मागील लेखात आपण लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक कशी करावी याची माहिती घेतली. या लेखात आपण दुसरे बालपण म्हणजेच साठीनंतरच्या कालावधीसाठी आर्थिक नियोजन कसे करावे याची माहिती घेणार आहोत.

सेवानिवृत्तीचे नियोजन- आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सेवानिवृत्तीनंतरचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये देखील सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम असणे आवश्यक असते. याकरिताच सेवानिवृत्तीचे नियोजन महत्त्वाचे आहे.

Economist Politics Delhi Elections Prime Minister
‘रेवडी’चे राजकीय वजन संपले ?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Inquiry , Beed District Planning Committee, Beed ,
बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची चौकशी, दोन वर्षांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
Budget 2025
Budget 2025 : तुमचा वार्षिक पगार १२ लाखांपेक्षा जास्त असेल तर काय होणार? समजून घ्या सोपं गणित
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे वर्ष शेअर बाजारासाठी…
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध
Mahakumbh , Prayagraj , Railway, Plane,
प्रयागसाठी ‘प्रयाण’ सुरूच! हवाई, रेल्वे, खासगी वाहनांचे आरक्षण फुल्ल
Moody Analytics made a statement on fiscal and monetary policy print eco news
वित्तीय, पतधोरणात मोठ्या सुधारणेनंतरच ६.४ टक्के विकासवेग शक्य- मूडीज

सेवानिवृत्तीच्या नियोजनाच्या मदतीने काय साध्य करता येते

१) सेवानिवृत्तीनंतर देखील दरमहा खात्रीशीर उत्पन्न

२) महागाईवाढीप्रमाणे दरमहाच्या उत्पन्नात वाढ

३) आजारपण यासह इतर आकस्मित खर्चासाठी केलेली तरतूद

४) गृहदुरुस्तीसह इतर खर्चाची तरतूद

५) पर्यटन

६) समाजातील गरजूंना मदत

७) आपल्यानंतर आपल्या जोडीदाराला तहहयात निवृत्तिवेतन मिळेल याची तरतूद

८) हस्तांतरण- किमान कागदपत्रांच्या मदतीने आपली संपत्ती वारसास मिळावी यासाठी केलेली तरतूद

सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी बचत आणि गुंतवणुकीचे पर्याय

१) पीपीएफ

सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ हा एक उत्तम पर्याय आहे.

  • पीपीएफचे फायदे- सुरक्षितता – १०० टक्के सरकारी योजना असल्यामुळे मिळणारी रक्कम निश्चित असते.
  • करबचत- प्राप्तिकर खात्याच्या ८०सी कलमानुसार १,५०,००० रुपयांपर्यंत करबचतीचा लाभ मिळविता येतो. मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मिळणारी मुद्दल देखील करमुक्त.
  • पीपीएफ गुंतवणुकीच्या मर्यादा- मिळणारे व्याज महागाईवाढीपेक्षा थोडेच जास्त असल्यामुळे वास्तव परतावा कमी असतो.
  • बचतीवर मर्यादा- एका आर्थिक वर्षात केवळ १,५०,००० रुपयांची बचत करता येते.

२) एनपीएस

  • न्यू पेन्शन योजना- फायदे करबचतीचा अतिरिक्त लाभ . एका आर्थिक वर्षात ५०,००० रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर प्राप्तिकर खात्याच्या ८० सीसीडी कलमानुसार करबचतीचा लाभ मिळतो. गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध गुंतवणूकदार आपल्या जोखीम घ्यायच्या क्षमतेनुसार आपल्यासाठी योग्य पर्याय निवडू शकतात.

३) म्युच्युअल फंड योजना

  • फायदे- म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा पर्याय असल्यामुळे अधिक पर्याय मिळण्याची संधी असते. गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असून गुंतवणूकदार स्वतःच्या जोखीम घ्यायच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतात. आवश्यकतेनुसार भविष्यात गुंतवणुकीच्या पर्यायात बदल करणे इतर गुंतवणूक साधनांच्या तुलनेत सोपे आहे. म्युच्युअल रिटायरमेंट फंड योजनेत परतावा जास्त मिळतो. अर्थातच वास्तव परतावा अधिक मिळतो आणि किमान गुंतवणुकीच्या मदतीने सेवानिवृत्तीचे आर्थिक उद्दिष्ट सहज साध्य करता येते.
  • जोखीम- सुरुवातीच्या ३-४ वर्षात गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊ शकते.
  • उपाय- तज्ज्ञांच्या सल्ल्याने दीर्घकालीन गुंतवणूक करावी.

सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी पीपीएफ सोबतच म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी?

नव्वदच्या दशकात १२ टक्के मिळणारे व्याजदर आज सुमारे ७.१ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. वास्तव परतावा दर (रिअल रेट ऑफ रिटर्न) कमी झाल्यामुळे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्त रकमेची बचत करणे आवश्यक झाले आहे.

उदा. २५ वर्षांनी सेवानिवृत्तीच्या नियोजनाकरिता ५ कोटी रुपयांची आवश्यकता असेल आणि याकरिता पीपीएफसह बँक मुदत ठेवी या पर्यायात बचत केल्यास दरमहा ६०,७०० रुपयांची बचत करावी लागेल आणि म्युच्युअल फंडाच्या रिटायरमेंट फंडात गुंतवणूक केल्यास दरमहा गुंतवणुकीची आवश्यक रक्कम केवळ २६,६०० रुपये असेल.

  • जीवनशैलीतील आमूलाग्र बदल झाल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर फार मोठ्या रकमेची आवश्यकता भासते.
  • गुंतवणुकीचा कमी झालेला कालावधी: अर्थार्जन सुरू होण्यास उशीर होणे आणि लवकर सेवानिवृत्ती घ्यावी लागणे यामुळे अर्थार्जनाचा कालावधी कमी आणि पर्यायाने गुंतवणुकीचा कालावधी कमी झाला आहे.
  • सेवानिवृत्तीचा वाढलेला कालावधी: लवकर सेवानिवृत्ती घ्यावी लागणे. आरोग्य क्षेत्रातील प्रगतीमुळे वाढलेले आयुर्मान यामुळे सेवानिवृत्तीचा कालावधी वाढला आहे.
  • पीपीएफचे फायदे मिळवण्यासाठी पीपीएफमधील बचत आवश्यक आहे आणि सेवानिवृत्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आवश्यक आहे.

उदा. रमेश आणि त्याचा मित्र मंगेश यांचे मासिक उत्पन्न १ लाख रुपये आहे त्यांनी सेवानिवृत्तीसाठी केलेल्या बचत आणि गुंतवणुकीच्या मदतीने आपण सेवानिवृत्तीसाठी आर्थिक नियोजन कसे करावे याची माहिती घेऊया.

रमेशमंगेश
वय (२०२३ मध्ये)३० वर्षे३० वर्षे
दरमहा उत्त्पन्न१ लाख१ लाख
पीपीएफ बचत१,५०,०००१,००,०००
म्युच्युअल फंड गुंतवणूक० २,००,०००
५८ व्या वर्षी आवश्यक निधी८ कोटी८ कोटी
पीपीएफचे मूल्य१.२३ कोटी८२ लाख
म्युच्युअल फंडाचे मूल्य० ३.८१ कोटी
एकत्रित मूल्य१.२३ कोटी४.६३ कोटी

सेवानिवृत्तीनंतर दरमहा आजच्या ५० हजार रुपयांचे पेन्शन मिळवायचे असेल तर रमेश आणि मंगेशला प्रेत्येकी ८ कोटी रुपयांची आवश्यकता असेल. मंगेशने म्युच्युअल फंडात देखील गुंतवणूक केल्याने त्याचा सेवानिवृत्तीचा निधी रमेशपेक्षा खूप जास्त असेल.

मंगेशने म्युच्युअल फंडात एसआयपी टॉप अपच्या मदतीने गुंतवणूक केल्यास ८ कोटींचे उद्दिष्ट मंगेश निश्चितच पूर्ण करू शकेल.

सेवानिवृत्तीच्या नियोजनातील महत्त्वाचे मुद्दे

  • लवकर सुरुवात करा: नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगारपासून सुरुवात केल्यास उत्तम.
  • म्युच्युअल फंडासारख्या गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायात गुंतवणूक आवश्यक.
  • वार्षिक आढावा घ्या आणि आपल्या आर्थिक सल्लागारासोबत चर्चा करून निर्णय घ्या.

लेखक अर्थविषयक तज्ज्ञ आणि प्रशिक्षक आहे

Story img Loader