कौस्तुभ जोशी

लग्नसराईचा महिना सुरू झाला आहे. पुढच्या पाच सहा महिन्यात अनेक तरुण-तरुणींचे नवीन वैवाहिक आयुष्य सुरू होणार आहे. विवाह म्हणजे दोन कुटुंब वगैरे एकत्र येत असले तरीही दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकत्र राहायला सुरुवात करतात व आपलं वैयक्तिक जीवन सोडून सहजीवनाला सुरुवात करत असतात. अशावेळी सर्वप्रथम कशाचं नियोजन करायचं ? तर ते पैशाचं !

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Muslim father card printed for hindu people at daughter wedding faces of hindu lord in amethi goes viral
PHOTO: मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; पत्रिकेवरील एका गोष्टीनं वेधलं लक्ष; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

दोन सुजाण व्यक्ती एकत्र आल्या तर कायमच उत्तम निर्णय घेतले जातात. आपलं घर निवडताना, घरातली सजावट, फर्निचर कोणत्या डिझाईनचे घ्यायचे, किराणा सामान कुठून विकत घ्यायचे हे आणि असे अनेक निर्णय घेताना नवीन लग्न झालेले तरुण जसा एकमेकांचा विचार घेतात त्याचप्रमाणे एकत्र बसून आपल्या गुंतवणुकीचा प्लॅन करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : Money Mantra : ‘अर्थ’पूर्ण लग्न

पैशाबद्दल एकमेकांशी मोकळेपणाने बोला

एकमेकांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणे आणि एकमेकांच्या आर्थिक आयुष्यात ढवळाढवळ करणे हे आपल्याकडे एकसारखेच समजले जाते. पण पैशाच्या बाबतीत तरी असे व्हायला नको. आपला बेटर हाफ नक्की किती पैसे कमावतो ? त्याचे खर्च किती आहेत ? त्याचे पैसे तो कशाप्रकारे गुंतवतो ? यावर चर्चा व्हायला हवी. अलीकडील काळात विवाहाचे वय वाढत चालले आहे. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर ज्यांचे विवाह होतात त्यांच्या गुंतवणुकीच्या स्वतःच्या काही सवयी ठरलेल्या असतात. पैसे कसे आणि कुठे गुंतवायचे याचा आपला असा पक्का विचार ठरलेला असतो. अशावेळी आपला हक्काचा जोडीदार आपल्या फायनान्शिअल प्लॅनिंग विषयी कसा काय बोलतो ? असे वाटून घेऊ नका. त्यात काहीही चूक नाही. अशावेळी आपल्या जोडीदाराला समजून घेऊन त्याची चूक असेल तर चूक दाखवून द्या, जर त्याचा गुंतवणुकीचा प्लॅन उत्तम असेल तर तो तुम्ही स्वीकारा.

ड्रीम होम झालं ! इन्शुरन्स घेतला का?

लग्नानंतर काही महिने उलटून गेले की लख्ख जाणीव होऊ लागते ती भविष्यातील खर्चाची. शहरांमध्ये लग्नानंतर भाड्याच्या घरात राहणे किंवा स्वतःचे घर विकत घेऊन त्यासाठी गृहकर्ज काढणे हा पर्याय तरुण वर्ग निवडताना दिसतो. तुम्ही त्यापैकी एक आहात का? असं असेल तर तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा टर्म इन्शुरन्स आहे का ? याची खात्री करून घ्या. अंदाजे ३५ वर्षे वय असल्यास आणि तुमचे उत्पन्न आठ ते दहा लाख रुपये असेल तर ५० लाख रुपये जीवन विमा देणारा टर्म इन्शुरन्सचा प्लॅन वार्षिक दहा ते अकरा हजार रुपये एवढ्या प्रीमियम मध्ये विविध इन्शुरन्स कंपन्यांकडून विकत घेता येऊ शकतो.

हेही वाचा : Money Mantra : अग्रिम कर अर्थात अ‍ॅडव्हान्स्ड टॅक्स १५ डिसेंबरपूर्वी कोणी भरावा?

इमर्जन्सी अकाउंट सुरु करा

दोघांचे एकत्रित नाव असलेलं जॉईंट अकाउंट सुरू करा. सर्वसाधारणपणे तीन ते चार महिन्यात तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंवर जेवढे पैसे खर्च करावे लागतात तेवढे पैसे या अकाउंटमध्ये जमा करून ठेवा. त्याचे फिक्स डिपॉझिट सुद्धा बनवू शकता. मात्र या अकाउंटचे इंटरनेट बँकिंग / मोबाईल बँकिंग सुरु असेल याची काळजी घ्या. जर आयत्यावेळी गरज पडली तर या अकाउंट मधले पैसे वापरता येतील.

खर्चांची वाटणी कशी करायची ?

क्रिकेटमध्ये दोन बॅट्समन उत्तम पार्टनरशिप करतात तेव्हा दोघांपैकी एक धडाकेबाज खेळतो तर दुसरा सावधपणे खेळून एक-दोन धावा काढत राहतो, म्हणजेच कोणीतरी फ्रंट-फूट वर आणि कोणीतरी बॅकफूट वर असणे यात काहीही चुकीचे नाही. नवरा बायको दोघांपैकी एकाने घरखर्च सांभाळले तर दुसऱ्याने घराचा हप्ता/ इन्शुरन्स आणि अन्य खर्च सांभाळले तर आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित केल्याचा फायदाच होतो.

हेही वाचा : Money Mantra : फंड विश्लेषण – एसबीआय ब्लूचिप फंड

खर्चाचा ट्रॅक ठेवण्यासाठी स्मार्ट बना

आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक ॲप उपलब्ध असतात, त्यातील एक्सपेन्स मॅनेजमेंट ॲप डाऊनलोड करा आणि अगदी एकूणएक पैशाचा हिशोब ठेवा. तुम्ही कॉम्प्युटरचा वापर करण्यात एक्स्पर्ट असाल तर तुमच्या सहा महिन्याचा खर्चाचा डेटा एक्सेल मध्ये भरून नेमका खर्च कुठे होतो ? याचा अंदाज घ्या; लक्षात ठेवा लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर होणारे खर्च हे संपूर्णपणे वेगळे असतात हे तुम्हाला सहा महिन्यातच जाणवायला लागेल.

खर्चाचा स्मार्ट प्लॅन बनवूया

दर महिन्याला किती खर्च होतात याचा अंदाज घेता आला पाहिजे. खर्चाचे आवश्यक खर्च (किराणा, वाणसामान, भाजीपाला, औषध पाणी, मोबाईल फोनचे रिचार्ज, रेल्वे मेट्रोचा पास, पेट्रोल-डिझेल) आणि उपभोग घेण्यासाठी केलेले खर्च (सिनेमा, विकेंड पिकनिक, घरी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्टी आणि त्यावेळेला होणारा खर्च, गेट-टुगेदर, उन्हाळी हिवाळी सुट्टीतील टूर, महागडी गॅजेट्स, महागडे मोबाईल फोन) असे दोन भाग पडतात.

पुढील भागात समजून घेऊया तुमच्या इक्विटी गुंतवणुक आणि रिटायरमेंट प्लॅनिंगविषयी.