कौस्तुभ जोशी

·      फंड घराणे –  एच.एस.बी.सी. म्युच्युअल फंड

bank mitra warn of agitation over low remuneration lack of protection of service
‘बँक मित्रां’चा आंदोलनाचा इशारा; तुटपुंजे मानधन, सेवाशर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How to invest in mutual fund SIPs the right way
म्युच्युअल फंडामध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या, SIP कशी सुरू करावी?
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती

·      फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

·      फंड कधी लॉन्च झाला ? – १० डिसेंबर २००२.

·      एन. ए. व्ही. ( ३० जानेवारी २०२४ रोजी) ग्रोथ पर्याय – ४०३  रुपये प्रति युनिट

·      फंड मालमत्ता (३१ डिसेंबर २०२३ रोजी )  – १६७८  कोटी रुपये.

·      फंड मॅनेजर्स – निलोत्पल सहाय,  गौतम भूपाल.

फंडाची स्थिरता ( ३१ डिसेंबर २०२३ )

·        पोर्टफोलिओ टर्नओव्हर ४५ %

·        स्टॅंडर्ड डिव्हिएशन  १४.९२   %

·        बीटा रेशो ०.९३ %

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा  खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

हेही वाचा >>>Money Mantra: कररचनेत कोणताही बदल नाही; जुनी कर थकबाकी माफ होणार

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निदर्शक आहे. म्हणजेच दोन फंडांची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडापेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे. उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का  ?

एच.एस.बी.सी. लार्ज कॅप फंड या योजनेचे फंड मॅनेजर चार तत्वांचा वापर करून आपला पोर्टफोलिओ आखतात.

शेअरची निवड – शेअरचे विश्लेषण आणि पोर्टफोलिओ मधील त्याचा वाटा किती  असावा.

संख्यात्मक आणि गुणात्मक – या दोन्ही मुद्द्यांवर प्रत्येक शेअरचे विश्लेषण करण्यात येते.

व्यवसाय आकलन – कंपनी निवडताना व्यवसाय किती दर्जेदार आहे ? ईएसजी आणि सेन्सेक्स आणि निफ्टीच्या तुलनेत शेअर किती वाढलेला किंवा स्वस्तात उपलब्ध आहे ?

कॅश फ्लो – शेअर निवडताना कॅश फ्लो योग्य पद्धतीने हाताला जातो आहे याची तपासणी केली जाते.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

३० जानेवारी २०२४  रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

·        एक वर्ष –  ३०.४१   %

·        दोन वर्षे –    १३.४९ %

·        तीन वर्षे –    १६.३४%

·        पाच वर्षे –   १५.९१ %

·        दहा वर्षे –    १४.४३ %

·        फंड सुरु झाल्यापासून –   १९.१९  %

हेही वाचा >>>शेअर बाजाराची वाटचाल कशी राहणार? अर्थसंकल्पातून गुंतवणूकदारांना काय मिळाले?

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३१ डिसेंबर रोजी उपलब्ध पोर्टफोलिओनुसार सर्वाधिक गुंतवणूक एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, इन्फोसिस, लार्सन अँड टूब्रो, आयटीसी, डीएलएफ, सन फार्मा आणि ओएनजीसी या कंपन्यांमध्ये केलेली दिसते. फंड मॅनेजर पोर्टफोलिओ तयार करताना आकाराने मध्यम ठेवतात ४० ते ५० शेअरचा पोर्टफोलिओ सलगपणे राखलेला दिसतो. यापैकी लार्ज कॅप कंपन्यांमध्ये ८५ टक्के गुंतवणूक आहे. मिडकॅपमध्ये आणि स्मॉल कॅपमध्ये मिळून जवळपास १४ टक्के गुंतवणूक आहे. ज्यावेळी मिड आणि स्मॉल कॅप मध्ये तेजी येते त्यावेळी फंड मॅनेजर त्याचा फायदा घेण्यास मागेपुढे बघत नाहीत.

अलीकडील काळात सुंदरम फायनान्स लिमिटेड हा शेअर पोर्टफोलिओ मध्ये नव्याने दाखल झाला असून, महिंद्रा अँड महिंद्रा, एल टी आय माईंड ट्री यातील गुंतवणूक विकून टाकली आहे.

सेक्टर अनुसार विचार करायचा झाल्यास बँक २४ %, आयटी-सॉफ्टवेअर ९.७५%, पेट्रोलियम ७.७%, फार्मा ६.६७%, एफएमसीजी ५.८४%, रिअल इस्टेट ५.४७%, बांधकाम ४.७३%, वित्त संस्था ३.७१% अशी गुंतवणूक केली गेली आहे.

 ‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

·        एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ३२.८२  %

·        दोन वर्षे २२.१४  %

·        तीन वर्षे १७.०५   %

·        पाच वर्षे १७.३७    %

·        सलग दहा वर्ष १३.६२  %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

 * नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.

Story img Loader