वसंत कुलकर्णी
एक उत्कृष्ट पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आणि परताव्यातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीला शिस्त आणि संयम आवश्यक आहे. गुंतवणूकदारांचा कल हा मालमत्ता विभाजनपेक्षा गुंतवणुकीसाठी फंड निवडण्याकडे असतो. निर्देशांक रोज नवीन नवीन शिखरे पादाक्रांत करीत असताना वाचकांना काही सल्ला देण्याचा मोह होत आहे. लिक्विड फंड किंवा ओव्हरनाइट फंडात गुंतवलेले पैसे कधीही गमवावे लागणार नाहीत. तर फ्लोटिंग रेट, अल्ट्रा-शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि डायनॅमिक बाँड फंड, कॉर्पोरेट बाँड फंड यांसारख्या इतर रोखे संलग्न अर्थात डेट फंडांमध्येही तात्पुरते पैसे गमावण्याची थोडीफार शक्यता असते. डेट फंड हे मुद्दल राखण्याचे आणि अल्प परतावा मिळविण्याचे साधन आहे. सगळ्याच वयोगटात गुंतवणूकदाराचे उद्दिष्ट मोठी जोखीम घेऊन मोठा परतावा कमवणे हे नसते, तर आजपर्यंत तुम्ही जे कमावलेत ते राखून ठेवणे हेदेखील असते. हे गुंतवणुकीला एक प्रकारचे सुरक्षा कवच पुरविण्याचे काम डेट फंड करीत असतात. वाढत्या महागाईमुळे संपत्तीचे मूल्य डेट फंडात कमी होऊ शकते. मात्र किमान भांडवल गमावण्यापासून डेट फंड सुरक्षित असतात. अधिक वृद्धीदर असणाऱ्या समभागासारख्या मालमत्तेची गरज आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात नसते.

डेट म्युच्युअल फंड हे सक्रियपणे व्यवस्थापित केलेले फंड आहेत, जे कॉर्पोरेट बाँड, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (एनसीडी), सरकारी रोखे (जी-सेक), राज्य विकास कर्ज (एसडीएल), ट्रेझरी बिल (टी-बिल) कमर्शियल पेपर (सीपी) आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट (सीडी) यांसारख्या विविध साधनांमध्ये गुंतवणूक करतात. डेट फंड हे पोर्टफोलिओमध्ये अस्थिरतेमुळे येणारी जोखीम कमी करण्याचे काम करतात. डायनॅमिक बाँड फंड हे डेट फंडांचा असा प्रकार आहे, जे गुंतवणूक असलेल्या रोख्यांची उर्वरित मुदत लवचीकतेने व्यवस्थापित करता येते. व्याज दर कमी अधिक होण्याच्या शक्यतेनुसार कमी अधिक करता येतो. या फंड गटाचे प्राथमिक उद्दिष्ट अर्थव्यवस्थेतील व्याजदरांमधील बदलांचा फायदा घेत अधिक परतावा कमविण्याच्या संधी हुडकून, त्यानुसार गुंतवणूक करणे हे असते. फंड व्यवस्थापक प्रचलित व्याजदराच्या ट्रेंडनुसार फंडाच्या पोर्टफोलिओमधील रोख्यांचा कालावधी चतुराईने समायोजित करून हे साध्य करतात. डायनॅमिक बॉण्ड फंडामध्ये विविध प्रकारचे बॉण्ड, मॅच्युरिटी आणि क्रेडिट यांच्यात बाजारातील बदल आणि व्याजदराच्या हालचालींच्या अनुषंगाने संक्रमित करण्याची क्षमता असते. डायनॅमिक बॉण्ड फंड त्यांच्या पोर्टफोलिओचे ड्युरेशन फंड व्यवस्थापकाच्या व्याजदरांबाबतच्या दृष्टिकोनावर आधारित असतात. या बदलांमुळे हे फंड वेगवेगळ्या व्याजदर आवर्तनांच्या दिशा बदलाला संरेखित करतात. व्याजदर आणि रोख्यांची मुदत यामध्ये व्यस्त संबंध लक्षात घेता व्याजदर कमी होणारच हा दृष्टिकोन असेल तर दीर्घ मुदतीच्या रोख्यांचे प्रमाण वाढविले जाते आणि व्याजदर वाढणार असतील तर दीर्घ मुदतीचे रोखे विकून अल्प मुदतीचे रोखे खरेदी केले जातात.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा…
chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
dhfl scam of wadhawan family
घोटाळ्यांचे घराणे (डीएचएफएल)
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Impact of US Elections 2024 on Indian Stock Market
दुरावलेला खरेदी उत्साह बाजारात परत दिसेल?

