· फंड घराणे – आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

· फंड कधी लॉन्च झाला ? – ३० ऑगस्ट २००२.

· एन. ए. व्ही. (२१ डिसेंबर 2023 रोजी) ग्रोथ पर्याय – ४२३ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता ( ३० नोव्हेंबर २०२३ रोजी)– २४२८९ कोटी रुपये.

· फंड मॅनेजर्स – महेश पाटील, धवल जोशी.

फंडाची स्थिरता (३० नोव्हेंबर २०२३)

· पोर्टफोलिओ टर्नओव्हर ३३ %

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन १२.७४ %

· बीटा रेशो ०.९३ %

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडा पेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

या फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला माहिती असायला हवी अशी एक गोष्ट म्हणजे गेल्या वीस वर्षांपासून फंड मॅनेजरने वापरलेली त्रिसूत्री.

पोर्टफोलिओतील शिस्तबद्धता : आघाडीच्या शंभर कंपन्यांमधील नेमके कोणते शेअर्स निवडायचे ? आघाडीच्या पाच शेअर्समध्ये साधारणपणे पोर्टफोलिओच्या पाच ते दहा टक्के प्रति शेअर अशी गुंतवणूक असायला हवी.

निफ्टी १०० इंडेक्स आणि सेक्टरचा अंदाज : निफ्टी १०० मध्ये एका सेक्टरचे जेवढे शेअर्स असतील साधारण तेवढ्याच प्रमाणात पोर्टफोलिओमध्ये त्या सेक्टरचे शेअर्स ठेवायचे. उदाहरणार्थ निफ्टी १०० कंपन्यांपैकी बँकिंग क्षेत्रातील शेअर्सचा वाटा तीस ते पस्तीस टक्के असेल तर या फंडाच्या पोर्टफोलिओ मध्ये बँकिंग सेक्टर साधारण तितकेच टक्के असेल पण त्यातील शेअर्स मात्र कमी जास्त प्रमाणात विकत घेतले जातील.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

२१ डिसेंबर २०२३ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – १९.५८ %

· दोन वर्षे – १३.६१ %

· तीन वर्षे – १८.७३ %

· पाच वर्षे – १४.६२ %

· दहा वर्षे – १४.६५ %

· फंड सुरु झाल्यापासून – १९.२० %

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३० नोव्हेंबर २०२३ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण ७५ शेअर्सचा समावेश आहे पोर्टफोलिओच्या ३३% वेटेज आघाडीच्या पाच कंपन्यांचे आहे. एच.डी.एफ.सी. बँक, आय.सी.आय.सी.आय. बँक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, भारतीय एअरटेल, ॲक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सन फार्मा हे पहिले दहा शेअर्स पोर्टफोलिओ मध्ये दिसतात.

कोणत्या क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक केली आहे ?

खाजगी बँकांचे पोर्टफोलिओतील वर्चस्व कायम आहे व पाच बँकांच्या शेअर्सचा एकूण पोर्टफोलिओ मधील वाटा २३ % आहे. त्या खालोखाल सॉफ्टवेअर ९%, वाहन निर्मिती ५.५९%, पेट्रोलियम ५.५२%, एन. बी. एफ. सी. ४.७५%, फार्मा ४.६९% असे पोर्टफोलिओचे व्यवस्थापन केले आहे.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

· एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ३०.१९ %

· दोन वर्षे १९.८८ %

· तीन वर्षे १६.७१ %

· पाच वर्षे १८ %

· सलग दहा वर्ष १३.७२ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

*नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fund analysis aditya birla sunlife front line equity fund mmdc dvr