Business Loan On Whatsapp : प्रत्येक गरजू व्यक्तीला कर्जासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागतात. तसेच कागदपत्रांच्या झेरॉक्स आणि विविध कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत ठेवाव्या लागतात. मात्र, आता डिजिटल युगात अनेक त्रासातून सुटका होऊ लागली आहे. आता संबंधित बँक किंवा वित्तीय कंपनीच्या मोबाइल अॅप आणि साइटवर अर्ज करून क्षणार्धात कर्ज घेता येणार आहे. विशेष म्हणजे कर्ज प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून आणखी एक पाऊल टाकत खासगी फायनान्स कंपनीने ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर कर्ज देण्याची सुविधा सुरू केली आहे. खरं तर तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकणार आहे.
एका कंपनीने सांगितले की, ती आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. खरं तर हे व्यावसायिक कर्ज असेल आणि त्वरित मंजूर केले जाईल. व्हॉट्सअॅपद्वारे तुम्ही कर्ज कसे घेऊ शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१००% डिजिटल प्रक्रियेद्वारे कर्ज मिळणार
IIFL फायनान्सने WhatsApp वर ग्राहकांसाठी झटपट मंजुरीसह १० लाखांपर्यंतच्या व्यावसायिक कर्जाची घोषणा केली आहे. WhatsApp वर IIFL फायनान्सचे व्यावसायिक कर्ज हे MSME कर्ज क्षेत्रातील पहिल्या प्रकारचा उपक्रम आहे, जेथे कर्ज अर्जापासून ते वितरणापर्यंत १०० टक्के डिजिटलीकरण केले जाणार आहे. व्हॉट्सअॅपद्वारे १० लाखांच्या कर्जासाठी अर्ज करताना ग्राहकांना एआय-बॉटला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी ९०१९७०२१८४ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर “hi” पाठवा. ही पूर्णपणे पेपरलेस प्रक्रिया असून, ज्यामध्ये कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. देशातील ४५० दशलक्षाहून अधिक WhatsApp वापरकर्ते IIFL फायनान्सकडून या २४×७ एंड-टू-एंड डिजिटल कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आयआयएफएल फायनान्सचे बिझनेस हेड भरत अग्रवाल म्हणाले, “आम्ही व्हॉट्सअॅपवर एका सोप्या पेपरलेस प्रक्रियेद्वारे कर्ज अर्ज आणि वितरण पूर्णपणे सहज उपलब्ध करून दिले आहे, ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा.
हेही वाचाः कोल इंडियाला मार्च तिमाहीत ५५०० कोटींहून अधिक नफा, बंपर लाभांश जाहीर