जेव्हा आपल्याला आपल्या खर्चात बचत करून पैसे साठवायची गरज नसते त्यावेळी बचत करून आपण पैसे साठवत गेलो तर, ज्यावेळी आपल्याला पैशाची गरज पडते त्यावेळी तीच, पूर्वी केलेली बचत, आपली गरज भागवते, हे व्यवहारिक सत्य आहे !
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बचतीची संकल्पना अत्यन्त सोप्या शब्दात सांगायची तर – “ आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेल्या खर्चाची रक्कम आपल्या एकूण उत्पन्नातून वजा केल्यावर, उरणारी शिल्लक म्हणजे आपलं ‘सेव्हिंग’ किंवा आपली ‘बचत’ “असं म्हणता येईल . !
आपल्या उत्पन्नातून आपल्या गरजा आणि इच्छा पूर्ण करून झाल्यानंतर उरलेले पैसे वाढत राहावेत या साठी त्या उरलेल्या पैशांचा योग्य विनियोग करणं म्हणजे ‘इन्व्हेस्टमेंट’ किंवा गुंतवणूक करणं ! म्हणजेच गुंतवणुकीमध्ये आपण आपल्या बचतीचाच योग्य विनियोग करून त्यापासून अधिक पैसे कमवयचा प्रयत्न करत असतो .म्हणजेच आपली बचत ही आपल्या गुंतवणुकीचा ‘बेस’ म्हणजे ‘पाया’ असते. आपल्या गुंतवणुकीने मधून वेळोवेळी मिळणाऱ्या परताव्या वर आपलं आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी अवलंबून असते . म्हणजेच पर्यायाने आपलं आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी आपल्या बचतीवर अवलंबून असते .
आपल्या पैकी बहुतेकांना नियमित आणि पुरेशी बचत करणं अवघड जातं. बहुतेक सर्व नोकरदारांचं उत्पन्न नियमित वार्षिक ‘इंक्रीमेंट्स’ मुळे तर व्यावसायिक आणि उद्योजकांच उद्योजकांचं उत्पन्न त्याच्या व्यवसाय आणि उद्योगातील यशामुळे वाढत जातं . तरीही वाढलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणात बचतीचं प्रमाण वाढत नाही कारण उत्पन्न वाढतं त्याच प्रमाणात, किंवा कधीकधी त्या पेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात, आपले खर्च वाढलेले असतात. कदाचित आपलं उत्पन्न नैसर्गिकपणे वाढू शकतं, आपले खर्च नेहमीच नैसर्गिकपणे वाढतात पण आपली बचत कधीच नैसर्गिकपणे वाढत नाही . त्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करावे लागतात.
आपली बचत वाढवण्यासाठी मुख्यतः नियमित आणि काटेकोर हिशोब लिहावा
साधारणतः आपण हिशोब लिहिण्याचा कंटाळा करतो . बहुतेक वेळेस, जेव्हा आपल्या जवळ असलेले पैसे आपल्याला खरेदी करायच्या गोष्टींपेक्षा कमी पडू लागतात तेव्हा खडबडून जागे होऊन आपण, ‘ पैसे गेले कुठे’? हे शोधण्यासाठी हिशोब मांडू लागतो . पैसे कमी पडणं ही समस्या कमी उत्पन्नाच्या वर्गापासून श्रीमंतां पर्यंत सर्वांनाच असते कारण, आपल्या उत्पन्नापेक्षा थोडासा अधिक खर्च करण्याकडे सर्वांचाच कल असतो. परंतु जर पैसे कमी पडू लागल्यावर हिशोब मांडण्या ऐवजी, आपण रोज नियमितपणे होशोब लिहिला, तर कदाचित आपल्यावर पैसे कमी पडण्याची वेळ येणारही नाही. कारण आपण रोज खर्च मांडत असल्यामुळे, आपल्या खर्चाचा आणि शिलकीचा ताळेबंद आपल्या समोर राहतो. त्या अनुषंगाने आपण आपल्या खर्चाचं नियमन करू शकतो. म्हणजे, आपल्या खर्चाचे तपशील आपल्या समोर असल्याने आपण त्यातील अनावश्यक खर्च ओळखून ते खर्च टाळू शकतो. त्या वाचलेल्या रकमे मुळे आपली बचत लक्षणीय रीत्या वाढते.
