· फंड घराणे – एचडीएफसी म्युच्युअल फंड

· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

Income Tax Return, Income Tax, Tax, loksatta news,
इन्कम टॅक्स रिटर्न अजूनही दाखल करता येईल?
How useful are tax-saving investments
मार्ग सुबत्तेचा : कर वाचवणारी गुंतवणूक किती उपयुक्त?
us dollar strength us dollar is likely to stay stronger for longer and market future
 बाजार रंग : डॉलरची दादागिरी आणि बाजाराचे भविष्य
Wahei Takeda, confectionery company,
बाजारातील माणसं – पैशाची गुलामी झुगारणारा गुंतवणूकपंथ : वाहेई टाकाडा
My portfolio, Jupiter Lifeline Hospitals Limited,
माझा पोर्टफोलियो – जीवनरेखा याच हाती! : ज्युपिटर लाइफलाइन हॉस्पिटल्स लिमिटेड
mutual fund, future of children, mutual fund children,
मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी कोणता म्युच्युअल फंड घ्याल?
mishtann foods, mishtann foods Sebi,
मिष्टान्न! (उत्तरार्ध)
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !

· फंड कधी लॉन्च झाला ? – ११ ऑक्टोबर १९९६

· एन. ए. व्ही. (५ डिसेंबर २०२३ रोजी) ग्रोथ पर्याय – १००५ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता (३० नोव्हेंबर २०२३ रोजी)– २७६८७ कोटी रुपये.

· फंड मॅनेजर्स – राहुल बैजल ध्रुव मुच्चल

फंडाची स्थिरता

· पोर्टफोलिओ टर्नओव्हर १४.९९%

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन ४.३६%

· बीटा रेशो ०.९९%

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

हेही वाचा : Money Mantra : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला लोक का घाबरतात?

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निदर्शक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडापेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

हेही वाचा : Money Mantra : आधारपासून ते डीमॅटपर्यंत अन् बँक लॉकरपासून ते एफडीपर्यंत ही सर्व कामे डिसेंबरमध्ये पूर्ण कराच अन्यथा…

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

मागील दहा वर्षाच्या फंडाच्या ‘फॅक्टशीट’चा विचार केल्यास भलतीच जोखीम न घेता फक्त अशाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये फंड मॅनेजरने गुंतवणूक केली आहे की ज्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये स्थिरता आहे. ज्यांचे व्यवसाय अनेक वर्षांपासून चालत आले आहेत व त्यांच्या भविष्यातील व्यवसाय वृद्धीच्या योजना, व्यवसायामध्ये बदल करायच्या योजना सुद्धा ठरलेले आहेत. अशा कंपन्या शोधून काढणे अशक्य नाही, तर सेबीच्या नव्या नियमावलीमुळे सोपे बनले आहे. शेअर बाजारात असलेल्या आघाडीच्या शंभर कंपन्यांपैकी आकर्षक वाटणाऱ्या कंपन्या फंड मॅनेजर निवडतो. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप पेक्षा लिक्विडिटी सुद्धा अधिक असते. जरी शेअर बाजार काही नकारात्मक बातमीमुळे वगैरे किंवा आकस्मिकरित्या खाली आले तरी पुन्हा वर जाताना पहिली सुरुवात लार्ज कॅप पासूनच होत असल्यामुळे झालेले नुकसान भरून काढणे शक्य होते.

२००५ सालापासूनचा निफ्टी १००चा प्रवास

३१ मार्च २००५ ते ३० सप्टेंबर २०२३ या दीर्घ काळातला ‘निफ्टी १००’ या इंडेक्सचा प्रवास बघितल्यास मार्च २००५ मध्ये २०१७ इतका असलेला निफ्टी १०० इंडेक्स आज १९५७७ या पातळीवर जाऊन पोहोचला आहे. अर्थात १७ वर्षाचा सरासरी वार्षिक रिटर्न १३ टक्के इतका आहे.

दहा वर्षातील निफ्टी १००, निफ्टी मिड-कॅप १५० आणि निफ्टी स्मॉल-कॅप २५० या तीन इंडेक्सची तुलना केली तर वोलाटाईल (Volatile) म्हणजेच अस्थिरता या दृष्टिकोनातून मिड आणि स्मॉल कॅप पेक्षा निफ्टी १०० सरस ठरतो.

हेही वाचा : Money Mantra : स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप अन् मल्टी कॅप फंडांमध्ये फरक काय?

फंडाचा दीर्घकालीन आढावा (३१ ऑक्टोबर २०२३च्या आकडेवारीनुसार)

भारतातील पहिल्या पिढीतील खासगी म्युच्यअल फंड घराणे असलेल्या या एचडीएफसी म्युच्युअल फंडांच्या सर्वाधिक लोकप्रिय योजनांमध्ये या फंडाचे नाव का ? आणि हा फंड लेखमालेमध्ये का निवडला आहे ? याचा अंदाज रिटर्नमधूनच समजतो.

गेल्या दहा वर्षात या फंडाने गुंतवणूकदारांना १४.८१% तर फंड सुरू झाला तेव्हापासून १३.५३% असा उत्तम परतावा दिला आहे. मध्यम कालावधीतील गुंतवणूकदारांसाठी हा फंड दिलासादायक ठरला असून तीन वर्षात २५.७२% तर पाच वर्षात १४.४% असे रिटर्न्स गुंतवणूकदारांच्या पदरात पडले आहेत.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

५ डिसेंबर २०२३ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – २१.२५ %

· दोन वर्षे – १७.८२ %

· तीन वर्षे – २२.७१ %

· पाच वर्षे – १५.५९ %

· दहा वर्षे – १५.०४ %

· फंड सुरु झाल्यापासून – १८.२० %

हेही वाचा : Money Mantra : आता विशेष FD वर तुम्हाला ८.६१ टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार, जाणून घ्या कसे?

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकूण गुंतवणुकीपैकी टॉप १० गुंतवणूक केलेल्या कंपन्या पुढीलप्रमाणे – आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एनटीपीसी, इन्फोसिस, ऍक्सिस बँक, लार्सन अँड टूब्रो, भारती एअरटेल, कोल इंडिया.

यापैकी आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यामध्ये एकूण पोर्टफोलिओच्या ९% एवढी गुंतवणूक केली आहे. त्या खालोखाल रिलायन्स ६.२९% व आयटीसी आणि एनटीपीसी ५% आहेत.

या फंडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनावश्यक पोर्टफोलिओ मधील बदल फंड मॅनेजर टाळत असतात. यावर्षीच्या मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा पोर्टफोलिओ तपासल्यास सातत्याने वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्या, ऑइल अँड गॅस, माहिती तंत्रज्ञान, एफ.एम.सी.जी., हेल्थकेअर या प्रमुख पाच क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा : Money Mantra : म्युच्युअल फंडातील इंडेक्सेशन कसे काढले जाते आणि कोणत्या योजना पात्र आहेत?

अलीकडील काळात फंडाच्या पोर्टफोलिओ मध्ये ‘युनायटेड स्पिरिट्स’या नव्या शेअरची भर पडली असून हिरो मोटोकॉर्प मधली गुंतवणूक फंडाने विकली आहे. कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डाबर इंडिया या शेअर्समधील गुंतवणूक थोडीशी वाढवली आहे.

  • नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.

Story img Loader