मागील लेखात स्थावर मालमत्तेच्या खरेदीवर कराव्या लागणाऱ्या उद्गम कराविषयी (टी.डी.एस.) माहिती घेतली. या व्यतिरिक्त सामान्य नागरिकांना आणखीन कोणत्या देण्यांवर उद्गम कर कापावा लागतो ते बघू.
आता काही व्यवहारांच्या बाबतीत सर्व करदात्यांना उद्गम कराच्या तरतुदी लागू आहेत. म्हणजेच उद्योग-व्यवसाय न करणाऱ्या नागरिकांना (पगारदार, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, वगैरे) सुद्धा उद्गम कर कापून तो सरकारजमा करून तरतुदींचे अनुपालन करावे लागते. घरभाड्यावर कापाव्या लागणाऱ्या उद्गम कराच्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत :

कोणाला लागू आहे?
वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एच.यु.एफ.) हे कोणत्याही व्यक्तीला दरमहा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त भाडे देत असतील तर त्यांना उद्गम कराच्या तरतुदी (कलम १९४-आयबी) लागू होतात. उद्योग-व्यवसाय करणाऱ्या करदात्यांना ज्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा व्यावसायिकांची उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या उद्योग-व्यवसायासाठी भाडे दिले असल्यास त्यांना या तरतुदी लागू होत नाहीत. या व्यतिरिक्त जे करदाते आहेत (उदा. नोकरदार, निवृत्त कर्मचारी, गृहिणी) यांनी कोणत्याही कारणाने भाडे दिले असेल (स्वतःच्या राहण्यासाठी सुद्धा) तरी या कलमाच्या तरतुदी लागू होतात. ही तरतूद निवासी भारतीयाला भाडे दिले तरच लागू होते. घराचा मालक अनिवासी भारतीय असेल तर त्याला या कलमानुसार उद्गम कराच्या तरतुदी लागू होणार नाहीत.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
in Mumbai 55 percent increase in price of affordable homes
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून

आणखी वाचा: Money Mantra: घर खरेदीवर टीडीएस कसा आणि किती लागू होतो?

उद्गम कर किती कापावा?
या भाड्यावर उद्गम कराचा दर ५% इतका आहे. या कलमानुसार इतर उद्गम करासारखा उद्गम कर कापण्याच्या आणि सरकारकडे जमा करण्याच्या तरतुदी वेगळ्या आहेत. हा उद्गम कर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कापावा लागतो किंवा भाडे करारनामा वर्षाच्या आतमध्ये संपला तर करारनाम्याच्या शेवटच्या महिन्यात उद्गम कर कापावा लागतो. जर आपला भाडे करारनामा दोन आर्थिक वर्षात विभागला गेला असेल तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये आणि दुसऱ्या आर्थिक वर्षात ज्या महिन्यात भाडे करारनामा संपेल त्या महिन्यात कापावा लागतो. घरमालकाचा पॅन नसेल तर त्यावर २०% दराने उद्गम कर कापावा लागेल. पॅन नसल्यामुळे भाडेकरूला २०% उद्गम कर कापावा लागला आणि हा कापावा लागणार उद्गम कर शेवटच्या महिन्याच्या भाड्यापेक्षा जास्त असेल तर भाड्याएवढी रक्कम उद्गम कर म्हणून कापली जाईल.

आणखी वाचा: Money Mantra: पॅन आधारशी लिंक केलं नाही तर काय होतं?
उदा. एखाद्या व्यक्तीने घर भाड्याने घेण्याचा करारनामा १ ऑगस्ट, २०२३ ते ३१ जुलै, २०२४ या कालावधीसाठी केला असेल आणि घराचे भाडे प्रतिमहिना १ लाख रुपये असेल तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात दिलेल्या भाड्यावर म्हणजे ८ लाख रुपयांवर ५% दराने ४०,००० रुपये उद्गम कर ३१ मार्च, २०२४ ला कापावा लागेल. दुसऱ्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२४-२५ या वर्षात त्याचा करार ३१ जुलै, २०२४ रोजी संपतो त्यामुळे त्याला ३१ जुलै, २०२४ रोजी त्या आर्थिक वर्षात दिलेल्या भाड्याचा, म्हणजेच ४ लाख रुपयांवर ५% दराने २०,००० रुपये उद्गम कर कापावा लागेल. घर मालकाकडे पॅन नसेल तर त्या व्यक्तीला २०% दराने म्हणजे ३१ मार्च, २०२४ रोजी ८ लाख रुपयांवर १,६०,००० रुपये आणि ३१ जुलै, २०२४ रोजी ४ लाख रुपयांवर ८०,००० रुपये उद्गम कर कापावा लागेल. या उदाहरणात ३१ मार्च, २०२४ रोजी कापावयाचा उद्गम कर मार्च महिन्याच्या भाड्यापेक्षा जास्त असल्यामुळे ३१ मार्च, २०२४ चा उद्गम कर हा मार्च महिन्याच्या भाड्यापुरता मर्यादित म्हणजेच १,००,००० रुपये असेल.

