थीमॅटिक फंड एखाद्या विशिष्ट थीममध्ये गुंतवणूक करतात. यातील गुंतवणूक आर्थिक कल किंवा एखाद्या गोष्टीचा उपभोग किंवा बदल याभोवती फिरणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक असू शकते. ज्यात गुंतवणूक केल्याने फायदा होण्याची शक्यता असते, अशा संधींच्या शोधात थीमॅटिक फंड व्यवस्थापक असतात. थीमॅटिक फंड हा एक इक्विटी फंड प्रकार आहे आणि साहसी गुंतवणूकदार या प्रकारच्या फंडाचा गुंतवणुकीसाठी विचार करू शकतात.

फ्रँकलिन इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड हा एक थीमॅटिक फंड असून बदलत्या भारतातील गुंतवणूक संधींचा शोध घेणारा हा फंड आहे. विशेष परिस्थितींमुळे उद्भवलेल्या संधींचा सक्रियपणे शोध घेऊन भांडवली लाभ मिळविण्यासाठी कॉर्पोरेट पुनर्रचना, सरकारी धोरणे आणि नियमांमधील बदल, तात्पुरत्या आव्हानांमुळे मूल्यांकन बाधित झालेल्या कंपन्या यांसारख्या अनेक घटकांचा या थीममध्ये समावेश असू शकतो. या फंडाची गुंतवणूक ‘मेक इन इंडिया’ ‘डिजिटलाइझेशन’ आणि ‘सस्टेनेबल लिव्हिंग’ या तीन सुत्रांभोवती गुंफलेली आहे. हा फंड फ्रँकलिनने २० वर्षांपूर्वी उपलब्ध करून दिलेला असला तर मागील वर्षी एप्रिलमध्ये, फंडाच्या गुंतवणूक परिघात दोन मार्गदर्शक तत्त्वांसह काही बदल करण्यात आले. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, गुंतवणुकीची रणनीती बाजारपेठेतील उदयोन्मुख थीम ओळखणे आणि त्यांचा गुंतवणुकीत समावेश करण्याबाबत शक्यता पडताळून पाहिली जाते. याव्यतिरिक्त, पोर्टफोलिओचे उद्दिष्ट वर उल्लेख केलेल्या तीनपैकी कोणत्याही एका थीमचे पोर्टफोलिओवर वर्चस्व राहणार नाही याची खात्री करून गुंतवणुकीत लवचिकता राखणे हे आहे. पोर्टफोलिओ सक्रियपणे विकसित होत असलेल्या बाजारातील बदलांवर लक्ष ठेवून त्याच्या सापेक्ष गुंतवणुकीच्या संधींचा मागोवा घेत असतो.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

हेही वाचा – वित्तरंजन : कला : भावनिक गुंतवणूक की केवळ गुंतवणूक?

प्रोत्साहन योजना म्हणजेच पीएलआय ही ‘मेक इन इंडिया’ या व्यापक धोरणाचा एक भाग आहे. कंपन्यांना उत्पादन वाढवण्यासाठी कर सवलत, आयात शुल्कात सूट, सुलभ भूसंपादन या स्वरूपात आहेत. पीएलआय योजनेचे फायदे कमी किमतीच्या दृष्टीने वस्तूंच्या अंतिम ग्राहकांना दिले जातात.या गोष्टीचे उत्तम उदाहरण म्हणजे विद्युत वाहने (ई-व्हेईकल). सध्या विद्युत वाहनांना मोठी मागणी नाही. पर्यावरणपूरक वाहनांकडे वळणे आवश्यक असल्याने या वाहनाच्या वापरकर्त्याला किमतीत अनुदानाच्या रूपात सूट देण्यात आली होती. पीएलआयमुळे अनेक उत्पादक कंपन्या कारखाने उभारत आहेत. अशा संधी ‘मेक इन इंडिया’मुळे उपलब्ध झाल्या आहेत. या संधींचा शोध घेणारा हा फंड आहे.

इंटरनेटवर होणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल अर्थव्यवस्था ही एक सामूहिक संज्ञा आहे. याला ‘वेब इकॉनॉमी’ किंवा ‘इंटरनेट इकॉनॉमी’ असेही म्हणतात. तंत्रज्ञानाच्या आगमनाने आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे, डिजिटल आणि पारंपरिक अर्थव्यवस्था एकात विलीन होत आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या या संकल्पनेबद्दल अधिक जाणून घेऊया.