बचतीची अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन ध्येयय ठरवावीत
आपण सर्वच जण साधारणतः महिन्याच्या सुरवातीला त्या महिन्याच्या खर्चाचं अंदाजपत्रक बनवतो . त्यामध्ये विजेचं बिल, वेगवेगळे ईएमआय , मुलांच्या शाळा कॉलेजच्या फी, औषधे या सारख्या आवश्यक खर्चां बरोबरच एखादं हॉटेल मधील जेवण , एखादी छोटी सहल , सिनेमा किंवा नाटक पाहणे या सारख्या करमणुकीच्या खर्चाची सुद्धा तरतूद आपण करतो . याच अंदाज पत्रकामध्ये त्या महिन्यात करायच्या बचतीची सुद्धा नोंद करावी. म्हणजे ,आपल्या महिन्याच्या खर्चाच्या अंदाज पत्रकात ‘बचती’ सुद्धा स्थान द्यावं. बचतीचा तो आकडा साध्य करता येण्या जोगा असावा . एकदा तो आकडा निश्चित झाल्यानंतर, त्या महिन्यात सर्वप्रकारे प्रयत्न करून तितकी बचत आवश्य करावी . काही महिने सातत्याने अशी भेट केल्या नंतर आपल्याकडे चंगली रक्कम जमा झालेली असेल . या ‘अल्पकालीन’ ध्येयय ठेऊन केलेल्या बचतीच्या रकमेच्या आधारावर आणि पुढील काळातल्या आपल्या उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज घेऊन पुढील काही महिन्यांसाठी म्हणजे मध्यमकाली’न’ आणि त्यानंतर काही वर्षांसाठी म्हणजे ‘ दीर्घकालीन’ आपण किती बचत करू शकतो याचा आडाखा बांधून आपल्या ‘मध्यमकालीन’ आणि ‘दीर्घकालीन’ ध्येयय निश्चित करावीत आणि ती कसोशीने प्रयत्न करून ती ध्येयं साध्य करावीत .
खर्चात काटकसर करावी
काही वेळा आपणआपल्या ला हवी ती वस्तू विकत घेण्यासाठी आवश्यक तितकी बचत करू शकत नाही. अशावेळी आपले खर्च कमी करून काही काळा साठी तरी काटकसरीने रहाणं फायद्याचं ठरतं. या काळामध्ये, तितक्याशा आवश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी करणं आपण टाळू शकतो. कुटुंबाबरोबर किंवा मित्रांबरोबर बाहेर एखाद्या चांगल्या रेस्टोरंट मध्ये जेवायला जाणं हा आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. या बाहेर जेवायला जाण्यामध्ये बऱ्याच वेळा रुचकर जेवण पेक्षा दिखाऊ पणाचा भाग अधिक असतो. थोडा विचार केला तर तिथे भरमसाठ पैसे खर्च करण्यापेक्षा आपण घरीच सर्वांबरोबर जेवलो तर अधिक आनंद मिळेल आणि विनाकारणच खर्च होणारे पैसे सुद्द्धा वाचतील हे आपल्या लक्षात येईल.
आज जगातल्या श्रीमंतांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असणारा वॉरन बफे म्हणतो , ” माझ्या जवळचा एक डॉलर जरी विनाकारण खर्च झाला तरी मला अतिशय दुःख होतं कारण त्या एका डॉलर पासून मी एक हजार डॉलर कमवू शकतो हे मला माहित आहे.” आपण सुद्धा आपल्या कडचा एक रुपया विनाकारण खर्च करणं टाळलं आणि तो योग्य ठिकाणी गुंतवला तर त्यापासून हजार नाही तरी शंभर रुपये निश्चितच कमवू शकू ! म्हणजेच जेव्हा आपण एक रुपया विनाकारण खर्च करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण शंभर रुपये विनाकारण उडवत असतो. म्हणूनच, अनावश्यक किरकोळ खर्च सुद्धा टाळावेत !