हेही वाचा : कर्जवसुली न्याय प्राधिकरण

किरकोळ महागाई दर सरलेल्या मे महिन्यात घटून ४.७५ टक्क्यांवर म्हणजेच वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहचला आहे. दुसरीकडे, निर्मिती क्षेत्राची वाढ जूनमध्ये ३.९ टक्क्यांवर मर्यादित राहिली आहे. घटती महागाई आणि निर्मिती क्षेत्राची अल्प वाढ हे रिझर्व्ह बँकेस व्याजदर कपातीस सबळ कारण ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीचा निर्णय झाल्यावर ऑक्टोबर किंवा डिसेंबरच्या पतधोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँक व्याजदर कपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : मार्ग सुबत्तेचा : वैयक्तिक अर्थसंकल्प – काळाची गरज

भांडवली बाजार नियामक सेबीने डेट फंडांची विभागणी एकूण १६ फंड गटात केली आहे. फंड निवडताना, गुंतवणुकीच्या कालावधीचा विचार केला पाहिजे. अगदी कमी कालावधीसाठी, ३ ते ६ महिन्यांपर्यंत, लिक्विड किंवा अल्ट्रा-शॉर्ट टर्म फंडांमध्ये गुंतवणूक करता येईल. एक वर्ष आणि त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी शॉर्ट ड्युरेशन, तीन ते पाच वर्षांसाठी बँकिंग पीएसयू, कॉर्पोरेट बॉंड फंड तर मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी गिल्ट फंड आणि टेन ईयर कॉन्स्टंट म्यॅच्युरिटी फंड योग्य असतात. यापैकी मागील वर्षभरात गिल्ट आणि लॉंग ड्युरेशन फंडांना सर्वाधिक पसंती लाभल्याचे दिसते. मागील एका वर्षात ८.१९ टक्के नफा कमाविणारा आयटीआय डायनॅमिक बॉण्ड फंड हा या फंड गटात अव्वल मानांकन असणारा एक फंड आहे. व्हॅल्यू रिसर्चने या फंडाला चार तारांकित मानांकन दिले आहे. (मॉर्निंग स्टारने अद्याप मानांकन दिलेले नाही, मॉर्निंगस्टार तीन वर्षे पूर्ण झाल्यावर मानांकन देते) क्रिसिल डायनॅमिक बॉण्ड फंड एएलएलएल हा फंडाचा निर्देशांक आहे. फंड स्थापनेपासून म्हणजे १४ जुलै २०२१ पासून विक्रांत मेहता हे या फंडाचे व्यवस्थापन करत आहेत. स्थापनेपासून हा फंड निर्देशांक सापेक्ष चांगली कामगिरी करीत आहे. विक्रांत मेहता व्यवस्थापित करत असलेल्या आयटीआय बँकिंग पीएसयू डेट फंडालासुद्धा व्हॅल्यू रिसर्चने चार तारांकित मानांकन दिले आहे. डेट फंडाच्या एकूण परताव्यापैकी ८५ टक्के परतावा फंडाची गुंतवणूक असलेल्या रोखे गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजातून तर उर्वरित मार्क-टू-मार्केट नफ्यातून येते. कर्ज आणि मनी मार्केट साधनांचा समावेश असलेल्या पोर्टफोलिओचे सक्रियपणे व्यवस्थापन करून जास्तीत जास्त परतावा मिळवणे हा फंडाचा उद्देश आहे. फंड संरचित धोरणाचा अवलंब करेल, जे गुंतवणूकदारांना लवचीक मालमत्ता वाटप आणि सक्रिय कालावधी व्यवस्थापनाद्वारे डायनॅमिक फंड व्यवस्थापनाचा लाभ देते. कमी अस्थिर फंडाच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करणारा हा फंड रोखे आणि मनी मार्केट साधने आणि सरकारी रोख्यांमध्ये (जी-सेक) गुंतवणूक करून स्थिर परतावा कमाविण्यात यशस्वी झाला आहे. जे गुंतवणूकदार ३ ते ५ वर्षे कालावधीत बँकेच्या मुदत ठेवी प्रचलित व्याजदरापेक्षा १ ते १.५० टक्का अधिक परतावा मिळविणाऱ्या गुंतवणूक साधनांच्या शोधात असतील त्यांच्यासाठी हे उत्कृष्ट साधन आहे. सध्या १८ ते २४ महिन्यांसाठी सर्वाधिक दर बँका देत आहेत. याचा अर्थ रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात केल्यानंतर बँकांच्या मुदत ठेवींचे दर मोठ्या प्रमाणावर कमी होतील. वरच्या व्याजदरात आपली गुंतवणूक ‘लॉक’ करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

निधी व्यवस्थापक : विक्रांत मेहता