RBI UDGAM portal Launch : देशाच्या बँकांमध्ये पडून असलेल्या दावा न केलेल्या रकमेचा शोध घेणे आता सोपे झाले आहे. बँक खातेदारांना मदत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने उदगम (UDGAM – Unclaimed Deposits – Gateway to Access Information) हे केंद्रिकृत वेब पोर्टल सुरू केले आहे. आरबीआयच्या या पावलामुळे दावा न केलेल्या रकमेची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. उदगम प्लॅटफॉर्मचा उद्देश लोकांना एका ठिकाणाहून दावा न केलेली रक्कम शोधण्यात मदत करणे आणि योग्य दावेदाराला मदत करणे हा आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी उदगम पोर्टल लाँच केले आहे. मूळ प्लॅटफॉर्मचा अर्थ हक्क नसलेल्या ठेवींमध्ये प्रवेश करण्यासाठी पात्र दावेदारांना मार्ग शोधून देणे हा आहे.
‘या’ बँकांमध्ये हक्क नसलेल्या ठेवींचा तपशील उपलब्ध
UDGAM प्लॅटफॉर्म RBI द्वारे विकसित केले गेले आहे, जेणेकरून लोकांना एकाच ठिकाणी अनेक बँकांमध्ये त्यांच्या हक्क न केलेल्या ठेवी सहजपणे शोधता येतील आणि त्यावर दावा करता येईल. पोर्टलवर सध्या ७ बँका स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India), धनलक्ष्मी बँक लिमिटेड (Dhanlaxmi Bank Ltd), साऊथ इंडियन बँक (South Indian Bank Ltd), DBS बँक इंडिया लिमिटेड (DBS Bank India Ltd) आणि सिटी बँक (Citibank N.A)मध्ये हक्क न सांगितलेल्या ठेवींची माहिती उपलब्ध आहे.
याप्रमाणे नोंदणी करता येणार
सर्व प्रथम UDGAM च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
तुम्ही पहिल्यांदाच या प्लॅटफॉर्मला भेट देत असाल तर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
udgam.rbi.org.in/unclaimed-deposits/#/register या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाइल नंबर, नाव, पासवर्ड, कॅप्चा कोड आणि योग्य अटींना तुमची संमती देऊन नोंदणी करू शकाल.
नोंदणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण आवश्यक तपशिलांच्या मदतीने दावा न केलेल्या ठेव तपशीलांची पडताळणी करून दावा करण्यास सक्षम होणार आहे.
इतर बँकांचे अनक्लेम डिपॉझिट तपशील १५ ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (ReBIT), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाईड सर्व्हिसेस (IFTAS) आणि सहभागी बँकांनी पोर्टल विकसित करण्यासाठी सहकार्य केले आहे. निवेदनानुसार, सध्या वापरकर्ते वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ७ बँकांच्या संदर्भात त्यांच्या दावा न केलेल्या ठेवींचे तपशील मिळवू शकतील. अशा रकमेचा शोध घेण्याची सुविधा इतर बँकांसाठी १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत टप्प्याटप्प्याने पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
हेही वाचाः BYJU मधून ४०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ; कामगिरी मूल्यांकनाच्या नावाखाली चालवली नोकरीवर कु-हाड
SBI कडे ८०८६ कोटी दावा न केलेल्या ठेवी
फेब्रुवारी २०२३ पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुमारे ३५,००० कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी आरबीआयकडे हस्तांतरित केल्या होत्या. ही ती ठेव खाती होती, जी १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वापरली गेली नाहीत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ८०८६ कोटी रुपयांसह दावा न केलेल्या ठेवींच्या बाबतीत माहिती आहे. त्यापाठोपाठ पंजाब नॅशनल बँक ५३४० कोटी, कॅनरा बँक ४५५८ कोटी आणि बँक ऑफ बडोदा ३९०४ कोटींच्या हक्क नसलेल्या ठेवी आहेत. यंदा ६ एप्रिल रोजी द्विमासिक पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेण्यासाठी केंद्रीय वेब पोर्टल तयार करण्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दावा न केलेल्या ठेवींच्या संख्येत वाढ होत असलेला ट्रेंड पाहता लोकांना याबाबत जागरूक करण्यासाठी वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. वेब पोर्टल लाँच केल्याने लोकांना त्यांची हक्क न केलेली ठेव खाती ओळखण्यास मदत होणार आहे आणि ते एकतर ठेव रकमेवर दावा करू शकतात किंवा त्यांच्या संबंधित बँकांमध्ये त्यांची ठेव खाती सक्रिय करू शकतात.