प्रत्येक करदात्याला कर भरण्यापूर्वी त्याच्या उत्पन्नाचा हिशेब द्यावा लागतो, ज्यासाठी प्राप्तिकर रिटर्न म्हणजेच आयटीआर भरावा लागतो. बर्याच लोकांना वाटते की, आयटीआर फायलिंग ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, ज्याद्वारे प्राप्तिकर विभाग तुमच्या करपात्र उत्पन्नाचा तपशील ठेवतो. परंतु याचे काम केवळ उत्पन्न आणि खर्चाची माहिती देणे नाही, तर आयटीआरचे अनेक फायदे आहेत, ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे.
परताव्याचा दावा
आपल्यापैकी बरेच जण PPF आणि किसान विकास पत्र यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात, ज्याचे फायदे कलम ८०सी अंतर्गत कर सवलतीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. यामध्ये कमाल १.५० लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, करदात्याने आयटीआर फाइल केल्यावरच ही सूट मिळेल. म्हणूनच तुम्हाला विविध गुंतवणुकीद्वारे कर सूट मिळवायची असल्यास आयटीआर भरणे आवश्यक आहे.
हेही वाचाः आता ‘या’ बँकांच्या ग्राहकांसाठी कर्ज महागणार, MCLR दरात वाढ
कर्ज मिळण्यास मदत होते
ITR दाखल करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्ज घेताना त्याची मदत होते. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये ITR फाइल देखील समाविष्ट आहे. हे दाखल केल्याने बँकेचा तुमच्यावरील विश्वास वाढतो आणि गरजेच्या वेळी तुम्हाला कर्ज सहज मिळते.
क्रेडिट स्कोअर मजबूत करते
प्राप्तिकर रिटर्न वेळेवर भरल्याने सिबिल स्कोअरही सुधारतो, ज्यामुळे क्रेडिटद्वारे अर्ज घेण्यास मदत मिळते. कोणत्याही बँकेत कर्ज अर्जासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे आवश्यक असते. हे केवळ सुलभ कर्ज देत नाही तर त्याद्वारे कमी व्याजदराची सुविधा देखील प्रदान करते.