·फंडाचा प्रकार – मिड कॅप इक्विटी फंड

·एनएव्ही (१ जुलै २०२४ रोजी) ग्रोथ पर्याय – २४४ रुपये प्रति युनिट

India turmeric export target of 1 billion doller by 2030
हळदीचे १०० कोटी डॉलरचे निर्यातलक्ष्य
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
Company DCX Systems Limited Overview in marathi
माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स  
Inflow of Rs 41156 crore into equity funds in December Investment in small midcap funds contributed significantly
डिसेंबरमध्ये ‘इक्विटी फंडा’त ४१,१५६ कोटींचा ओघ; स्मॉल, मिडकॅप फंडातील गुंतवणुकीचे मोठे योगदान
Microfinance institutions loan arrears rise to 4 3 percent print eco news
बचतगटांच्या परतफेडीत कसूर; मायक्रोफायनान्स संस्थांची कर्ज थकबाकी वाढून ४.३ टक्क्यांवर

·फंड मालमत्ता (३१ मे २०२४ रोजी ) – ७९५२ कोटी रुपये.

·फंड मॅनेजर – अंकित पांडे , वसाव सेहगल, संजीव शर्मा.

फंडाची स्थिरता ( २८ फेब्रुवारी २०२४ )

·स्टँडर्ड डिव्हिएशन १७. ८५

·बीटा रेशो १. ०१ %

पोर्टफोलिओ टर्नओव्हर

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी- विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील, तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

हेही वाचा: Money Mantra: होम लोन मुदतीपूर्वीच चुकते करावे की, नाही?

स्टँडर्ड डिव्हिएशन

एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्देशक म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे, तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडांपेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे. उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी 12% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टँडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

· क्वान्ट म्युच्युअल फंडातर्फे व्हीएलआरटी या तंत्राचा वापर केला जातो

o V – व्हॅल्यू

o L -लिक्विडिटी

o R -रिस्क आणि

o T- टायमिंग

या चौघांचा ताळमेळ साधल्यावर गुंतवणूक कायमच फायदेशीर ठरते हे या फंडाचे यशाचे रहस्य आहे.

हेही वाचा: फार्मा, आरोग्य – तंत्रज्ञान आणि भविष्यातील संधी

ज्या कंपन्यांमध्ये भविष्यात मार्केट लीडर होण्याची क्षमता आहे, अशाच कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून बाजारातील रॅलीचा उत्तम वापर करणे हे फंड मॅनेजरचे उद्दिष्ट असते.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

२८ जून २०२४ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

·एक वर्ष – ७१. ७४ %

·दोन वर्षे – ४६. ८७ %

·तीन वर्षे – ३२. ४५ %

·पाच वर्षे – ३४. ८४ %

·दहा वर्षे – २०. ९५ %

·फंड सुरु झाल्यापासून – १४. ७१ %

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३१ मे २०२४ रोजी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार या फंड योजनेच्या पोर्टफोलिओ मध्ये एकूण २६ शेअर्सचा समावेश आहे. यापैकी ४३ % गुंतवणूक लार्ज कॅप प्रकारामध्ये असून उरलेली गुंतवणूक मिडकॅप- स्मॉल कॅप शेअर्स मध्ये केली गेली आहे.

रिलायन्स ९.२२ %, अरोबिंदो फार्मा ७.८६ %, कंटेनर कॉर्पोरेशन ७.६६ % , मदरसन सुमी ७. ०८ %, लिंडे इंडिया ५. २४%, सेल ५.२२ %, , अदानी पावर ४. ७२ %, एनएमडीसी ४. २२ %, मॅग्मा ३.६० % सन टीव्ही ३.०६ % हे आघाडीचे दहा शेअर्स आहेत.

हेही वाचा: मार्ग सुबत्तेचा : नियोजित पालकत्व

गेल्या महिन्याभरात पोर्टफोलिओमध्ये बराच बदल घडून आलेला आहे. आदित्य बिर्ला कॅपिटल, एचडीएफसी बँक, झायडस, एनएचपीसी या नवीन कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.

भेल, भारत इलेक्ट्रॉनिक, आदित्य बिर्ला फॅशन, युपीएल, टाटा केमिकल, पंजाब नॅशनल बँक, जीएमआर, दालमिया भारत या कंपन्या पोर्टफोलिओ मधून काढून टाकल्या आहेत.

पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक १२.२९ % हिस्सा फार्मा कंपन्यांचा असून त्या खालोखाल रिफायनरी ९. २२ %, खासगी बँक ८. ७२ %, यांचा समावेश आहे.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

·एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ७१. ३९ %

हेही वाचा: क…कमॉडिटीचा : तूर विका, टीसीएस घ्या

·दोन वर्षे ५४. ८३ %

·तीन वर्षे ४१. ८ %

·पाच वर्षे ४०. ८५ %

·सलग दहा वर्ष २५. ६२ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.

Story img Loader