इंटरनेटवर होणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल अर्थव्यवस्था ही एक सामूहिक संज्ञा आहे. तंत्रज्ञानाच्या आगमनाने आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे, डिजिटल अर्थव्यवस्थेचा उदय झाला. डिजिटल अर्थव्यवस्थेची व्याख्या डिजिटल तंत्रज्ञानावर केंद्रित करणारी अर्थव्यवस्था म्हणून केली जाते. डॉन टॅपस्कॉट यांनी ‘डिजिटल इकॉनॉमी : प्रॉमिस अँड पेरिल इन द एज ऑफ नेटवर्क्ड इंटेलिजन्स’ या पुस्तकात १९९५ मध्ये ‘डिजिटल इकॉनॉमी’ हा शब्द पहिल्यांदा वापरला. मागील २५ वर्षांत डिजिटल मंचांची प्रचंड वाढ झाल्यामुळे आणि फिचर फोनकडून स्मार्ट फोनकडे संक्रमण झाल्याने अनेक गोष्टी कालबाह्य झाल्या. उदाहरण द्यायचे तर परगावी प्रवासासाठी रेल्वेच्या तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट काढणे कालबाह्य झाले तर आयआरसीटीसी ॲपने तिकीट काढण्याला प्राधान्य मिळू लागले. हा फंड अशा बदलांच्या लाभार्थी असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे.

पोर्टफोलिओ रचना :

या फंडाचा पोर्टफोलिओत ८० टक्के गुंतवणूक ‘मेड इन इंडिया’, ‘डिजिटलायझेशन’ आणि ‘सस्टेनेबल लिव्हिंग’ या थीम भोवती गुंफलेल्या आहेत. या थीमची निवड अनेक निकषांवर आधारित आहे. प्रथम, शाश्वत कल असलेल्या प्रदीर्घकाळ चालणाऱ्या थीम ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये थीमच्या दीर्घकालीन व्यवहार्यतेला समर्थन देणारे घटक आणि परिस्थितींचे कंपन्यांचे मूल्यांकन सापेक्ष विश्लेषण करणे आणि दुसरे म्हणजे, निधी व्यवस्थापक किरण सॅबस्टीन आणि त्यांचा गुंतवणूक संधोशकांचा चमू संभाव्य गुंतवणूक संधींच्या सतत शोधात असतो. या गुंतवणूक परिघातील प्रदीर्घ काळ व्यवसायातून रोकड निर्मिती करणारे व्यवसाय ओळखणे हे या चमूचे मुख्य काम असते. “जी कंपनी व्यवसायातून रोख नफा मिळवू शकत नाही ती कंपनी गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्मिती करू शकत नाही” असे किरण सॅबस्टीन म्हणाले.

हेही वाचा – Money Mantra: रिझर्व्ह बँक पॉलिसीचा परिणाम

आकर्षक व्यवसाय प्रारूप आणि कार्यपद्धती टिकवून ठेवण्यासाठी वाजवी मूल्यमापन असलेल्या कंपन्यांचा शोध घेणे हे सतत सुरू असलेले काम असते. व्यवसायांची गुणवत्ता, त्यांच्या वाढीची शक्यता, त्यांच्या व्यवसायाच्या प्रारूपाचा (बिझनेस मॉडेल) टिकाऊपणा आणि त्यांचे वाजवी मूल्यांकन यांचा विचार केला जातो. प्रत्येक कंपनीचे कठोर बॉटम-अप पद्धतीनुसार विश्लेषण करून वाढीच्या शक्यता, टिकावूपणा आणि मूल्यमापनाच्या आधारे स्थान निश्चित केले जाते. फ्रँकलिन इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाने बाजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यात समाधानकारक कामगिरी केली आहे. एक ते दहा वर्षाच्या कालावधीत, त्याने निफ्टी ५०० आणि निफ्टी ५० या दोन्ही निर्देशांकांसापेक्ष अधिक परतावा मिळविला आहे. तीन, पाच आणि दहा वर्षांच्या कालावधीत, फंडाने निर्देशांकांच्या तुलनेत सातत्याने जास्त परतावा दिला आहे.