पन्नावर कर भरला जात नाही किंवा कमी कर भरला जातो. असे व्यवहार “कर चुकविणे” या सदरात मोडतात. हे टाळण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात काही तरतुदी आहेत.

कर चुकविण्याच्या उद्देशाने असे व्यवहार टाळणे हितावह आहे. परंतु काही कारणाने असे व्यवहार केले असतील तर प्राप्तिकर कायद्यात काय तरतुदी आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींचे पालन होईल आणि ‘कर चुकवेगिरी’ घडणार नाही.

खालील व्यवहारांसाठी प्राप्तिकर कायद्यात वेगळ्या तरतुदी आहेत:

मालमत्ता हस्तांतरीत न करता उत्पन्न हस्तांतरीत करणे: एखादी व्यक्ती, त्याची मालकी असणार्‍या मालमत्तेचे उत्पन्न, मालमत्ता हस्तांतरीत न करता उत्पन्न हस्तांतरीत करीत असेल तर ते उत्पन्न मालमत्तेच्या मालकाचेच असते. उदा. एका ‘अ’ व्यक्तीने आपले घर भाड्याने दिले असेल आणि त्याचे घरभाडे उत्पन्न दुसर्‍या व्यक्तीच्या ‘ब’ च्या नावाने दाखवल्यास हे घरभाडे उत्पन्न ‘ब’ चे करपात्र उत्पन्न नसून ‘अ’ चेच करपात्र उत्पन्न असेल. असे व्यवहार कुटुंबातील व्यक्तींबरोबर केले जातात, घर एकाच्या नावाने असते आणि घरभाडे दुसर्‍याच्या नावाने घेतले जाते आणि ते उत्पन्न दुसर्‍याच्या करपात्र उत्पन्नात दाखविले जाते आणि कर चुकविला जातो. असे व्यवहार करणार्‍यांनी ही तरतूद लक्षात ठेवली पाहिजे.

पती किंवा पत्नीचे उत्पन्न

पती आणि पत्नीमध्ये कौटुंबिक किंवा इतर कारणाने पैशांचे आणि संपत्तीचे व्यवहार होत असतात. पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला जर कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा अपुर्‍या मोबदल्याने एखादी संपत्ती हस्तांतरीत केली असेल (भेट) तर ती भेट घेणाऱ्याला करपात्र नाही. परंतु त्या भेटीच्या संपत्तीतून मिळणारे उत्पन्न भेट देणाऱ्याला करपात्र आहे. उदा. जर पतीने पत्नीला त्याच्या नावे असणारे घर भेट म्हणून, म्हणजेच कोणत्याही मोबदल्याशिवाय दिले पत्नीने ते घर भाड्याने दिले आणि पत्नीला या घरभाड्याच्या उत्पन्नातून ३ लाख रुपये उत्पन्न मिळाले. भेट दिल्यानंतर हे घर जरी पत्नीच्या नावाने झाले असेल आणि भाडे पत्नीला मिळाले असले तरी हे उत्पन्न पतीलाच करपात्र असते. कारण ही संपत्ती कोणत्याही मोबदल्याशिवाय हस्तांतरित झाली आहे. परंतु हे घरभाड्याचे पैसे पत्नीने बँकेत मुदत ठेवीत गुंतवले आणि त्यावर तिला जे व्याज मिळेल, ते व्याज मात्र पत्नीच्या करपात्र उत्पन्नात गणले जाईल.

हेही वाचा… Money Mantra: इन्कम टॅक्स रिटर्न्स- प्राप्तिकर विवरणपत्र कसे भराल? (पूर्वार्ध)

पत्नीला होणाऱ्या पतीने लग्नाच्या पूर्वी भेट दिली तर त्याचे उत्पन्न पतीच्या उत्पन्नात गणले जात नाही. उदा. जर एका करदात्याने त्याच्या लग्नापूर्वी भावी पत्नीला १ लाख रुपये भेट दिले आणि तिने ते बँकेत मुदत ठेवीत गुंतविले तर त्यावर मिळालेले व्याज लग्नानंतर सुद्धा पतीच्या उत्पन्नात गणले जात नाही. परंतु ही भेट ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे भावी पत्नीला लग्न होण्यापूर्वी मिळालेली रक्कम करपात्र आहे. कारण भेट घेतांना त्यांच्यात पती-पत्नीचे नाते अस्तित्वात नव्हते.

