-कौस्तुभ जोशी

  • फंड घराणे – डीएसपी म्युच्युअल फंड
  • फंडाचा प्रकार – इक्विटी फंड
  • फंड कधी लॉन्च झाला ? – १० मार्च २००३ .
  • एन. ए. व्ही. ( १९ जानेवारी २०२४ रोजी) ग्रोथ पर्याय – ३७४ रुपये प्रति युनिट
  • फंड मालमत्ता (रोजी ) – ३३४० कोटी रुपये.
  • फंड मॅनेजर्स – अभिषेक सिंग, जय कोठारी.

फंडाची स्थिरता ( ३१ डिसेंबर २०२४ )

  • पोर्टफोलिओ टर्नओव्हर ०. ३६
  • स्टॅंडर्ड डिव्हिएशन १२. ७९ %
  • बीटा रेशो ०.८८

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !

आणखी वाचा-Money Mantra: शेअर बाजाराचा ‘यू टर्न’, पडझडीतून सावरणार का? कसे?

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडा पेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२ % परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

डीएसपी टॉप १०० इक्विटी फंड गुंतवणुकीसाठी पुढील तीन तत्त्वांचा वापर करतो.

पोर्टफोलिओ मध्ये स्थिरता असली पाहिजे — उगीचच अधिक परतावा मिळण्यासाठी शेअर्समध्ये खरेदी विक्री करण्याच्या ऐवजी चांगले शेअर्स निवडून त्यामध्ये दीर्घकाळपर्यंत पैसे गुंतवायचे.

लीडर्स ओळखा — प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यरत असणाऱ्या कंपन्यांपैकी ज्या पहिल्या दोन कंपन्या आहेत त्याच कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे.

सखोल अभ्यास — एखादा शेअर विकत घेताना त्या कंपनीने बिझनेस सायकल मध्ये कशी प्रगती केली आहे हे आजमावून बघितल्याशिवाय शेअर विकत घ्यायचा नाही.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

आणखी वाचा-Money Mantra : एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये घसरण, तुमच्या फंडांचा आढावा घेतलात का?

१९ जानेवारी २०२४ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

  • एक वर्ष – २६.०६ %
  • दोन वर्षे – १२.६९ %
  • तीन वर्षे – १४.१९ %
  • पाच वर्षे – १४.१० %
  • दहा वर्षे – १२.९२ %
  • फंड सुरु झाल्यापासून – १८.९५ %

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

या म्युच्युअल फंड योजनेमध्ये जास्त शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असण्यापेक्षा ‘मोजके-चांगले’ शेअर्स निवडावेत हा फंड मॅनेजरचा आग्रह आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार पोर्टफोलिओ मध्ये फक्त ३१ शेअर्सचा समावेश केलेला आहे

कोणत्या क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक केली आहे ?

खाजगी बँक पोर्टफोलिओचा सर्वाधिक हिस्सा आहे, यामध्ये २६ %गुंतवणूक केली आहे. त्याखालोखाल फार्मा १४ %, वाहन उद्योग ८ % , सॉफ्टवेअर आणि एन बी एफ सी ७ %अशी गुंतवणूक आहे.

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक ९ %, ॲक्सिस बँक ७.५%, महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मा इप्का लॅबोरेटरीज, आयटीसी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, बजाज फायनान्स यामध्ये ४ ते ५ % , टाटा मोटर्स ३.५ % हे टॉप १० शेअर्स पोर्टफोलिओ मध्ये दिसतात. डिसेंबर अखेरीस कंपनीने आपल्या पोर्टफोली होतील अल्केम लॅबोरेटरी हा शेअर विकला आहे.

आणखी वाचा-Money Mantra: फंड विश्लेषण- जे एम लार्ज कॅप फंड

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

  • एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ३४.७५ %
  • दोन वर्षे २३. ९ %
  • तीन वर्षे १७. ७३ %
  • पाच वर्षे १७.०२ %
  • सलग दहा वर्ष १२.४१ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.

Story img Loader