आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी घसरणीला असलेले बाजार शेवटच्या तासाभरात थोडेसे सावरले. तरीही एकंदरीत सूर नरमाईचाच होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स १२६ अंश घसरून ६६२८३ वर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी-फिफ्टी ४३ अंशांनी घसरून १९७५१ ला बंद झाला. मध्यपूर्वेमध्ये झालेल्या निर्माण अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी खरेदीचे धोरण कायम ठेवले असेच म्हणता येईल. या आठवडयात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स घसरले तर बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांनी नकारात्मक सूर लावलेला दिसला.

निफ्टीचा विचार करायचा झाल्यास ॲक्सिस बँक, इन्फोसिस, अदानी एंटरप्राइजेस, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि विप्रो यांचे शेअर्स घसरले; तर टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, एचसीएल टेक्नॉलॉजी, टाटा कन्सुमर प्रॉडक्ट आणि नेसले या कंपन्यांचे शेअर्स वाढले.

State Bank of India fraud
तुमचंही SBI बँकेत अकाऊंट आहे का? मग जाणून घ्या एसबीआयनं दिलेली महत्त्वाची माहिती; अन्यथा क्षणात अकाउंट रिकामे
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला
diwali muhurat trading
विश्लेषण: शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? यंदा कधी? त्याचे महत्त्व काय?
How stable is the return of Standard Deviation Fund SBI Midcap Fund Mmdc
Money Mantra: फंडांचा फंडा- एसबीआय मिडकॅप फंड
china super rich numbers declining
‘या’ देशातील श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? श्रीमंतांच्या संपत्तीत घट होण्याचे कारण काय?
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…

हेही वाचा… Money Mantra: बाजारपेठेतील झुंडीचे वर्तन

ॲक्सिस बँकेचा शेअर जवळपास अडीच टक्क्याने घसरून ९९४ ला स्थिरावला तर टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये जवळपास ५% ची वाढ दिसून आली व तो ६६७ रुपयांवर बंद झाला. निफ्टी आणि सेन्सेक्सच्या तुलनेत बँक निफ्टीतील घसरण जास्त दिसली. आठवड्याअखेरीस बँक निफ्टी बंद होऊन ४४२८७ व स्थिरावला व ही घट ०.७०% एवढी होती. मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकामध्ये फारशी वाढ किंवा घट जाणवली नाही. काही माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या मनुष्यबळ कमी करण्याच्या बातम्या आल्यामुळे येत्या आठवड्यात या शेअर्सची कामगिरी कशी असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महागाई दरात घट

या आठवड्यामध्ये आलेली आशादायक बातमी म्हणजे किरकोळ किंमत निर्देशांक (CPI) जुलै महिन्यापासून कमी व्हायला सुरुवात झालेली होती. तो ५.०२% या नीचांक पातळीवर स्थिरावला. रिझर्व बँकेच्या अंदाजानुसार महागाईचा दर ४.८ ते ५ टक्क्यांच्या आसपास राहील असे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. त्यानुसार सलग ४% च्या आसपास स्थिरावलेला दिसला. सप्टेंबर महिन्याअखेरीस आलेल्या महागाईच्या आकडेवारीने बाजाराला दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे. महागाईच्या दरांतील सर्वात मोठा वाटा असलेली खाद्यपदार्थातील महागाई दोन टक्क्याने घटली आहे, तर भाज्यांचे दर जवळपास १५ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

आलिशान गाड्यांच्या विक्रीत वाढ

एकीकडे महागाईचा दर स्थिरावत असताना आलिशान गाड्यांच्या विक्रीमध्ये जोरदार वाढ होताना दिसत आहे. गेल्या सहा महिन्याची आकडेवारी विचारात घेतल्यास ‘लक्झुरिअस कार्स’ म्हणजेच ‘महाग’ या सदरात मोडणाऱ्या गाड्यांच्या विक्रीमध्ये झालेल्या वाढीमुळे वाहन विक्री आणि वाहन निर्मिती उद्योगाला नवसंजीवनी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. भारतात गाड्यांची विक्री करणाऱ्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी अशा कंपन्यांनी आपल्या विक्रीमध्ये दहा टक्के पेक्षा जास्त वाढ झाल्याची सुवार्ता दिली आहे.

आयआयपी (India’s Industrial Production) आकडेवारी आशादायक

या आठवड्यात आलेली आणखी एक आशादायक आकडेवारी म्हणजे भारताचे औद्योगिक उत्पादन ऑगस्ट महिन्यामध्ये दहा टक्क्याने वाढले. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन अर्थात (IIP) गेल्या १४ महिन्यातील उच्चांकावर पोहोचले आहे. खाणकाम, खनिजे उत्पादन आणि विद्युत निर्मिती या तिन्ही क्षेत्रांमध्ये वाढ नोंदवण्यात आली. ऑगस्ट महिन्यात लांबलेल्या पावसामुळे खाणकाम क्षेत्राला बळच मिळाले असे म्हणता येईल. येत्या आठवड्यात आयटीसी, हिंदुस्तान लिव्हर, नेसले, डाबर अशा एफएमसीजी (FMCG) क्षेत्रातील कंपन्यांचे निकाल जाहीर होतील. मान्सूनचा प्रभाव, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि लांबलेला सणांचा कालावधी याचा विक्रीवर आणि नफ्यावर कसा परिणाम होतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

उच्चांकांचा आठवडा

या आठवड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही लार्ज कॅप आणि अनेक मिडकॅप कंपन्यांनी ५२ आठवड्यातील उच्चांक नोंदवण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. थोड्याथोडक्या नाही तर १०७ कंपन्यांनी ५२ आठवड्यातील उच्चांक नोंदवला. कॉल इंडिया, गॅस ऑथॉरिटी, जे.के. टायर, कावेरी सीड्स, बजाज हेल्थकेअर, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, सेंचुरी टेक्सटाइल्स अशा कंपन्यांनी आगेकूच चालूच ठेवली आहे. इस्रायल -हमास यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मरगळलेल्या सोन्याच्या बाजारामध्ये पुन्हा खरेदीची लाट सुरु होताना दिसत आहे. सोन्याच्या भावाने वीस दिवसाच्या मूव्हिंग ऍव्हरेजच्या वर भाव नोंदवला आहे आणि सोन्याच्या दराने ५९००० कडे वाटचाल सुरू केली आहे.