पतीने किंवा पत्नीने विभक्त राहण्यासाठी दिलेल्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे संपत्ती भेट देणाऱ्याला करपात्र नाही. पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला जर भेट म्हणून काही रक्कम हस्तांतरित केली आणि भेट घेणाऱ्याने ते पैसे करमुक्त पर्यायात गुंतविले तर त्यावर भेट देणाऱ्याला कर भरावा लागणार नाही. उदा. पतीने पत्नीला १ लाख रुपये भेट म्हणून दिले आणि पत्नीने ते सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (PPF) गुंतविले तर त्यावर मिळणारे व्याज करमुक्त असल्यामुळे कोणालाच कर भरावा लागणार नाही.

लहान मुलाचे उत्पन्न

अल्पवयीन मुलांना (ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे) मिळालेले उत्पन्न पालकाच्या उत्पन्नात (ज्याचे उत्पन्न जास्त आहे) गणले जाते. त्यामुळे लहान मुलांच्या नावाने ठेवलेल्या गुंतवणुकीवर पालकांनाच कर भरावा लागतो. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या मुलांना दिलेल्या भेटींच्या गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न मात्र पालकांच्या उत्पन्नात गणले जात नाही. पालकांनी मुलांना भेटी देताना याचा विचार करावा.

सुनेचे उत्पन्न

सासू-सासऱ्यांनी सुनेला रोख रकमेच्या किंवा मालमत्तेच्या स्वरुपात भेट दिली आणि त्या भेटीतून तिला उत्पन्न मिळाले तर ते उत्पन्न सुनेला करपात्र नसून सासू किंवा सासऱ्यांना (ज्यांनी भेट दिली आहे त्यांना) करपात्र आहे. मुलाच्या लग्नापूर्वी सासू-सासऱ्यांनी, होणाऱ्या सुनेला भेट दिली आणि त्यावर तिला काही उत्पन्न मिळाले तर ते सासू किंवा सासऱ्याच्या उत्पन्नात गणले जात नाही. मुलाच्या लग्नानंतर सुद्धा लग्नापूर्वी दिलेल्या भेटीवर मिळालेले उत्पन्न सासू किंवा सासऱ्याच्या उत्पन्नात गणले जात नाही.

रद्द करण्याजोगे हस्तांतरण (रिव्होकेबल ट्रान्स्फर): हे असे हस्तांतरण असते, ज्यामध्ये केलेले हस्तांतरण पुढे रद्द करता येते. असे रद्द करण्याजोगे हस्तांतरण केलेल्या मालमत्तेतून मिळालेले उत्पन्न हस्तांतरण करणार्‍या व्यक्तीलाच करपात्र असते.

पती किंवा पत्नीच्या व्यवसायातून मिळालेले पगाराचे उत्पन्न

एका व्यक्तीने, त्याची मालकी असलेल्या धंदा-व्यवसायातून त्याच्या किंवा तिच्या पती किंवा पत्नीला वेतन किंवा पगार दिला असेल तर ते उत्पन्न त्या व्यक्तीलाच करपात्र असते. त्या व्यक्तीची त्याच्या धंदा-व्यवसायातील मालकी २०% पेक्षा जास्त असेल तरच ही तरतूद लागू होते. जर पती किंवा पत्नीला धंदा-व्यवसायाबाबतीत तांत्रिक किंवा व्यावसायिक ज्ञान असेल तर या तरतुदी लागू होत नाहीत. उदा. ‘अ’ ही व्यक्ती ‘ब’ या व्यक्ती बरोवर भागीदारी धंदा करते आणि ‘अ’ चा मालकी हिस्सा ३०% आहे, या धंद्यातून ‘अ’ च्या पत्नीला वार्षिक ४ लाख रुपये पगार दिला जातो. पत्नीला कोणतेही तांत्रिक किंवा व्यावसायिक ज्ञान नसल्यास हा पगार ‘अ’च्याच करपात्र उत्पन्नात गणला जाईल. जर पत्नीला पुरेसे तांत्रिक किंवा व्यावसायिक ज्ञान असेल तर तिचे उत्पन्न ‘अ’ च्या करपात्र उत्पन्नात गणले जाणार नाही.

भेटींद्वारे किंवा अशा व्यवहारांद्वारे कर नियोजन करतांना विशेष काळजी घेतली पाहिजे. या तरतुदींची माहिती नसल्यामुळे अनेकदा असे व्यवहार केले जातात आणि नंतर कर, व्याज आणि दंड भरावा लागू शकतो. आपण केलेल्या व्यवहारांमुळे प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन तर होत नाही ना याची खात्री केली पाहिजे. प्राप्तिकर खात्याकडून मोठ्या रकमेचे असे व्यवहार तपासले जाण्याची शक्यता असते.

pravindeshpande1966@gmail.com