सरलेल्या सप्ताहात सादर झालेल्या अर्थसंकल्पात कर रचनेतील सुधारणेतून धोरणात्मक तरलता, पगारदार वर्गाला पगारावरील उत्पनावर जो कर भरावा लागतो त्या करात प्राप्तिकर कायद्यातील ८७ कलमाद्वारे जी सूट (रिबेट) मिळते तिची मर्यादा १२ लाखांपर्यंत वाढवून महागाईच्या चटक्यांवरील जखमांवर कोमलतेनी केलेली मलमपट्टी. तर वित्तीय तूट या वर्षी जीडीपीच्या तुलनेत ४.८ टक्क्यांवर, तर पुढील वर्षी ४.४ टक्के राखण्याचा प्रयत्न, नवीन प्राप्तिकर कायदा आणण्यासारख्या क्लिष्ट गोष्टी नावाला अनुरूप निर्मलतेने हाताळत, सादर झालेला अर्थसंकल्प असे अर्थमंंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाबाबत म्हणायला हरकत नाही.
भांडवली बाजाराच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील लाभार्थी व नवीन कर रचनेमुळे प्रभावित झालेली क्षेत्र व त्या क्षेत्रातील समभागांचा विचार करूया.
ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) पर्यटन, विमा क्षेत्र. वस्त्रोद्योग, वाहन उद्योग या क्षेत्रांना अर्थसंकल्पानी सवलती दिल्या तर लोखंड, पोलाद क्षेत्रावरील आयातशुल्क घटवल्याने स्वस्त परदेशी तयार मालाशी या क्षेत्रातील कंपन्यांना स्पर्धा करावी लागणार.
अर्थसंकल्पाकडून सवलती मिळालेल्या क्षेत्रातील समभाग:
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड:
१ फेब्रुवारीचा बंद भाव – १,१९१.७० रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,१२० रु.
समभागाकडून १,१२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,२५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,३५० रुपये.
भविष्यातील मंदीच्या रेट्यात १,१२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडल्यास १,०६० रुपयांपर्यंत घसरण.
अर्थसंकल्पाकडून अन्याय झालेल्या क्षेत्रातील समभाग
टाटा स्टील लिमिटेड:
१ फेब्रुवारीचा बंद भाव- १३२.९७ रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १३५ रु.
अर्थसंकल्पातील निराशादायक तरतुदीमुळे, समभागाने १३५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडल्याने, १२३ रुपयांपर्यंत घसरण संभवते.
भविष्यात समभाग १३५ रुपयांवर १५ दिवस टिकल्यास १५० रुपयांचे वरचे लक्ष्य
निफ्टी व बँक निफ्टी निर्देशांकाचा आढावा
१ फेब्रुवारीचा बंद भाव- निफ्टी: २३,४८२.१५ / बँक निफ्टी: ४९,५०६.९५
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- निफ्टी: २३,१५०/ बँक निफ्टी: ४८,५००
अर्थसंकल्पातील उत्साहवर्धक बातमीचा परिणाम: २३,१५०/ ४८,५००चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत, या निर्देशांकांचे वरचे लक्ष्य २३,९०० / ५०,००० / द्वितीय लक्ष्य २४,२००/ ५१,००० असे असू शकेल.
मंदीच्या रेट्यामुळे, अर्थसंकल्पावर झालेला उदासीन परिणाम: दोन्ही निर्देशांकांत अनुक्रमे २३,१५०/ ४८,५०० चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत २२,८०० / ४७,७५० स्तरापर्यंत घसरण शक्य.
आशीष ठाकूर
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती:-शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.