Start Investing in Early Age : असे अनेक लोक असतात, ज्यांना कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी उशीर लावण्याची सवय असते. काम सुरू करणे आवश्यक असल्याचं त्यांना मान्य असते, परंतु ते सहा महिन्यांनी किंवा वर्षभरानंतर सुरू करू, असे त्यांना वाटते. आर्थिक नियोजनात ही सवय कायम राहिल्यास ती तुम्हाला महागात पडू शकते. आज तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक उद्दिष्टे साध्य करण्यात चुकू शकता. पण त्याचा फटका आपल्याला म्हातारपणात बसण्याची शक्यता आहे. आपण तरुण वयात सक्षम असल्यास आपण गुंतवणूक आणि बचत सुरू करावी. असे अनेक लोक आहेत, ज्यांना लहानपणापासूनच त्यांच्या हक्कांची जाणीव असते, परंतु कमावते सदस्य होऊनही ते गुंतवणूक बचतीबाबत लवकरात लवकर निर्णय घेत नाहीत. त्याचा सर्वात मोठा तोटा हा आहे की, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात चक्रवाढीचा तितका फायदा घेऊ शकत नाही. येथे आपण ते एका उदाहरणाने समजून घेऊ, जिथे गुंतवणूक करण्याचे वय २५ वर्षे, ३० वर्षे, ३५ वर्षे आणि ४० वर्षे आहे.

वयाच्या २५ व्या वर्षांपासून गुंतवणूक

समजा एका व्यक्तीने वयाच्या २५ व्या वर्षांपासून दरमहा ५ हजार रुपये SIP करण्याची योजना आखली. निवृत्तीच्या कालावधीपर्यंत म्हणजेच ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांचे नियोजन आहे. म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी ३५ वर्षे आहे. त्यांनी गुंतवणुकीवरील अपेक्षित परतावा १२ टक्के प्रतिवर्ष असल्याचे मानले.

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
  • मासिक SIP: ५ हजार रुपये
  • गुंतवणूक कालावधी: ३५ वर्षे
  • एकूण गुंतवणूक: २१ लाख रुपये
  • ३५ वर्षांनंतरचा निधी: ३,२४,७६,३४५ (३.२ कोटी)
  • नफा: ३,०३,७६,३४५ रुपये (सुमारे ३ कोटी रुपये)

वयाच्या ३० व्या वर्षांपासून गुंतवणूक

दुसऱ्या एका व्यक्तीने वयाच्या ३० व्या वर्षी गुंतवणुकीचे नियोजन सुरू केले. गुंतवणुकीला उशिरा सुरुवात केल्यामुळे त्याने दरमहा एसआयपीची रक्कम पहिल्या प्रकरणापेक्षा थोडी जास्त ठेवली. त्यांनी ६ हजार रुपयांची SIP करण्याची योजना आखली. निवृत्तीच्या कालावधीपर्यंत म्हणजेच ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांचे नियोजन आहे. म्हणजेच गुंतवणुकीचा कालावधी ३० वर्षे आहे. गुंतवणुकीवरील अंदाजे परतावा १२ टक्के प्रतिवर्ष असल्याचेही त्यांनी मानले.

हेही वाचाः रेमंडच्या सिंघानियांचा एक निर्णय आणि १५०० कोटी रुपये बुडाले, नेमके काय घडले?

  • मासिक SIP: ६ हजार रुपये
  • गुंतवणूक कालावधी: ३० वर्षे
  • एकूण गुंतवणूक: २१.६० लाख रुपये
  • ३० वर्षांनंतरचा निधी: २,११,७९,४८३ (२.१ कोटी)
  • नफा: १,९०,१९,४८३ (१.९० कोटी)
  • संवत २०८०: एसआयपीसाठी सर्वोत्तम १० मिडकॅप म्युच्युअल फंड योजना निवडा, ५ वर्षांत पैशात ३ पट वाढ झाली आहे.

वयाच्या ३५ व्या वर्षांपासून गुंतवणूक

तिसऱ्या व्यक्तीने वयाच्या ३५ व्या वर्षी गुंतवणुकीचे नियोजन सुरू केले. त्याने गुंतवणुकीला थोडा उशिर केल्यामुळे त्याने दरमहा SIP ची रक्कम इतर प्रकरणांपेक्षा थोडी जास्त ठेवली. त्यांनी ७ हजार रुपयांची एसआयपी करण्याची योजना आखली. निवृत्तीच्या कालावधीपर्यंत म्हणजेच ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांचे नियोजन आहे. म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी २५ वर्षे आहे. गुंतवणुकीवरील अंदाजे परतावा १२ टक्के प्रतिवर्ष असल्याचेही त्यांनी मानले.

हेही वाचाः 2 BHK फ्लॅटमध्ये राहतात अन् त्यांच्याकडे साधा मोबाइल फोनही नाही, कोण आहेत जिम्मी टाटा?

  • मासिक SIP: ७ हजार रुपये
  • कालावधी: २५ वर्षे
  • एकूण गुंतवणूक: २१ लाख रुपये
  • २५ वर्षांनंतरचा निधी: १३२८३४४६ रुपये (१.३२ कोटी)
  • नफा: १,११,८३,४४६ (१.१ कोटी)

तिन्ही प्रकरणात निकाल काय लागला?

२५ वर्षांत एसआयपी सुरू करणाऱ्या व्यक्तीला २१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ३५ वर्षांत सुमारे ३.२ कोटी रुपयांचा निधी मिळाला. ज्या व्यक्तीने वयाच्या ३० व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली, फक्त २१ लाख रुपये गुंतवल्यानंतर त्याला ३० वर्षांत २१.१ कोटी रुपयांचा निधी मिळाला. तर तिसर्‍या व्यक्तीला म्हणजेच वयाच्या ३५ व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात करणाऱ्या व्यक्तीलाही २५ वर्षांत केवळ २१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १.३२ कोटी रुपयांचा निधी मिळाला.