Bank Employees Salary Hike : सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि संघटनांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी वेतन सेटलमेंटवर सहमती दर्शवली आहे. इंडियन बँक असोसिएशन (IBA) आणि युनियन हे ५ वर्षांसाठी १७ टक्के पगारात सुधारणा करण्यास सहमत आहेत. ही पगारवाढ १ नोव्हेंबर २०२२ पासून प्रलंबित होती आणि त्यासाठी सामंजस्य करारही करण्यात आला आहे.
निर्णयातील मुख्य मुद्दे काय आहेत?
पगार करारावर स्वाक्षरी करून देण्यात येणार्या फायद्यांमध्ये १ नोव्हेंबर २०२२ पासून १७ टक्के पगारवाढ लागू होणार आहे. यामध्ये बेसिक + डीएवर ३ टक्के लोडिंगचा फायदा मिळणार आहे. पेन्शन सुधारणेसह ५ दिवस काम करण्याचा नियम लागू केला जाणार आहे. आता हे प्रकरण केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या कोर्टात आहे.
हेही वाचाः शेअर बाजारातील उत्साहानं बँक निफ्टी निर्देशांकाने गाठला उच्चांक, नवा इतिहास रचला
(AIBOC) ट्विट केले
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने X वरील पोस्टमध्ये माहिती दिली आहे की, AIBOC च्या वतीने कॉम्रेड बालचंद्र पीएम यांची स्वाक्षरी करण्यात आली आहे आणि संयुक्त नोटला अंतिम रूप देण्यापूर्वी कोणत्याही उर्वरित मुद्द्यांवर देखील चर्चा केली जाणार आहे. वितरित केलेली रक्कम त्यांच्या सुरुवातीच्या अपेक्षा पूर्ण करत नसली तरी पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आता दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर त्यांना ‘अनुग्रह’ रक्कम म्हणजेच पेन्शन सुधारणेसह मिळणार आहे.
हेही वाचाः चंदा कोचर यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
एआयबीओसीने आनंद व्यक्त केला
पगारात १७ टक्के वाढीबाबत आयबीएबरोबर झालेल्या करारानंतर पेन्शन सुधारणेवरही सहमती झाली आहे. दर शनिवारी सुट्टीच्या मागणीबाबतचे प्रकरण अद्यापही रखडले असून, नोटेवर स्वाक्षरी झालेली नाही. AIBOC ने म्हटले आहे की, संयुक्त नोट सेटलमेंटला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी ५ दिवस कार्यरत (पाच दिवस बँकिंग) अंमलबजावणी करण्याची वचनबद्धता प्राप्त केली आहे आणि हे रेकॉर्डवर आहे. AIBOC ने विशेषत: IBA चे ५ दिवस कामाचे आश्वासन आणि पेन्शनधारकांना दिलासा लक्षात घेऊन या करारास सहमती दर्शवली आहे. पगाराची टक्केवारी आणि वजन अपेक्षेपेक्षा कमी असूनही देशातील ८.५० लाख बँक कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.