या स्तंभातील (अर्थ वृत्तान्त, ९ सप्टेंबर २०२४) ‘तेजी-मंदी चक्राचा ल.सा.वि.’ या लेखात, गेल्या दोन वर्षांपासून निफ्टीची तेजी-मंदीची वाटचाल गुंतवणूकदारांसमोर विशद करून सांगितली होती. गेल्या दोन वर्षांत जेव्हा तेजी आली, ती नीचांकापासून साधारणत: ३,५०० ते ४,५०० अंशांची, तर मंदी ही साधारणतः २,००० अंशांची होती हे सूत्र ठरून गेले होते. तेच सूत्र हाताशी धरत, ४ जूनचा निफ्टी निर्देशांकाच्या २१,२८१ च्या नीचांकापासून ४,५०० अंश मिळवले असता २५,७८१ चा उच्चांक दृष्टिपथात येतो, तसेच या लेखात एक वाक्य अधोरेखित केलेले ते म्हणजे तांत्रिक विश्लेषण शास्त्रातील ‘इलियट वेव्ह’ संकल्पनेप्रमाणे २५,८०० ते २६,३०० हा तेजीच्या मार्गातील अवघड टप्पा असेल. या अवघड टप्प्यावरच निफ्टी निर्देशांकाची उच्चांक नोंदवून घसरण सुरू होऊ शकते याची जाणीव गुंतवणूकदारांना करून दिलेली होती. प्रत्यक्षात घडलेही तसेच. २७ सप्टेंबरला निफ्टी निर्देशांकाने २६,२७७ चा उच्चांक नोंदवला आणि त्या उच्चांकापासून १,५८३ अंशांची घसरण दाखवत, निफ्टीने आपली तेजी-मंदीची चाल प्रत्यक्षात आणली. हे गणित ज्या वाचकांना कळले त्यांनी निर्देशांकाच्या उच्चांकी स्तरावर समभागांची नफारूपी विक्री करत दोन पैसे गाठीला बांधले. पण या उच्चांकावर समभागांची नफारूपी विक्री करायची राहून गेले, अथवा समभागांची नव्याने खरेदी केली गेली, त्या गुंतवणूकदारांना मंदीचे चटके बसले. निफ्टीने त्यावर हळुवार फुंकर घालत पुसले…‘सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला?’ या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळूया
शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स: ८१,३८१.३६ / निफ्टी: २४,९६४.२५

हे ही वाचा…माझा पोर्टफोलियो : वित्त क्षेत्रातील भक्कम दावेदार

stock market crash
शेअर बाजारात तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Bengaluru Diwali Firecrackers accident
VIDEO: “फटाक्यावर बसला तर नवीकोरी रिक्षा घेऊन देऊ”; तरुणाला पैज भारी पडली, मृत्यूचा थरार कॅमेरात कैद
how nirav modi committed fraud of rupees 11000 crores
हिरा है सदा के लिये! (पूर्वार्ध)
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
Donald Trumps legal cases
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांचे काय होणार? त्यांची निर्दोष मुक्तता होणार?
Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवार युगेंद्र पवारांबद्दल बोलताना भावूक, डोळ्यांच्या कडा ओल्या, आवंढा गिळला अन् म्हणाले…

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २५,३०० ते २५,६०० हा अवघड टप्पा असून, हा टप्पा पार केल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २५,९०० ते २६,३०० असेल.

निफ्टी निर्देशांक सातत्याने २५,००० च्या खाली टिकल्यास त्याचे प्रथम खालचे लक्ष्य २४,८०० ते २४,५०० व द्वितीय खालचे लक्ष्य हे २४,२०० ते २३,८०० असेल.
आढावा ‘शिंपल्यातील मोती’सदरातील शिफारस समभागांचा

देवयानी इंटरनॅशनल लिमिटेडचा समभाग २३ सप्टेंबर २०२४ ला २१० रुपयांना सुचवलेला व त्याच दिवशी त्याने २२२ रुपयांचा उच्चांक नोंदवला. ९ सप्टेंबरच्या लेखात पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या ३८५ रुपयांना सुचवलेल्या समभागाने २३ सप्टेंबरला ४०९ रुपयांचा उच्चांक नोंदवला. २६ ऑगस्टच्या लेखात टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड हा समभाग १,०३७ रुपयांना सुचवला होता, त्याने २० सप्टेंबरला १,१३६ चा उच्चांक नोंदवला. या सर्व समभागांत शिफारस केल्यावर तेजी अवतरली. पण २६ सप्टेंबरनंतर इराण-इस्रायल युद्धामुळे बाजारातील तेजीच्या धारणेवर विपरीत परिणाम झाला. या सर्व समभागांना मंदीला सामोरे जाव लागले. समभाग शिफारस करताना नेहमीच एक सूचना केली जाते की, भविष्यातील बाजारातील व समभागातील घसरणीत हे समभाग प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांच्या पाच तुकड्यांत खरेदी करावे. हा सल्ला अशा मंदीत उपयोगी येतो. जुलै ते सप्टेंबरमध्ये सुचवलेले समभाग हे ‘स्टॉप लॉस’ संकल्पनेचे पालन करत मंदीतही राखून ठेवावेत. किंबहुना मंदीत जास्त समभाग खरेदी करावेत.
शिंपल्यातील मोती

