डॉ. गिरीश वालावलकर
काल प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण गोल्ड लोनच्या सकारात्मक बाजू समजून घेतल्या. मात्र ‘गोल्ड लोन’ ला काही नकारात्मक पैलू सुद्धा आहेत, त्या आपण आजच्या लेखात समजून घेणार आहोत. त्या नकारात्मक बाजू याप्रमाणे :

१. बँक त्यांच्याकडे तारण ठेवलेल्या सोन्याच्या बाजारमूल्याच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम कर्ज म्हणून देते. म्हणजेच आपल्या सोन्याच्या बाजारमूल्याची उरलेली पंचवीस टक्के रक्कम आपण बँकेकडे कोणत्याही फायद्याशिवाय ठेवतो. बँक त्या पंचवीस टक्क्यांवर आपल्याला कसलाही मोबदला देत नाही.

Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Gold Silver Price Today 12 November 2024 in Marathi
Gold Price Today : खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचा भाव

२. कर्जदाराने बँकेकडे आपलं सोनं दिलं की त्या सोन्याचं बाजारमूल्य बँकेचे तज्ज्ञ निश्चित करतात. ते मूल्य कोणत्या निकषांवर निश्चित केलं गेलं आहे हे कर्जदाराला सांगितलं जात नाही. कर्जदाराच्या सोन्याचं बाजरमूल्य ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही पारदर्शकता नसते. आपल्या सोन्याचं बँकेने ठरवलेलं बाजारमूल्य आपल्याला स्वीकारावं लागतं.

३. ठरलेल्या मुदतीत कर्ज फेडलं नाही तर बँक तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करून त्या रकमेतून आपले कर्ज वसूल करून घेते. त्यामुळे कर्जदाराला त्याचे सोनं कायमचं गमवावं लागण्याचा धोका असतो .

गोल्ड लोन देणाऱ्या काही कंपन्या लोकप्रिय चित्रपट अभिनेत्यांना घेऊन जाहिराती करतात . त्यामधून गोल्ड लोन घेणं हे हुशारीचं लक्षण आहे असं सांगतात. गोल्ड लोन घेतल्यानंतर पैशाच्या सगळ्या अडचणी सुटतात असं भासवतात . पण वस्तुस्थिती यापेक्षा पूर्ण वेगळी आहे.

अखेरचा पर्याय म्हणूनच वापर करा

गोल्ड लोन म्हणजे आपल्या जवळचं सोनं तारण ठेऊन त्यावर कर्ज घेणं हा बहुतेक वेळेस पैसे उभे करण्याचा शेवटचा पर्याय म्हणून वापरला जातो. काही कारणामुळे दुसरं एखादं कर्ज मिळवण्याचे सर्व मार्ग संपलेले असतात आणि पैशाची तातडीची निकड निर्माण झाली असते तेव्हा गोल्ड लोन घेतलं जातं. गोल्ड लोन घेण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. वेळच्यावेळी योग्य गुंतवणूक केली आणि अनावश्यक खर्च केले नाहीत, तर गोल्ड लोन घेण्याची वेळ आपल्यावर येणं टाळता येऊ शकतं. पण दुर्दैवाने कधी आपल्या सोन्याच्या बदल्यात पैसे उभे करण्याची वेळ आली तर सरळ सोने विकून पैसे उभे करावेत गोल्ड लोन घेऊ नये.

गोल्ड लोन घेण्याऐवजी सोने विकून पैसे उभे करण्याचे चार प्रमुख फायदे आहेत:

१. आपल्या जवळच्या सोन्याच्या बाजारमूल्याचे सगळे पैसे आपल्याला मिळतात. त्यातील २५% बँकेला द्यावे लागत नाहीत.
२. व्याजापोटी भरावी लागणारी रक्कम वाचते.
३. गोल्ड लोन घेतल्यास सोन्याच्या बदल्यात कमी पैसे घेऊन आणि त्यावर व्याजाचे अतिरिक्त पैसे भरून सुद्धा, सरतेशेवटी आपलं सोनं गमावण्याची वेळ येऊ शकते.
४. आपल्या जवळचे सोने विकून मिळालेल्या योग्य रकमेचा सुयोग्य विनियोग केला तर आपण पुनः नव्याने सोन घेऊन आपल्या पूर्वीच्या दागिन्यांसारखेच, किंवा त्याच किमतीचे पण आधुनिक फॅशनचे दागिने घेऊ शकतो!

यामुळेच जर आपल्या जवळच्या सोन्याच्या बदल्यात पैसे उभी करण्याची वेळ आली तर भावनाप्रधान न होता व्यवहारिक निर्णय घेऊन ते सोने विकून पैसे उभे करावेत . ते खूप जास्त किफायतशीर ठरते, असे अनुभवांती लक्षात येते!
डॉ. गिरीश वालावलकर