सुधाकर कुलकर्णी
प्रश्न१: नॉमिनी कोणास नेमता येते?
नॉमिनी एखाद्या व्यक्तीसच नेमता येते,ट्रस्ट,कंपनी , भागीदारी फर्म, एचयुएफ यांना नॉमिनी नेमता येत नाही.

प्रश्न२: नॉमिनेशन बाबतचे नवीन नियम काय आहे ?
आता नॉमिनेशन देणे किंवा द्यायचे नाही असे लिहून देणे बंधनकारक आहे, व याची पूर्तता करण्याची मुदत आता ३० जून २०२४ पर्यंत वाढविली आहे.

finance minister Nirmala Sitharaman
प्रतिशब्द : भरवसूली चोहिकडे!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
dsp mutual funds
फंडांचा फंडा: डीएसपी मिड कॅप फंड
spending public tax for Kumbh Mela
कुंभमेळ्याकरिता जनतेच्या कराचा व्यय कशासाठी?
TReDS, features , uses , TReDS news,
Money Mantra : TReDSची उपयुक्तता आणि वैशिष्ट्यं काय?
e-insurance account , insurance ,
Money Mantra : ई – इन्शुरन्स अकाऊंट काढणं का महत्त्वाचं आणि त्याचा उपयोग कसा होतो?
review of impact on india stock market and economy after donald trump comes to power
Money Mantra : ट्रंप यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे आपलं आयुष्य का बदलणार?

प्रश्न३: संयुक्त खात्यास नॉमिनेशन करता येते का ?
होय, संयुक्त खात्यास नॉमिनेशन करता येते मात्र यासाठी संयुक्त खात्यातील सर्व खातेदारांनी नॉमिनेशन फॉर्मवर सही करून संमती देणे आवश्यक असते.

आणखी वाचा-Money Mantra : फंड विश्लेषण: बडोदा बीएनपी पारिबा लार्ज कॅप फंड

प्रश्न४:नॉमिनेशन मध्ये बदल करता येतो का?
होय नॉमिनेशन मध्ये बदल करता येते,नव्याने नॉमिनेशन केल्यावर आधीचे नॉमिनेशन अपोआप रद्द होते.

प्रश्न५: संयुक्त खाते असल्यास खात्यातील प्रत्येक व्यक्ती वेगेवगळे नॉमिनेशन करू शकते का?
नाही, संयुक्त खात्यातील प्रत्येक व्यक्ती वेगेवगळे नॉमिनेशन करू शकत नाही. संयुक्त खात्यास एकच नॉमिनी देता येतो.

आणखी वाचा-Money Mantra : हिरो मोटो कॉर्पची स्कूटर क्षेत्रात का मुसंडी?

प्रश्न६: नॉमिनेशन करण्याचा नेमका फायदा काय ?
नॉमिनेशन असल्याने नॉमिनीस मृताच्या नावावरील शिल्लक रक्कम बँक, शेअर्स ,म्युचुअल फंड मधील, लॉकर, अन्य ठिकाणची गुंतवणूक (पीपीएफ,पोस्ट, एनपीएस, बॉंड ई)चा ताबा सहजगत्या मिळतो यासाठी सक्सेशन सर्टिफिकेटची गरज लागत नाही.

प्रश्न७: नॉमिनेशन नुसार मिळालेल्या संपत्तीवर नॉमिनीचा कायदेशीर हक्क असतो का?
नाही, नॉमिनी हा एक विश्वस्त म्हणून मिळणाऱ्या संपत्तीचा ताबा घेत असतो व अशी विश्वस्त म्हणून ताब्यात घेतलेली संपत्ती मृत्यूपत्रानुसार (असल्यास) किंवा सक्सेशन सर्टिफिकेटनुसार वाटप करण्याची जबाबदारी नॉमिनीची असते.

Story img Loader