हे ही वाचा…कापसाचे भवितव्य अधांतरीच…

वेलस्पन लिव्हिंग लिमिटेड

(शुक्रवार, ११ ऑक्टोबर भाव- १६५.८५ रु.)

घरला नीटनेटके, आकर्षक राखण्यापासून टेनिसची पंढरी असलेल्या विम्बल्डनच्या सामन्यांपर्यंत आपल्या विविध आकर्षक उत्पादनांचा पुरवठा करणारी, ‘लाइफ से मांगो मोअर’ हे आपले घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवत बेडशीट, टॉवेल, घराची, ऑफिसची आकर्षक जमिनीची सजावट (फ्लोरिंग) अशी विविध गृहोपयोगी उत्पादने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर ५० देशांत निर्यात करणारी, बालक्रिशन गोएंका व दीपाली गोएंका यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली ‘वेलस्पन लिव्हिंग लिमिटेड’ कंपनीचा समभाग हा आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे.

आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास, विक्री १,७०२.२७ कोटींवरून, २,१६९.८६ कोटी, करपूर्व नफा २०८.६२ कोटींवरून १९४.८८ कोटी, तर निव्वळ नफा १५५.४८ कोटींवरून १४५.१५ कोटी झाला आहे. समभागाचे आलेख वाचन करता समभागाने आपल्याभोवती १५ रुपयांचा परीघ निर्माण केलेला आहे. जसे की १३५… १५०… १६५… १८०. या समभागाचा बाजारभाव सातत्याने १८० रुपयांवर १५ दिवस टिकल्यास समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे १९५ ते २२५ रुपये, तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य हे ३०० ते ४०० रुपये असेल. भविष्यातील बाजारातील व समभागातील घसरणीत हा समभाग १५० ते १३० रुपयांदरम्यान प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांच्या पाच तुकड्यात खरेदी करावा. या समभागातील दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला १०० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

महत्त्वाची सूचना: वरील समभागांत लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे.
निकालपूर्व विश्लेषण

हे ही वाचा…बाजारातली माणसं : ‘व्हीआयपी’ फक्त एकच! – दिलीप पिरामल

१) इन्फोसिस लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, १७ ऑक्टोबर
११ ऑक्टोबरचा बंद भाव- १,९३५.१० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: २,००० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,१०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,३०० रुपये.
ब) निराशादायक निकाल: २,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,७५० रुपयांपर्यंत घसरण

२) टाटा केमिकल्स लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, १७ ऑक्टोबर

११ ऑक्टोबरचा बंद भाव- १,१८३.१० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,२५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,२५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,३५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,५०० रुपये.
ब) निराशादायक निकाल: १,२५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,०८० रुपयांपर्यंत घसरण

३) एचडीएफसी बँक लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- शनिवार, १९ ऑक्टोबर

११ ऑक्टोबरचा बंद भाव- १,६५१रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,६५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,६५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,७२० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७८० रुपये.
ब) निराशादायक निकाल: १,६५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,५३५ रुपयांपर्यंत घसरण

४) कोटक महिंद्र बँक लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- शनिवार, १९ ऑक्टोबर

११ ऑक्टोबरचा बंद भाव – १,८८२.४० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,८२० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,८२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,९४० रुपये, द्वितीय लक्ष्य २,०२० रुपये.
ब) निराशादायक निकाल: १,८२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,७८० रुपयांपर्यंत घसरण

५) पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २२ ऑक्टोबर

११ ऑक्टोबरचा बंद भाव- ५,४६९.५५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ५,४५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ५,४५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य ५,८०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ५,४५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५,१०० रुपयांपर्यंत घसरण

६) झेन्सार टेक्नॉलॉजी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २२ ऑक्टोबर
११ ऑक्टोबरचा बंद भाव – ६९४.९५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ६६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ६६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७५० रुपये, द्वितीय लक्ष्य ८२० रुपये.
ब) निराशादायक निकाल- ६६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६१० रुपयांपर्यंत घसरण

आशीष ठाकूर लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत. ashishthakur1966@gmail.com अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक.

Story img Loader