देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा (BoB) ने आज गृह कर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि शैक्षणिक कर्जावर आकर्षक व्याजदरासह सणांच्या निमित्ताने ऑफर सुरू केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘या’ ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत चालणार
बँक ऑफ बडोदाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘BoB के संग तोहार की उमंग’ महोत्सवाची ऑफर ३१ डिसेंबरपर्यंत आहे. सणाच्या ऑफरमध्ये अनेक फायदे आणि सवलतींसह चार नवीन बचत खाती सुरू करणे आणि घर, कार, वैयक्तिक आणि शैक्षणिक कर्जांवर आकर्षक व्याजदर देणे समाविष्ट आहे. बँकेने आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना सणासुदीच्या ऑफर आणि सवलती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, ट्रॅव्हल आणि फूड यांसारख्या श्रेणींमध्ये महत्त्वाच्या ब्रँडशी करार केला आहे.
हेही वाचाः …तर दररोज ५ हजार रुपयांचा दंड; आरबीआयने बँका, एनबीएफसींना दिले ‘हे’ आदेश
नेमकी ऑफर काय आहे?
सणासुदीच्या काळात ८.४० टक्के दराने गृहकर्ज उपलब्ध होणार आहे, असे BoB ने सांगितले. याशिवाय प्रोसेसिंग फी देखील आकारली जाणार नाही, ती ग्राहकांना सवलत म्हणून दिली जाणार आहे. कार कर्जावरील व्याजदर ८.७० टक्क्यांपासून सुरू होईल आणि यामध्ये कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. शैक्षणिक कर्जांवर बँकेने ८.५५ टक्क्यांपासून सुरू होणारा विशेष दर ६० बेसिस पॉइंट्सपर्यंत सूट आणि देशातील ओळखल्या जाणार्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणतेही तारण देऊ केले आहे.
UPI ATM सुविधा देणारी पहिली बँक ठरली
देशात नुकतेच लाँच झालेले UPI एटीएम सर्वप्रथम BOB ने सुरू केले होते. BOB ने सांगितले होते की, ही UPI ATM सुविधा देशभरातील BOB च्या ६ हजारांहून अधिक ATM मध्ये सुरू करण्यात आली आहेत.
UPI ATM म्हणजे काय?
यूपीआय एटीएम हे असे एटीएम आहे, ज्यामध्ये एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला कार्डची गरज नाही. तुम्हाला तुमच्या कोणत्याही UPI अॅपसह ATM मशीनवर दाखवलेला QR कोड स्कॅन करावा लागेल आणि नंतर पैसे मिळवण्यासाठी UPI पिन टाकावा लागेल.