मालकी संयुक्त नावाने असल्यास?
जी घर किंवा इमारत भाड्याने घेतली आहे आणि त्याची मालकी एका पेक्षा जास्त संयुक्त मालकांकडे असेल तर प्रत्येक मालकाच्या हिस्स्यानुसार उद्गम कर कापला पाहिजे. उदा. एका घराचे दरमहा भाडे १ लाख रुपये आहे आणि त्याची मालकी दोघांकडे आहे “अ” चा हिस्सा ८०% आणि “ब” चा २०% असल्यास घरभाडे दोघांना विभागून म्हणजे “अ” ला ८०,००० आणि “ब” ला २०,००० दिले जाईल. या उदाहरणात “अ” ला दिलेले दरमहा भाडे ८०,००० आहे, म्हणजेच ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे त्याला दिलेल्या भाड्यावर ५% उद्गम कर कापावा लागेल. “ब” ला दिलेले भाडे दरमहा ५०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे त्यावर उद्गम कर कापावा लागणार नाही.

उद्गम कर कधी भरावा?
ज्या महिन्यात उद्गम कर कापला आहे तो महिना संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत हा उद्गम कर आपल्याला फॉर्म २६ क्यूसी मध्ये चलन भरून तो सरकारकडे जमा करावा लागतो. आपण निवासी भारतीयाला घरभाडे दिल्यास टॅक्स डीडक्शन क्रमांक (टॅन) घेणे गरजेचे नाही. भाडेकरूचा आणि मालकाचा पॅन (पर्मनंट अकौंट नंबर) भरून २६ क्यूसी या फॉर्म सोबत पैसे भरावे लागतात. हा कर भरल्यानंतर करदात्याला प्राप्तिकर खात्याच्या “ट्रेसेस” च्या संकेत स्थळावर नोंदणी करून १५ दिवसांच्या आत उद्गम कर कापल्याचे प्रमाणपत्र फॉर्म १६ सी डाऊनलोड करून मालकाला द्यावे लागते.

उद्गम कर वेळेत न भरल्यास ?
फॉर्म २६ क्यूसी भरण्यास विलंब झाल्यास प्रती दिन २०० रुपये विलंब शुल्क भरावे लागते. हे विलंब शुल्क उद्गम करापेक्षा जास्त असणार नाही. उदा. एखाद्या करदात्याने कर भरण्यास १२० दिवसांचा विलंब केल्यास प्रती दिन २०० रुपये या प्रमाणे २४,००० रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. परंतु जो उद्गम कर विलंबाने भरला तो २०,००० रुपये असल्यास विलंब शुल्क २०,००० रुपयांपर्यंतच मर्यादित असेल.

अनिवासी भारतीयांना देणी
अनिवासी भारतीयांना कोणतेही उत्पन्न निवासी भारतीयाने (म्हणजेच घर भाडे, व्याज, व्यावसायिक रक्कम, वगैरे) दिले असेल तर कलम १९५ च्या तरतुदी लागू होतात. यानुसार त्यावर भारतात लागू असणाऱ्या कराच्या दरानुसार उद्गम कर कापून भरावा लागतो. निवासी भारतीयांना देणी देतांना जशा किमान रकमेच्या मर्यादा आहेत अशा मर्यादा अनिवासी भारतीयांना लागू होत नाहीत. उदा निवासी भारतीयांना दरमहा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त घरभाडे दिले असेल तरच उद्गम कराच्या तरतुदी लागू होतात.परंतु अशी मर्यादा अनिवासी भारतीयांना देणी दिल्यास लागू नाहीत. अनिवासी भारतीयांना देणी दिल्यास त्यासाठी टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर (टॅन) घेऊन त्यावर कापलेला उद्गम कर भरावा लागतो. आणि त्याचे त्रैमासिक विवरणपत्र देखील दाखल करावे लागते.

Story img Loader