भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाइन डिजिटल लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ही सुविधा आणली असून, यामध्ये तुम्ही तुमचे लॉकर ऑनलाइन माध्यमातून उघडू शकता. येथे तुम्ही तुमचे महत्त्वाचे दस्तऐवज सहज ठेवू शकता. हे लॉकर्स अतिशय सुरक्षित आहेत.
डिजिलॉकरला डिजिटल लॉकर असेही म्हणतात. हे तुम्हाला अस्सल आभासी दस्तऐवजांची सोय देते. हे एक प्रकारचे डिजिटल दस्तऐवज वॉलेट आहे. यामध्ये तुम्ही तुमची कागदपत्रे जमा करू शकता. जेव्हा तुम्ही हे लॉकर उघडता, तेव्हा तुम्हाला अनेक कागदपत्रे एका क्लिकवर मिळणार आहेत. हे लॉकर तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेले आहे.
हेही वाचाः EPFO: १ लाख पगारावर ४७ हजारांहून अधिक पेन्शन मिळणार; ‘या’ तारखेपर्यंत निर्णय घेण्याची संधी
ही कागदपत्रे सुरक्षित ठेवता येणार
या लॉकरमध्ये तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, व्होटर आयडी, पॉलिसी यांसारखी अनेक कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकता. यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. लॉकरसाठी साइन अप करताना तुम्हाला ही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अशा प्रकारे तुम्ही तुमची कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला एक समर्पित क्लाउड स्टोरेज स्पेस मिळेल. ग्राहक या लॉकरमध्ये खाते विवरण, फॉर्म १५ ए आणि गृहकर्जाचे व्याज प्रमाणपत्रदेखील ठेवू शकतात. तुम्ही या लॉकरमध्ये कुठेही प्रवेश करू शकता, असंही एसबीआयने सांगितले.
हेही वाचाः टाटांच्या TCS मध्ये मोठा नोकरी घोटाळा; कमिशनमध्ये घेतले १०० कोटी, ४ अधिकारी निलंबित
डिजिटल लॉकर काय आहे?
भारत सरकार डिजिटल इंडिया बनवण्यासाठी पुढाकार घेत आहे. भारतात पेपरलेस प्रणाली निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. अशा परिस्थितीत आता ई-कागदपत्रांची देवाणघेवाण होणार आहे. एक काळ असा होता की, एखादा कागदपत्र हरवला जरी हरवला की तो पुन्हा तयार करायला बराच वेळ लागायचा. आता डिजिटलायझेशनच्या माध्यमातून ही समस्या संपुष्टात आली आहे. यामध्ये तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे ठेवू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लॉकर तुमच्या आधार कार्डशी जोडलेले आहे.