आपल्या बचतीचा नियमित आढावा घ्यावा
आपण करत आलेल्या बचतीचा नियमित आढावा घ्यावा. प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला आपण ठरवलेल्या रकमे इतकी बचत महिन्याच्या शेवटी आपण केली आहे याची खात्री करून घ्यावी . त्यांनतर आपलं बचतीचं मध्यमकालीन दीर्घकालीन ध्येय काटेकोर पणे पूर्ण करणायचा प्रयत्न करावा . आपली बचत वाढताना पहाणं हा नेहमीच एक आनंददायक अनुभव असतो. आपल्या कडे बचतीची अपेक्षित रक्कम जमा झाल्यानंतर ती रक्कम मालमत्ता, शेअर्स या सारख्या गुंतवणुकीच्या साधनांमध्ये गुंतवून त्यापासून पुढे दीर्घकाळ परतावा मिळवता येतो.
वरील सर्व गोष्टी समजायलाच नव्हे तर अमलात आणायला सुद्धा अतिशय सहज आणि सोप्या आहेत . पण तरीही आपल्याला त्या पटवून घ्यायला आणि अमलात आणायला अवघड वाटतात कारण नियमित बचत ही एक सवय आहे. ती लावून घ्यावी लागते . ती सवय एका मनोवृतीततून येते. ती मनोवृत्ती आपल्यामध्ये उपजत किंवा संस्कारातून आली असेल तर उत्तम आहे . तसं नसेल तर आपण कमवायला लागू तेव्हापासूनच ही मनोवृत्ती आणि त्यातून येणारी बचतीची सवय अंगी बाणवावी. त्यामुळे आपल्याला आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी लवकर मिळू शकते. ते सुद्धा शक्य झालं नसेल तर, जेव्हा गरजांपेक्षा थोडं आदी उत्पन्न मिळू लागेल तेव्हा किंवा अगदी आपल्या गरजा कमी करून सुद्धा, बचतीची सवय लावून घ्यावी. आपलं उत्तर आयुष्य सुखी आणि आनंददायक करण्यासाठी ते अनिवार्य आहे.
गंमत म्हणजे आजही आपल्याकडे, विशेषतः मराठी मध्यमवर्गीय समाजात, नियमित अचूक हिशोब लिहिणाऱ्या , योग्य तिथे काटकसर करणाऱ्या आणि आपले पैसे गुंतवणुकीसाठी किंवा वेळप्रसंगी उपयोगी पडतील म्हणून , साठवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला अरसिक आणि नीरस समजलं जातं. त्याच्या कुटुंबात सुद्धा त्याच्या या गुणांचं कौतुक होण्या ऐवजी, बऱ्याच वेळा, चेष्टा केली जाते. त्याच्या या गुणांना त्याचा तऱ्हेवाईकपणा किंवा विक्षिप्तपणा मानला जातो. या उलट पैशांचा हिशोब न करता बेदरकारपणे खर्च करणाऱ्या, मित्र आणि नातेवाईकांची सरबराई करण्यासाठी वारेमाप पैसे उधळणाऱ्या माणसाला कलंदर, दिलदार अशी विशेषणं लावून त्यांचं कौतुक केलं जातं. बऱ्याच वेळा ही दिलदार माणसं पुढे कधीतरी आर्थिक अडचणीत सापडतात. त्यावेळी ती एकटी पडतात. त्यामुळे इतरांच्या टीकेचा किंवा कौतुकाचा फारसा विचार न करता आपल्या पुढील आयुष्यातील शांती आणि समाधान डोळ्या समोर ठेऊन शक्य तितकी बचत आणि त्या बचतीतून योग्य गुंतवणूक करत राहणं आवश्यक असतं.
आपल्या उत्तर आयुष्यात, पूर्वी आपण किती पैसे कमवत होतो याला फारसा अर्थ उरत नाही तर, त्या कमावलेल्या पैशातून आपण कशी गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक करण्यासाठी किती बचत केली यावर आपलं त्यावेळचं आर्थिक स्थैर्य ठरतं. म्हणूनच बचतीला आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाचं स्थान आहे !!!