· फंड घराणे – एसबीआय ब्लूचिप फंड

· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !

· फंड कधी लॉन्च झाला ? – १४ फेब्रुवारी २००६

· एन. ए. व्ही. (८ डिसेंबर २०२३ रोजी) ग्रोथ पर्याय – ७५ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता (३१ ऑक्टोबर २०२३ रोजी)– ३८६१८ कोटी रुपये.

· फंड मॅनेजर्स – रोहिणी आनंदी, मोहित जैन

फंडाची स्थिरता

· पोर्टफोलिओ टर्नओव्हर १४.९९%

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन १४.०५%

· बीटा रेशो ०.९५%

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षांत किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडापेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे. उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षांत दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

हेही वाचा – Money Mantra : आधार कार्डबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, ‘हे’ काम १४ मार्चपर्यंत करता येणार

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षांत फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का?

बीएसई १०० या निर्देशांकातील पहिल्या शंभर कंपन्यातून उत्तम भविष्य असलेल्या कंपन्या निवडून काढणे व दीर्घकाळासाठी पोर्टफोलिओची उभारणी करून गुंतवणूकदारांना स्थिर आणि दमदार रिटर्न देणे हा या फंडाचा मुख्य उद्देश राहिला आहे. फंडाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ६६% गुंतवणूक लार्ज कॅप शेअर्समध्ये, ७.८१% मिडकॅप आणि १.१% स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये केली गेलेली आहे.

ऑक्टोबर अखेरीस उपलब्ध झालेल्या फंडाच्या माहितीनुसार एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक गुंतवणूक वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केली गेली आहे व एकूण पोर्टफोलिओच्या ३१ टक्के गुंतवणूक या क्षेत्रात केली आहे. त्या खालोखाल वाहन आणि वाहनाचे सुटे भाग व उपकरणे बनवणाऱ्या क्षेत्रात १४.२०%, एफ.एम.सी.जी. १०.२५%, आरोग्य ६.४२%, बांधकाम ५.६३%, ऊर्जा आणि तेल ४.२८%, माहिती तंत्रज्ञान ४.२५% अशी आघाडीची क्षेत्र आहेत.

हेही वाचा – Money Mantra : ८ बँकांनी बदलले व्याजदर, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

८ डिसेंबर २०२३ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – १५.६६ %

· दोन वर्षे – १०.९४ %

· तीन वर्षे – १७.४७ %

· पाच वर्षे – १५.८० %

· दहा वर्षे – १५.७३ %

· फंड सुरु झाल्यापासून – १२ %

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे?

३१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकूण गुंतवणुकीपैकी टॉप १० गुंतवणूक केलेल्या कंपन्या पुढीलप्रमाणे –

पहिल्या शेअर्सचा विचार केल्यास एचडीएफसी बँक ९.६८ % आय.सी.आय.सी.आय बँक ७.६० % लार्सन अँड टुब्रो ५.६३ % आयटीसी ५.४४ % बजाज फायनान्स ४.४६ % आणि इन्फोसिस ४.२५ % हे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये दिसतात. पोर्टफोलिओतील एकूण शेअर्सची संख्या अन्य ब्लूचिप फंडाच्या कंपन्यातील पोर्टफोलिओपेक्षा जास्त असलेली जाणवते. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, अव्हेन्यू सुपरमार्केट, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, एल.आय.सी., झोमॅटो अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवताना फंड मॅनेजर थोडीशी जोखीमही घेऊ इच्छित असल्याचे दिसत आहे. एक टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक असलेले १७ शेअर्स पोर्टफोलिओमध्ये आहेत. यातून फंड मॅनेजरचे धोरण स्पष्ट होते. ठराविक २५ ते ३० शेअर्समध्ये किंवा ४० शेअर्समध्ये गुंतवणूक न करता भविष्यकालीन दृष्ट्या महत्त्वाचे शेअर्स पोर्टफोलिओत दिसतात. गेल्या वर्षभरापासून वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये अन्यक्षेत्राएवढी वाढ दिसली नसली तरीही गेल्या महिन्याभराच्या काळात बँक निफ्टी वाढलेला दिसतो यामुळे या फंडाला त्याचा निश्चितच लाभ होणार आहे.

हेही वाचा – Money Mantra: पर्सनल लोन घेऊन फायदेशीर गुंतवणूक करता येते का?

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात मागच्या

· एक वर्षापासून एसआयपी केली असती तर २३.६४%

· दोन वर्षे १७.७%

· तीन वर्षे १५.१८%

· पाच वर्षे १७.५१% आणि

· सलग दहा वर्ष १४.९%

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

निफ्टी-फिफ्टीच्या तुलनेत या फंडाने २०२१, २०२२ व या वर्षीच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत सरस रिटर्न्स दिले आहेत.

  • नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षांच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीमविषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.

Story img Loader